Weekly Lucky Zodiacs: आजपासून सुरु झालेत ‘या’ 5 राशींचे चांगले दिवस, कोणती आहे तुमची रास?
आज पासून नव्या आठवड्याची सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे देखील सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे.. हा आठवडा 'या' 5 राशींसाठी उत्तम आणि आनंदी असणार आहे...

Weekly Lucky Zodiacs: आपल्या भविष्यात पुढे काय होणार. येणारे दिवस कसे असतील… याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो… श्रावणातील पहिल्या आठड्याची सुरुवात झाली. तर ऑगस्ट महिन्याची सुरुवात होणार आहे. जुलै महिन्याचे शेवटचे काही दिवस आणि ऑगस्ट महिन्याची सुरुवात काही राशींसाठी उत्तम आणि आनंददायी असणार आहे. या आठवड्यात जुलैचा शेवट आणि ऑगस्टची सुरुवात चांगल्या गोष्टींनी होईल. प्रेम, करिअर, आरोग्य आणि व्यवसायात कोणत्या राशींना यश मिळेल ते येथे पहा.
28 जुलैपासून सुरू होणारा नवीन आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला राहणार आहे. या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तसेच, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात शुक्रवारी पांढरे कपडे दान करावेत.
आजपासून सुरू होणारा नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाईल. या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांचे मन शांत राहील. या राशीचे लोक त्यांचे निर्णय चांगल्या प्रकारे घेऊ शकतील, तुमच्या कामात कोणतेही अडथळे येणार नाहीत. हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. कन्या राशीच्या लोकांनी बुधवारी हरभरा दान करावा.
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. तुमच्या प्रवासातून तुम्हाला फायदा होईल, तसेच या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. धनु राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. तुमचे संबंध सुधारू शकतात. बऱ्याच काळापासून लोकांशी असलेले मतभेद दूर होऊ शकतात. तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते, तुमचा तणाव संपेल. कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी शनि मंदिरात तिळाचे तेल अर्पण करावे.
ऑगस्ट महिन्याची सुरुवात मीन राशीच्या लोकांसाठी चांगली राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या पालकांचा आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला खासगी जीवनात तुमच्या जोडीदाराचे प्रेम मिळेल. मीन राशीच्या लोकांनी कच्चे दूध पाण्यात मिसळून सूर्याला जल अर्पण करावे.
