बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का, मनसेचा शिवसेनेला टोला

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. | MNS Sanjay Rathod

बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड आहोत का, मनसेचा शिवसेनेला टोला
उद्धव ठाकरे, संदीप देशपांडे
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 9:39 AM

मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे (MNS) नेते आक्रमक झाले आहेत. आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम (Marathi Bhasha Din) योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड (Sanjay Rathod) नाही, असा खोचक टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला. (MNS leader Sandeep Deshpande slams Shivsena over permission denied for Marathi Bhasha din event in Mumbai)

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: येऊन सही करणार आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारही सहभागी होणार आहेत.

मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असून मनसे नेत्यांना सीआरपीसी 149 अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तरीही मनसे कार्यक्रम घेण्यावर आग्रही आहे. आम्ही जबाबरीने योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रम पार पडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

‘मैदानावर खेळण्यास बंदी घालून कोरोना रोखता येणार नाही’

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारच्या कोरोनासंबधीच्या नियमांवर बोट ठेवले. कोरोनाच्या भीतीने राज्य सरकारने मुंबईतील ओव्हल मैदान बंद ठेवले आहे. मात्र, मैदानावर बंदी घातल्याने कोरोना कमी होत नाही. राज्य सरकारने याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

संजय राठोडांची विकेट पडणार? 48 तास महत्वाचे

विधीमंडळ अधिवेशनाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर (Will Sanjay Rathod Resign From His Position) विरोधक आक्रमक झाले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यासाठी पुढचे 48 तास महत्वाचे असून पक्षानं त्यांना ‘निर्णय’ घेण्याच्या सुचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

संजय राठोड यांच्यासमोरचे पर्याय संपले?

पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप आहेत. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे त्याचं राजकीय महत्वही मोठं आहे. ह्या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड पंधरा दिवस जनतेसमोर आले नाहीत त्यामुळे संशय जास्त बळावत गेला. आल्यानंतरही त्यांनी थेट शक्तीप्रदर्शन केलं त्यामुळे आघाडीतल्या सहयोगी नेत्यांची नाराजी ओढवून घेतली. त्याच दबावामुळे मातोश्री नाराज झाली. संजय राठोडांनी जातीय आधार घेण्याचा केलेला प्रयत्नही जनतेला रुचलेला नाही. त्याचे पडसाद सोशल मीडियात जोरदार उमटत आहेत. त्यातून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं दिसतं आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्याकडे चौकशी होईपर्यंत पदावरुन दूर हटण्याशिवाय काहीही पर्याय नसल्याचं जाणकारांना वाटतं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.