Aus vs Ind, 4th Test, 2nd Day : पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द, टीम इंडियाच्या 2 बाद 62 धावा

पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे.

Aus vs Ind, 4th Test, 2nd Day : पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द, टीम इंडियाच्या 2 बाद 62 धावा
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीतील (Australia vs India 4th Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे काही ओव्हर्सचा खेळ होऊ शकला नाही. या ओव्हर्सचा खेळाची भरपाई होण्यासाठी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला लवकर सुरुवात करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे. (australia vs india 2020 21 4th test day 2 live cricket score updates online in marathi at the gabba) स्कोअरकार्ड

दुसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 62 धावा केल्या. रोहित शर्मा 44 तर शुभमन गिल 7 धावा करुन बाद झाला. तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा अनुक्रमे 2 आणि 8 धावांवर नाबाद आहेत. टीम इंडिया अजूनही 307 धावांनी मागे आहे.

दरम्यान टीम इंडियाने कांगारुंना पहिल्या डावात 369 धावांवर ऑल आऊट केलं. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 108 धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार टीम पेनने अर्धशतक लगावलं. टीम इंडियाकडून थंगारासू नटराजन, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या तिकडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला.

दुसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात

ऑस्ट्रेलियाने 274-5 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. कॅमरॉन ग्रीन आणि टीम पेन नाबाद खेळत होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना ठराविक अंतराने धक्के दिले. यासह कांगारुंना 369 धावांवर रोखण्यास टीम इंडियाच्या गोलंदाजांना यश आले.

दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाची धावसंख्या

टीम इंडिया 62-2 (26 Overs)

अजिंक्य रहाणे-2*, चेतेश्वर पुजारा- 8*

(australia vs india 2020 21 4th test day 2 live cricket score updates online in marathi at the gabba)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 16 Jan 2021 13:13 PM (IST)

  पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ स्थगित

  ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला आहे. यामुळे पूर्ण ओव्हर्सचा खेळ होऊ शकला नाही. यामुळे तिसऱ्या दिवशी अर्धा तास लवकर सामन्याला सुरुवाक होणार आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसखेर 2 विकेट्स गमावून 62 धावा केल्या आहेत.

  दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाची धावसंख्या

  टीम इंडिया 62-2 (26 Overs)

  अजिंक्य रहाणे-2*, चेतेश्वर पुजारा- 8*

 • 16 Jan 2021 10:51 AM (IST)

  पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला

  पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

  बीसीसीआयने केलेलं ट्विट

 • 16 Jan 2021 10:26 AM (IST)

  टीम इंडियाच्या चहापानापर्यंत 2 बाद 62 धावा

  टीम इंडियाने चहापानापर्यंत 2 विकेट्स गमावून 62 धावा केल्या आहेत. टी ब्रेक झाला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे 2 तर चेतेश्वर पुजारा 8 धावांवर नाबाद होता.

 • 16 Jan 2021 09:48 AM (IST)

  भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा 44 धावांवर बाद

  भारताने दुसरी विकेट गमावली आहे. सलामीवीर रोहित शर्मा 44 धावांवर बाद झाला आहे. नेथन लायनच्या चेंडूंवर रोहितने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मिचेल स्टार्कने अप्रतिम झेल घेत रोहितला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

 • 16 Jan 2021 09:39 AM (IST)

  भारताचं अर्धशतक पूर्ण

  सलामीवीर रोहित शर्मा आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा या दोघांनी सावध पवित्रा घेत धिम्या गतीने धावफलक हलता ठेवला आहे. 11 धावांवर शुभमन गिल बाद झाल्यानंतर रोहित-पुजारा जोडीने 39 धावांची भागिदारी केली आहे. (भारत 50/1)

 • 16 Jan 2021 09:35 AM (IST)

  रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराचा सावध पवित्रा

  सलामीवीर शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा या दोघांनी सावध पवित्रा घेतला आहे. भारताने आतापर्यंत धावफलकावर 16 षटकात 45 झळकावल्या आहेत.

 • 16 Jan 2021 08:51 AM (IST)

  भारताला पहिला झटका, शुभमन गिल 7 धावांवर बाद

  भारताच्या पहिल्या डावाची वाईट सुरुवात झाली आहे. सलामीवीर शुभमन गिल 7 धावांवर बाद झाला आहे. पॅट कमिंसच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथने सोपा झेल घेत गिलला मागारी धाडलं.

 • 16 Jan 2021 08:23 AM (IST)

  भारताच्या पहिल्या डावाला सुरुवात, सलामीवीर रोहित शर्मा-शुबमन गिल मैदानात

  ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपल्यानंतर लंच ब्रेक घेण्यात आला. त्यानंतर आता टीम इंडियाच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात उतरले आहेत.

 • 16 Jan 2021 08:02 AM (IST)

  लंचनंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरणार

  ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला आहे. त्यानंतर आता लंच ब्रेक (दुपारच्या जेवणाचा ब्रेक) घेण्यात आला आहे. जेवणानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला उतरतील.

 • 16 Jan 2021 07:38 AM (IST)

  ऑस्ट्रेलियाचा शेवटचा फलंदाज माघारी, 369 धावांवर डाव आटोपला, सुंदर-नटराजनची कसलेली गोलंदाजी

  ऑस्ट्रेलियाचा शेवटचा फलंदाज बाद करण्यात भारतीय संघाला यश आलं आहे. टी. नटराजनने जोश हेजलवूडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला आहे. पहिल्या डावात कांगारुंनी सर्वबाद 369 धावांपर्यंत मजल मारली.

 • 16 Jan 2021 07:11 AM (IST)

  ऑस्ट्रेलियाला नववा झटका, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर नेथन लायन बाद

  भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरु करणाऱ्या नेथन लायनला बाद करण्यात टीम इंडियाला यश मिळालं आहे. वॉशिंग्टन सुंदरने लायनला बोल्ड आऊट केलं आहे. नेथन लायनने 22 चेंडूत 4 चौकारांच्या सहाय्याने 24 धावा फटकावल्या. (ऑस्ट्रेलिया 354/9)

 • 16 Jan 2021 07:01 AM (IST)

  नेथन लायन आणि मिचेल स्टार्ककडून भारतीय गोलंदाजांची धुलाई

  5 बाद 310 वर असलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 बाद 315 झाल्यानंतर उरलेले दोन खेळाडू लवकर बाद होतील असा अंदाज भारतीय प्रेक्षकांना होता. परंतु 8 विकेट गेल्यानंतर मैदानात असलेल्या मिचेल स्टार्क आणि नेथन लायन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई सुरु केली आहे. दोघांनी 4.4 षटकांमध्ये 34 धावा फटकावल्या आहेत. यात दोघांनी आतापर्यंत चार चौकार आणि एक षटकार ठोकला आहे.

 • 16 Jan 2021 06:50 AM (IST)

  भारताला आठवं यश, शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर पॅट कमिंस बाद, ऑस्ट्रेलिया 8 बाद 315

  भारताला आज सकाळच्या सत्रात तिसरं आणि सामन्यातील आठवं यश मिळालं आहे. शार्दुल ठाकूरने पॅट कमिंसला पायचित (LBW) पकडून ऑस्ट्रेलियाचा आठवा गडी तंबूत धाडला आहे. कमिंसला केवळ दोन धावा करता आल्या. (ऑस्ट्रेलिया 315/8)

 • 16 Jan 2021 06:47 AM (IST)

  ऑस्ट्रेलियाला सातवा झटका, कॅमरॉन ग्रीनचं अर्धशतक हुकलं

  फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाला सातवं यश मिळवून दिलं आहे. सुंदरने कॅमरॉन ग्रीनला 47 धावांवर असताना बोल्ड केलं आहे. (ऑस्ट्रेलिया 313/7)

 • 16 Jan 2021 06:44 AM (IST)

  ऑस्ट्रेलियाला सहावा झटका, कर्णधार टीम पेन 50 धावांवर बाद

  आज सकाळच्या सत्रात भारतीय संघाला पहिलं यश मिळालं आहे. शार्दुल ठाकूरने कर्णधार टीम पेनला 50 धावांवर बाद केलं आहे.

 • 16 Jan 2021 06:38 AM (IST)

  यष्टीरक्षक ऋषभ पंतला दुखापत

  भारतीय विकेटकीपर ऋषभ पंतला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. 90 व्या षटकात पहिलाच चेंडू नो बॉल होता. या चेंडूवर कॅमरॉन ग्रीनने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने संधी मिस केली. पंतने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या बोटावर लागला. पंतला दुखापत झाली आहे असं दिसत होतं. त्यानंतर फिजियो मैदानात आले, त्यांनी पंतचा हात तपासला आणि त्यानंतर पंत पुन्हा कीपिंक करु लागला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI