ज्योतिषशास्त्रात अपघातासाठी कोणत्या ग्रहांना धरलं जातं जबाबदार? कसं वाचावं आणि काय उपाय? ते जाणून घ्या
अहमदाबाद विमान अपघातानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. 12 जून रोजी दुपारच्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की एक प्रवासी वगळता सर्वच्या सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्संना देवाज्ञा झाली. ज्योतिषशास्त्रानुसार, इतक्या मोठ्या दुर्घटनेला काही ग्रह जबाबदार असतात. चला जाणून घेऊयात

अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाच्या विमानाने 12 जून रोजी उड्डाण घेतलं आणि काही सेकंदातच कोसळलं. या भीषण अपघातात 265 जणांना जीव गमवावा लागला. काही कळायच्या आतच काळाने घाला घातला. यामुळे दृश्य पाहील्यानंतर सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला. ज्योतिषशास्त्रानुसार, काही ग्रहांची स्थिती अपघातासाठी कारणीभूत ठरते. कोणत्याही दुर्घटनेसाठी सूर्य आणि चंद्राची स्थिती महत्त्वाची असते. या दोन ग्रहांसह राहु, केतु, शनि आणि मंगळाची स्थिती जबाबदार धरली जाते. सध्याच्या गोचर कुंडलीनुसार, सिंह राशीच मंगळ आणि केतुची युती आहे. 18 मे रोची केतु सिंह राशीत विराजमान झाला होता. तर 7 जून रोजी मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला. ही युती 28 जुलैपर्यंत असणार आहे. त्यानंतर मंगळ ग्रह कन्या राशीत गोचर करेल. या दोन्ही ग्रहांची अशुभ मानली जाते. मंगळ आणि केतु हे दोन्ही ग्रह उग्र आहेत. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे अपघात होण्याची शक्यता असते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. सिंह ही रास अग्नितत्वाशी निगडीत आहे. त्यात मंगळ आणि केतु उग्र ग्रह आहेत. अशा स्थितीत मोठे अपघात घडण्याची शक्यता असते.
12 जून 2025 रोजी षडाष्टक योग
12 जून रोजी चंद्र ग्रह गुरूची स्वामित्व असलेल्या धनु राशीच्या मूळ नक्षत्रात संचार करत होता. तसेच षडाष्टक योगही तयार झाला होता. सिंह राशीत मंगळ आणि मीन राशीतील शनिमुळे हा षडाष्टक योग तयार झाला होता. षडाष्टक योग ज्योतिषशास्त्रात अशुभ मानला जातो. या योगामुळे अपघात, तणावपूर्ण स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. शनि-राहु-मंगळ या ग्रहामुळे वाहन अपघात होतात. शनिच्या साडेसाती-अडीचकीतही अपघाताचा सामना करावा लागू शकतो. केतु ग्रह गंभीर दुर्घटनेसाठी जबाबदार धरला जातो. अचानक होणाऱ्या घटनांसाठी केतुला जबाबदार असतो. एखाद्याच्या कुंडलीत केतु कमकुवत स्थिती असेल तर दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.
अशा स्थितीत काय आहेत उपाय?
मंगळ आणि केतुची युती असल्यास हनुमानाची उपासना करणं दिलासादायक ठरतं. शनिवारी आणि मंगळवारी हनुमानाची उपासना करावी. तसेच दररोज हनुमान चालीसेचा पाठ करावा. शनिवारी शनिदेवांची उपासना करावी. शनि मंदिरात जाऊन तेल अर्पण करावं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)