सुशांतच्या मृत्यूवरुन टाहो, स्वतःच्या भावाच्या हत्येबाबत ब्रही नाही, विनायक राऊतांचा राणेंवर गंभीर आरोप

सुशांत सिंह आणि त्याची सेक्रेटरी दिशा सालियन यांची हत्याच झाली अशी ठामपणे राणेंनी त्यावेळी सांगितले. (Shivsena MP Vinayak Raut Criticize Narayan Rane)

सुशांतच्या मृत्यूवरुन टाहो, स्वतःच्या भावाच्या हत्येबाबत ब्रही नाही, विनायक राऊतांचा राणेंवर गंभीर आरोप

सिंधुदुर्ग : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्याप्रकरणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंवर गंभीर आरोप केले आहे. सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी नारायण राणे यांनी तत्परतेने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सुशांत आणि त्याच्या सेक्रेटरी दिशा सालियन यांची हत्या झाली, असे ठामपणे सांगितले. पण नारायण राणे यांनी चुलत भाऊ अंकुश राणे यांची हत्येबाबत चकार शब्द कोणी काढलेला नाही, ती हत्या कोणी केली, असा प्रश्न विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे. (Shivsena MP Vinayak Raut Criticize Narayan Rane on Sushant Singh Suicide)

“सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी नारायण राणे यांनी तत्परतेने पत्रकार परिषद घेतली. सुशांत सिंह आणि त्याची सेक्रेटरी दिशा सालियन यांची हत्याच झाली अशी ठामपणे राणेंनी त्यावेळी सांगितले. पण मला त्यांना एक विचारायचं आहे, नारायण राणे यांचा चुलत भाऊ अंकुश राणे यांची ज्यावेळी हत्या झाली ती कोणी केली? त्याबद्दल अजून चकार शब्द कोणी काढलेला नाही. स्वतःच्या चुलत भावाची हत्या झाली तरी चालेल, त्याबाबत ब्र देखील काढायचा नाही. पण सुशांत सिंहच्या मागे टाहो फोडून रडायचं,” असे विनायक राऊत म्हणाले.

“कणकवलीत 2005 पासून किती हत्या झाल्या, त्याचा तपास करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी मागणी करणार आहोत,” असेही राऊत म्हणाले.

सुशांत सिंह प्रकरणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव सर्वोच्च न्यायलयात कधीही नोंदवलं गेलं नाही. याबाबत निलेश राणे यांनी कधी शोध लावला माहीत नाही. सर्वोच्च न्यायलयाकडून वेगळे आदेश येतील. त्यावेळी महाराष्ट्र सरकार योग्य ती कारवाई करेल, असे स्पष्टीकरण विनायक राऊत यांनी दिले.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. नारायण राणे यांनी टूर -टूर करत राहावी. महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे काढेल, असा टोलाही राऊतांना राणेंना लगावला. (Shivsena MP Vinayak Raut Criticize Narayan Rane on Sushant Singh Suicide)

संबंधित बातम्या : 

Sushant Death Case | बिहार निवडणुकांमुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण, महाराष्ट्राचा दावा, तिवारी क्वारंटाईन प्रकरणही गाजले, सुप्रीम कोर्टात काय काय झाले?

Rhea Chakraborty ED | तू माझ्याशी का बोलली नाहीस? सुशांतच्या वडिलांचा रियाला मेसेज

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *