AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: अर्शदीप सिंगच्या नावावर नकोसा विक्रम, शेवटच्या षटकात नको ते करून बसला

आयपीएल 2026 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पंजाब किंग्सच्या अर्शदीप सिंगने नकोसा विक्रम केला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

IPL 2026: अर्शदीप सिंगच्या नावावर नकोसा विक्रम, शेवटच्या षटकात नको ते करून बसला
IPL 2026: अर्शदीप सिंगच्या नावावर नकोसा विक्रम, शेवटच्या षटकात नको ते करून बसलाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 31, 2026 | 11:08 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पंजाब किंग्सने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. गुजरात टायटन्सला 162 धावांवर रोखलं. या सामन्यात अर्शदीप सिंग पंजाबकडून सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10.50 च्या इकोनॉमी रेटने 42 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली. खरं या सामन्यात त्याने शेवटचं षटकात 12 धावा दिल्या. या षटकात एकही षटकार आला नाही. यात 6 धावा या फक्त नो आणि वाइडमधून आल्या. तर एक चौकार आणि दोन धावा धावून काढल्या. तसं पाहिलं तर हे 12 धावांचं षटक काही महागडं नव्हतं. पण हे षटक पूर्ण करण्यासाठी अर्शदीप सिंगने 11 चेंडू टाकले. म्हणजे 5 चेंडू अतिरिक्त टाकले. गुजरातविरुद्धच्या षटकात 11 चेंडू टाकून अर्शदीपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकाच्या नको असलेल्या विक्रमाची बरोबरी केली.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात अर्शदीप सिंग टाकत असलेल्या शेवटच्या षटकात राहुल तेवतिया आणि राशीद खान मैदानात होते. पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी राहुल तेवतिया समोर होता. हा चेंडू वाइड टाकला. त्यानंतरच्या चेंडू निर्धाव गेला. दुसरा चेंडूवर धाव आली नाही. तिसऱ्या चेंडूवर राहुल तेवतियाने चौकार मारला. चौथा चेंडू टाकताना नो बॉल टाकला आणि 1 धाव आली. त्यामुळे चौथा चेंडू पुन्हा टाकावा लागला तसेच फ्री हीट होता. राशीद खान स्ट्राईकला आला होता पण चेंडू वाइड टाकला. पुन्हा चेंडू वाइ़ड टाकला आणि एक धाव काढली. तेवतिया स्ट्राईकला आला आणि फ्री हीटच होता. राहुल तेवतिया हा चेंडू निर्धाव टाकला. पाचव्या चेंडूवर तेवतियाने एक धाव काढली. सहावा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकला राशीद खान आला पण वाइड टाकला. सहावा चेंडू पुन्हा टाकला आणि निर्धाव गेला.

आयपीएलमधील सर्वाधिक वेळ टाकलेले षटक (चेंडूंच्या संख्येत)

11 चेंडू – मोहम्मद सिराज (आरसीबी) विरुद्ध मुंबई इंडियन्स, बंगळुरू, 2023 (19वं षटक)

11 चेंडू – तुषार देशपांडे (सीएसके) विरुद्ध एलएसजी, चेन्नई, 2023 (4थं षटक )

11 चेंडू – शार्दुल ठाकूर (एलएसजी) विरुद्ध केकेआर, कोलकाता, 2025 (13वं षटक)

11 चेंडू – संदीप शर्मा (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली, 2025 (20वं षटक)

11 चेंडू – हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स) विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे, 2025 (8वं षटक)

11 चेंडू – अर्शदीप सिंग (पंजाब किंग्स) विरुद्ध गुजरात टायटन्स, मुल्लानपूर, 2026 (20वं षटक)

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग