मुक्ताईनगरमधून भाजपची पिछेहाट, खडसेंनी करुन दाखवलं

मुक्ताईनगरमधून भाजपची पिछेहाट, खडसेंनी करुन दाखवलं
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासमोर भाजपची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली.

Akshay Adhav

|

Jan 20, 2021 | 11:31 AM

मुक्ताईनगर (जळगाव) :  राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं. या निकालात अनेक धक्कादायक तर अनेक निकाल अनपेक्षित लागले. काही दिग्गजांनी आपापले गड राखण्यात यश मिळवले तर काहींना मात्र घरच्या मैदानातच पराभूत व्हावं लागलं. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासमोर भाजपची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींपैकी 43 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयी गुलाल उधळला. (Unsatisfactory performance of BJP in Gram Panchayat elections in Muktainagar Allmost Eknath Khadse supporter Win)

मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ खडसे समर्थकांची जादू पाहायला मिळाली. तालुक्यात भाजपचा पूर्णपणे सफाया झाला. तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींपैकी 43 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने आपला झेंडा रोवला. तर केवळ 8 ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत पॅनेल विजयी झाले.

मुक्ताईनगरमध्ये थेट खडसे समर्थक विरुद्ध भाजप अशी सरळ सरळ लढत होती. विशेष हे की मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे यांचं अजिबातही सूत जुळत नाही. तरीही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारांनी भाजप पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवला. असं जरी असलं तरी एकनाथ खडसे मात्र या निवडणुकीत तब्येतीच्या कारणास्तव दूर राहिलेले पाहायला मिळाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांना आपली गावची ग्रामपंचायत राखता आली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खानापूरची म्हणजेच आपल्या गावची खानापूर ग्रामपंचायत गमावली. तर माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावात आमदार रोहित पवारांची जादू पाहायला मिळाली. रोहित पवार समर्थकांनी ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला.

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंची जादू

काहीच महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर ग्रामपंचायतीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडूक पार पाडली. त्यामुळे मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. निवडणूक काळात खडसे जरी आजारी असले तरी रोहिणी खडसे यांनी सगळं नियोजन हातात घेत उत्तम कामगिरी बजावून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींपैकी 43 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयी गुलाल उधळला.

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे निकाल

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागांवर शिवसेना जिंकलेली आहे. जाहीर झालेल्या निकालांपैकी भाजपने 3 हजार 263, राष्ट्रवादीने 2 हजार 999, शिवसेनेने 2 हजार 808, काँग्रेसने 2 हजार 151, मनसेने 38 आणि स्थानिक गटांनी 2हजार 510 जागा जिंकल्या आहेत.

या निकालावरून महाविकास आघाडी आणि भाजप अशी तुलना केल्यास महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे सुमारे 8 हजाराहून अधिक जागा मिळाल्या आहेत. यावरुन महाविकास आघाडीने मैदान मारल्याचं दिसून येत आहे.

‘ना भाजप ना राष्ट्रवादी आम्ही फक्त खडसे परिवाराचे’

मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालामुळे मोठं संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. ग्रामपंचायत एकूण अकरा जागांची होती. यामध्ये दोन जागा बिनविरोध होत्ता. त्यामुळे नऊपैकी 5 याठिकाणी शिवसेनेनं विजय मिळवला तर सहा उमेदवार आम्ही ना राष्ट्रवादीचे ना भाजपचे आम्ही खडसे परिवाराचे असल्याचं त्यांनी म्हटल्यानं याठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे.

हे ही वाचा :

ग्रामपंचायतीचं दुसऱ्या टप्प्याचं मतदान, गडचिरोलीतील 150 ग्रामपंचायतीचा आखाडा, मतदानाला सुरुवात

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें