फक्त मुंबईतच नाही तर ‘या’ शहरांमध्ये देखील पाहता येतील गणरायाच्या भव्य मुर्त्या
Ganesh Chaturthi 2025: सर्वांना आता गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आहे... लवकरच संपूर्ण भारतातील वातावरण भक्तीमय होणार आहे... म्हणून फक्त मुंबईतच नाही तर 'या' शहरांमध्ये देखील तुम्हाला पाहता येतील गणरायाच्या भव्य मुर्त्या

“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…” ही घोषणा आता आता लवकरच सर्वत्र होताना दिसणार आहे. अवघ्या काही दिवस बाकी आहे आणि बाप्पाचं आगमन होणार आहे… ज्या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण अखेर जवळ आला आहे… गणेश चतुर्थी हा हिंदूंचा मुख्य सण आहे. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो, परंतु भारतातील काही शहरांमध्ये या सणाची भव्यता वेगळीच आहे. मुंबईत तर हा सण म्हणजे मुंबईची शान असं म्हणायला हरकत नाही. गणेशोत्सवादरम्यान, दूरदूरच्या शहरांमधून लाखो लोक लालबागचा राजा आणि इतर प्रसिद्ध मंडळांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतात.
मंदिरांमध्ये तसेच घरांमध्येही गणपतीचा उत्साह दिसून येतो. दहा दिवस विविध ठिकाणी बाप्पाची स्थापना केली जाते. म्हणून जर तुम्हीही गणपती उत्सवादरम्यान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर या मंडळांना नक्कीच भेट द्या. फक्त मुंबईमध्ये नाही तर, अन्य शहरांमध्ये देखील तुम्हाला गणरायाच्या भव्य मुर्त्या पाहायला मिळतीत…
गणपती उत्सवाचा उत्साह मुंबईत सर्वात जास्त असतो. तुम्ही मुंबईत असलेल्या लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक मंदिरांनाही भेट देऊ शकता. येथील मंडळांची भव्यता, मूर्तींची उंची आणि भाविकांची गर्दी… सर्वत्र आनंददायी आणि भक्तीमय वातावरण असतं.
मुंबई सोबतच अहमदाबाद, गुजरातमध्ये गणेश चतुर्थी अतिशय खास पद्धतीने साजरी केली जाते. अहमदाबादमधील सर्वात प्रसिद्ध मंडळांमध्ये शाहपूरचा राजा, त्रिकोन बागचा राजा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पुण्यातील काही प्रसिद्ध गणेश मंडळ त्यांच्या भव्य सजावटीसाठी ओळखले जातात. जर तुम्हालाही येथील गणेशोत्सव पाहायचा असेल तर तुम्ही येथे एकदा तरी नक्की या…
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाची मूर्ती स्थापित केली जाते आणि 5 दिवसांनी पूर्ण विधी आणि रीतिरिवाजांसह गणरायातं विसर्जन केलं जाते. गणेश चतुर्थीचा उत्सव केवळ धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. देशभरात साजरा होणारा हा उत्सव वरील ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हैदराबाद, आंध्र प्रदेश, पुणे येथे गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
