टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं विजयाचं गणित हा खेळाडू सोडवेल, रवि शास्त्री यांनी सांगितलं कसं ते
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रत्येक संघ जेतेपदावर दावा ठोकत आहे. गतविजेता भारतीय संघही जेतेपदासाठी दावेदार आहे. असं असताना भारतीय संघात एक खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. चला जाणून घेऊयात रवि शास्त्री काय म्हणाले ते...

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. स्पर्धा भारतात होणार असल्याने टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. कारण टी20 क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे जेतेपद मिळवणं काही कठीण जाणार नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ रिंगणात उतरणार आहे. पण या ताफ्यातील एक खेळाडू भारतासाठी हुकूमाचा एक्का ठरणार आहे. हे काय आम्ही सांगत नाही तर भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सांगितलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. नागपूरमध्ये न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यानंतर त्यांनी हे भाकीत केलं आहे. कारण पहिल्याच टी20 सामन्यात अभिषेक शर्माने कमाल केली. तसेच विजयाचा मानकरी ठरला. अभिषेक शर्मा एकटाच न्यूझीलंड संघावर भारी पडला. रवि शास्त्री यांच्या मते, अभिषेक शर्माची बॅट चालली तर पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताला फायदा होईल. ‘अभिषेक शर्माने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अशीच फलंदाजी केली तर भारताचा विजय निश्चित आहे.’, असं रवि शास्त्री म्हणाले.
अभिषेक शर्मा टी20 क्रिकेटमधील अव्वल फलंदाज आहे. आयसीसी क्रमवारीत गेल्या अनेक महिन्यांपासून पहिल्या स्थानावर विराजमान आहे. यावरून त्याची सातत्यपूर्ण कामगिरी दिसून येते. बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अभिषेक शर्माने 48 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकार मारत 35 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्यानंतर रवि शास्त्री यांना 7 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात प्रभावी ठरणाऱ्या खेळाडूबाबत विचारलं गेलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अभिषेक शर्माचं नाव घेतलं. ‘दुसरं तिसरं कोणीच नाही. एकच नाव ते म्हणजे अभिषेक शर्मा.. तो जगातील नंबर 1 टी20 फलंदाज आहे आणि चांगल्या फॉर्मात आहे.’
रवि शास्त्री यांनी पुढे सांगितलं की, ‘बुधवारी त्याने न्यूझीलंडच्या जबड्यातून सामना खेचून आणला. तुम्हाला एक बाब लक्षात ठेवावी लागेल, ते म्हणजे त्याचा आत्मविश्वास खूपच दांडगा आहे. त्याने देशांतर्गत चाहत्यांचा पाठिंबा मिळेल आणि त्यात चांगली कामगिरी करेल. त्याने चांगली कामगिरी केली तर निश्चितच भारताला फायदा होईल.’ दुसरीकडे, रवि शास्त्री यांनी एक सल्लाही दिला की, प्रशिक्षक आणि खेळाडूंना टीका सहन करायला पाहीजे. त्यांनी याचा सकारात्मक विचार करायला हवा.
