Vastu Tips : चुकूनही या दिशेला लावू नका दिवा, आयुष्यभर राहील पैशांची तंगी, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणं हे अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानलं जातं. धर्मशास्त्रानुसार जर तुम्ही घरात नियमित दिवा लावला तर घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, अशी मान्यता आहे. मात्र दिवा लावताना दिशेचा देखील विचार करणं गरजेचं असतं

वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणं हे अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानलं जातं. धर्मशास्त्रानुसार जर तुम्ही घरात नियमित दिवा लावला तर घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, अशी मान्यता आहे. ज्या घरात नियमीत सकाळी पुजेच्या वेळी आणि सायंकाळी दिवा लावला जातो, त्या घरात सूख, शांती समृद्धी येते, पैशांची कधीच कमी राहात नाही. मात्र वास्तुशास्त्र असं सांगतं की जेव्हा तुम्ही तुमच्या घरात दिवा लावता तेव्हा तो आपण कोणत्या दिशेला लावतो, हे देखील पाहिलं पाहिजे. जर दिशा चुकली तर त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होऊ शकते. चल तर मग जणून घेऊयात दिवा कोणत्या दिशेला लावावा आणि कोणत्या दिशेला लावू नये याबद्दल.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावू नये, धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा लावल्यानं घरात नकारात्मकता वाढते. कुटुंबातील व्यक्तींना मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावल्यास घरात कोणतंही कारण नसताना वाद होतात. धनहानी होते, हातात आलेला पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार या दिशेकडे तोंड करून केलेलं कोणतंही शुभ कार्य किंवा दिवा लावणं हे अशुभ फळ देणारं असतं. त्यामुळेच दक्षिण दिशेला दिवा लावू नये असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
दिवा कोणत्या दिशेला लावावा?
जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात सुख-शांती राहावी, तुमच्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहावा, तिजोरी धनाने भरलेली राहावी तर वास्तुशास्त्रानुसार दिवा हा नेहमी उत्तर दिशेला लावला पाहिजे. त्यामुळे तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होत राहातो. कुटु्ंबातील व्यक्तीचे ताण तणाव दूर होतात. हातात पैसा येत राहातो. उत्तर दिशेला दिव लावण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ही दिशा धनाची दिशा म्हणून देखील ओळखली जाते. ही धनाची देवता कुबेराची दिशा आहे, त्यामुळे या दिशेला दिवा लावणं शुभ मानलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
