AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : रविवारी महामुकाबला, आशिया कप स्पर्धेत भारत-पाक भिडणार, सामना किती वाजता?

India A vs Pakistan A Live Streaming Asia Cup Rising Stars 2025 : भारताच्या पुरुष, महिला आणि लेजेंड्स संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला गेल्या काही आठवड्यांआधी लोळवलंय. आता इंडिया ए टीम शेजारी देशाच्या क्रिकेट संघाला पराभूत करण्यासाठी तयार आहे.

IND vs PAK : रविवारी महामुकाबला, आशिया कप स्पर्धेत भारत-पाक भिडणार, सामना किती वाजता?
India vs Pakistan Cricket FansImage Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Nov 15, 2025 | 10:20 PM
Share

मेन्स टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी, बाद फेरी आणि फायनल अशा 3 सामन्यांमध्ये धुव्वा उडवला. त्यानंतर वूमन्स टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला लोळवलं. अवघ्या काही दिवसांपूर्वी रॉबिन उथप्पा याच्या नेतृत्वात भारताने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत पाकिस्तानला धुळ चारली. आता इंडिया ए टीम पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या कुवेतची राजधानी दोहा इथे एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत हे 2 संघ भिडणार आहेत. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना कधी?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना रविवारी 16 नोव्हेंबरला होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना कुठे?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना दोह्यातील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहायला मिळेल.

सलग दुसरा सामना कोण जिंकणार?

जितेश शर्मा या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करत आहे. तर इरफान खान याच्याकडे पाकिस्तानच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. दोन्ही संघानी या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. भारताने यूएईवर मात केली आहे. तर पाकिस्तानने ओमानला पराभूत केलंय. त्यामुळे आता दोन्ही संघांना सलग दुसरा सामना जिंकण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष

दरम्यान पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. वैभवने यूएई विरुद्ध आपल्या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात 144 धावा केल्या होत्या. त्यामुळे वैभव पाकिस्तान विरुद्ध कशी कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.