IND vs PAK : टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी तिकीट विक्री सुरु, भारत पाकिस्तान सामना फक्त 438 रुपयात; पण…
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. म्हणजेच दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. असं असताना या स्पर्धेसाठी तिकीट विक्री 11 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटासाठी झुंबड उडाली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना घरच्या मैदानावर सामने पाहण्याची नामी संधी आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान खेळली जाणार आहे. या दरम्या एकूण 40 सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांसाठी आयसीसीने नुकतीच तिकीट विक्री सुरु केली आहे. गुरूवारी पहिल्या टप्प्याची तिकीट विक्री केली गेली. यात काही सामन्यांची तिकिटे फक्त 100 रुपयात मिळत आहे. पण क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते भारत पाकिस्तान सामन्याचे… कारण हा सामना पाहण्याची मजा काही औरच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची धडपड सुरु आहे. पण गुरूवारी 6.45 वाजता तिकीट विक्री सुरु झाली आणि पहिल्या टप्प्यातील सर्व तिकिटं अर्ध्या तासातच विकली गेली.
भारत पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींना श्रीलंकेत जावं लागणार आहे. कारण दोन्ही संघ तटस्थ ठिकाणी सामना खेळणार हे आधीच ठरलं आहे. त्यामुळे हा सामना श्रीलंकेत होणार आहे. हा सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होईल. आता तुम्ही तिकीट विकत घेण्यासाठी गेलात तर तिथे तुम्ही सोल्ड आऊट असं लिहिलेलं दिसेल. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आतापासूनच या सामन्याची उत्सुकता असल्याचं दिसून आलं आहे. आयसीसीने भारत पाकिस्तान सामन्यांची पहिल्या टप्प्यातील तिकिटांसाठी 1500 श्रीलंकन रुपये ठेवली होती. म्हणजेच भारतीय चलताना त्याची रक्कम 438 रुपये आहे. त्यामुळे झटपट तिकीट विक्री होणं सहाजिकच आहे.
भारताच्या इतर सामन्यांची तिकीटही संपली
भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला मुंबईत अमेरिकेशी होणार आहे. या सामन्याचं तिकीट 750 रुपयांपासून सुरु झालं होतं. पण या सामन्याच्या पहिल्या टप्प्याची तिकीट विक्री झाली आहे. 12 फेब्रुवारीला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या भारत-नामिबिया सामन्याची तिकिटेही विकली गेली आहेत. फक्त फक्त भारत-नेदरलँड सामन्याची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या तिकिटाचे दर 500 रुपयांपासून आहे. हा सामना 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानात प्रेक्षकांची आसन संख्या अधिक आहे. त्यामुळे विक्री होण्यास थोडा विलंब लागला आहे.
