श्री क्षेत्र मढी कानिफनाथाला होळीची ऊब, आस्था आणि प्रेमाचे आलाप मिलन, पंधरा दिवस अगोदरच होळी सण साजरा

कुणाल जायकर

| Edited By: |

Updated on: Mar 04, 2022 | 10:56 AM

अहमदनगरला पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेञ मढी कानिफनाथ येथे सालाबाद प्रमाणे यंदाही होळी सण साजरा करण्यात आलाय.

Mar 04, 2022 | 10:56 AM
  होळी (Holi) म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते.

1 / 7
यावेळी होळी 18 मार्चला आहे. दुसरीकडे 17 मार्चला होलिका दहन होणार आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी लोक विधिपूर्वक पूजा करतात. पण महाराष्ट्रातील अहमदनगर येथे पंधरा दिवस अगोदरच होळी साजरी करण्यात येत आहे.

2 / 7
अहमदनगरला पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेञ मढी कानिफनाथ येथे सालाबाद प्रमाणे यंदाही होळी सण साजरा करण्यात आलाय. मढी येथे पंधरा दिवस अगोदरच होळी सण साजरा केला जातोय. स्थानिक बोली भाषेत याला भट्टीचा सण म्हणतात.

3 / 7
 शेकडो वर्षाची परंपरा असून हुताशनी पोर्णीमेच्या होळीचा मान हा गोपाळ समाजाला दिला जातोय. मढी येथे फाल्गुन शु. पोर्णिमा ते गुढीपाडव्या पर्यंत भव्य यात्रा असते. मढी ग्रामस्थ होळीचा सणा निमित्त घरोघरी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. गावकऱ्यांनी घरी थापलेल्या गौऱ्या सायंकाळी वाजत गाजत कानिफनाथ गडावर आणल्या जातात.

4 / 7
या वेळी  जवळपास एक टण गौऱ्या एकञ करुण गोलाकार पद्धतीत ती भव्य होळी रचली जाते. रात्री नाथांच्या शेजारतीनंतर पुजाऱ्यांच्या हस्ते ती भव्य होळी पेटवण्यात येते. नाथांचा जयजयकार करत सर्वजण त्या होळीला प्रदक्षिणा घालतात. यावेळी देवस्थानच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

5 / 7
गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरस नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ हे वृध्देश्वराच्या रुपाने वास्तव्य करीत आहे. वृध्देश्वराच्या पुर्वेकडे 5 कि.मी. अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाच्या उत्तरेस 5 कि.मी. अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे.  श्री नऊनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रुपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुध्द नारायणांनी हिमालयातील एका हत्तीमध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले.

6 / 7
या सणानिम्मीत मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्याप्रमाणे मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

7 / 7

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI