Aaditya Thackeray : शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा, खोके सरकारच्या पडद्यामागचे आता समोर आले..! आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

गजानन उमाटे

| Edited By: |

Updated on: Aug 27, 2022 | 2:38 PM

खरी शिवसेना कोणती हे आता सर्वसामान्य जनतेलाही माहित आहे. पण दसरा मेळाव्याच्या बाबतीतही राजकारण केले जात आहे यासारखे दुर्देव ते कोणते? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दसरा मेळाव्यावरुन राजकारण पेटले आहे. पण शिवतीर्थावर शिवसेनचा मेळावा ही एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे.

Aaditya Thackeray : शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा, खोके सरकारच्या पडद्यामागचे आता समोर आले..! आदित्य ठाकरेंचे मोठे विधान
आदित्य ठाकरे

नागपूर : पावसाळी आधिवेशन संपत नाहीतोपर्यंत आता (Shiv Sena) शिवसेनेच्या (Dasara Melawa) दसरा मेळाव्यावरुन राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्याला आणखी राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदाच्या दसऱ्याला शिवतीर्थावर मेळावा नेमका कुणाचा होणार याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच दरम्यान, (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी नागपूरात केलेले वक्तव्य राजकीय खळबळ उडवून देणारे आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत आपण अनभिज्ञ आहोत पण जे काय होईल ते नियमातच असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केल्यानंतर गद्दारांचे सरकार बनवण्यामागे कोण हे देखील आता समोर येत असल्याचे म्हणत आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या स्थापनेबाबत त्यांनी आज वेगळाच दावा केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या विषयाची चर्चा रंगू लागली आहे.

दसरा मेळावा ही एक परंपरा

खरी शिवसेना कोणती हे आता सर्वसामान्य जनतेलाही माहित आहे. पण दसरा मेळाव्याच्या बाबतीतही राजकारण केले जात आहे यासारखे दुर्देव ते कोणते? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दसरा मेळाव्यावरुन राजकारण पेटले आहे. पण शिवतीर्थावर शिवसेनचा मेळावा ही एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. यामध्ये देखील अडथळा आणण्याचे पाप केले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे.

रीतसर परवानगी मागणार

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेता यावा याकरिता रीतसर परवानगीसाठी अर्ज केला जाणार आहे. मात्र, तो कोण स्विकारत नाही. त्यामुळे परवानगीसाठी शिवसेनेचे प्रयत्न राहणार आहेत. असे करुनही परवानगी मिळाली नाही तरी शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार हे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. शिवाय खरे मुख्यमंत्री कोण याचे दर्शन राज्यातील जनतेला घडत आहे. शिवाय हे गद्दारांचे सरकार बनवण्यासाठी पडद्यामागची भूमिका कोणाची होती हे देखील आता समोर येत असल्याचे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केल्याचे दिसून आले आहे.

हिंदूत्वावर ठाम, ज्यांना मान्य ते सोबत

शिवसेना कायम हिंदूत्वावर ठाम राहिलेली आहे. यामध्ये कुठेही बदल झालेला नाही. शिवाय आगामी काळातही हाच मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे. त्यामुळे ज्यांना हा मुद्दा मान्य आहे ते आमच्यासोबत येतील असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. जनता आमच्यासोबत त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हे वेगळं सागण्याची गरज नसल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. पक्ष संघटनेच्या अनुशंगाने उद्धव ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेची भूमिका आणि दसरा मेळावा याबबत वक्तव्य केले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI