AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs RCB Score And Highlights IPL 2025 : चेन्नईचा चेन्नईत पराभव, आरसीबीचा 50 धावांनी विजय

| Updated on: Mar 29, 2025 | 12:15 AM
Share

Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru Score And Highlights Marathi: आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात चेन्नईला पराभूत करत इतिहास घडवला आहे. बंगळुरुने चेन्नईवर चेन्नईत 2008 नंतर पहिल्यांदा विजय मिळवला आहे.

CSK vs RCB Score And Highlights IPL 2025 : चेन्नईचा चेन्नईत पराभव, आरसीबीचा 50 धावांनी विजय
CSK vs RCB Live Ipl 2025Image Credit source: Tv9

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 8 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आमनेसामने होते. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होते. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना होता. आरसीबीने या सामन्यात चेन्नईवर 50 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आरसीबीचा हा या 18 व्या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला. आरसीबीने चेन्नईला 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून फक्त 146 धावाच करता आल्या. आरसीबीने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Mar 2025 11:15 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नईचा चेन्नईत पराभव, आरसीबीचा 50 धावांनी विजय

    आरसीबीने चेन्नईचा चेन्नईत पराभव केला आहे. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 146 धावाच करता आल्या.

  • 28 Mar 2025 10:52 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नईला सातवा झटका, आर अश्विन आऊट, धोनी मैदानात

    चेन्नईने सातवी विकेट गमावली आहे. आर अश्विन 11 धावांवर कॅच आऊट झाला आहे.

  • 28 Mar 2025 10:37 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नईला सहावा झटका, शिवम दुबे आऊट

    यश दयाल याने एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला 2 झटके दिले आहेत. यशने रचीन रवींद्र याच्यानंतर शिवम दुबे याला क्लिन बोल्ड करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

  • 28 Mar 2025 10:34 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नईला पाचवा झटका, रचीन रवींद्र आऊट

    यश दयाल याने रचीन रवींद्र याला 41 रन्सवर क्लिन बोल्ड केलं आहे. यासह चेन्नईने पाचवी विकेट गमावली आहे.  त्यामुळे आता शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या ऑलराउंडर जोडीवर मदार आहे.

  • 28 Mar 2025 10:14 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नईला चौथा झटका, सॅम करन आऊट, यलो आर्मी अडचणीत

    आरसीबीने चेन्नईला चौथा झटका दिला आहे. सॅम करन 8 धावा करुन आऊट झाला आहे. त्यामुळे चेन्नईचा स्कोअर 8.5 ओव्हरनंतर 4 आऊट 52 असा झाला आहे.

  • 28 Mar 2025 09:54 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : 3 बाद 20, दीपक हुड्डा आऊट

    आरसीबीने चेन्नईला तिसरा धक्का दिलाय. दीपक हुड्डा 4 धावा करुन आऊट झाला आहे. भुवनेश्वर कुमारने यासह पहिली विकेट मिळवली आहे.

  • 28 Mar 2025 09:40 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : ऋतुराज गायकवाड झिरोवर आऊट, चेन्नईला दुसरा धक्का

    जोश हेझलवूड याने चेन्नईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. हेझलवूडने राहुल त्रिपाठी याला 5 धावांवर बाद केलं. त्यानंतर हेझलवूडने ऋतुराज गायकवाडला झिरोवर आऊट केलं.

  • 28 Mar 2025 09:37 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : राहुल त्रिपाठी आऊट, चेन्नईला पहिला धक्का

    आरसीबीने चेन्नईला पहिला झटका दिला आहे. जोश हेझलवूड याने राहुल त्रिपाठीला फिल सॉल्ट याच्या हाती 5 धावांवर कॅच आऊट केलं.

  • 28 Mar 2025 09:32 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात, रचीन रवींद्र-राहुल त्रिपाठी ओपनिंग जोडी मैदानात

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईकडून रचीन रवींद्र-राहुल त्रिपाठी ओपनिंग जोडी मैदानात आली आहे. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 28 Mar 2025 09:14 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नईसमोर 197 धावांचं आव्हान

    आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 196 धावा केल्या.

  • 28 Mar 2025 09:04 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : आरसीबीला सहावा धक्का, कॅप्टन रजत पाटीदार आऊट

    आरसीबीने सहावी विकेट गमावली आहे. कर्णधार रजत पाटीदार 51 धावा करुन आऊट झाला. मथीशा पथीराना याने रजतला आऊट केलं.

  • 28 Mar 2025 08:57 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : आरसीबीला पाचवा धक्का, जितेश शर्मा आऊट

    खलील अहमद याने जितेश शर्माला रवींद्र जडेजा याच्या हाती कॅच आऊट करत आरसीबीला पहिला झटका दिला आणि वैयक्तिक पहिली  विकेट मिळवली. जितेश 12 धावा करुन माघारी परतला.

  • 28 Mar 2025 08:49 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : लियाम लिविंगस्टोन आऊट

    आरसीबीने चौथी विकेट गमावली आहे. लियाम लिविंगस्टोन याने 9 बॉलमध्ये 10 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. नूर अहमद याने लियामला आऊट करत एकूण तिसरी विकेट मिळवली.

  • 28 Mar 2025 08:31 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : विराट कोहली आऊट

    चेन्नईने आरसीबीला तिसरा झटका दिला आहे. नूर अहदमने विराटला 31 धावांवर रचीन रवींद्र याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 28 Mar 2025 08:09 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : देवदत्त पडीक्कल कॅच आऊट

    आरसीबीने दुसरी विकेट गमावली आहे. देवदत्त पडीक्कल कॅच आऊट झाला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने देवदत्तला आर अश्विनच्या बॉलिंगवर 27 धावांवर कॅच आऊट केलं.

  • 28 Mar 2025 07:57 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : धोनीची कडक स्टंपिंग, फिलीप सॉल्ट आऊट, आरसीबीला पहिला झटका

    चेन्नईने आरसीबीला पहिला झटका दिला आहे. महेंद्रसिंह धोनी याने नूर अहमद याच्या बॉलिंगवर फिलीप सॉल्ट याला स्टंपिंग केलं आहे. सॉल्ट 16 बॉलमध्ये 32 रन्स करुन आऊट झाला.

  • 28 Mar 2025 07:33 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नई-बंगळुरु सामन्याला सुरुवात, आरसीबीची बॅटिंग, विराट-फिल सॉल्ट सलामी जोडी मैदानात

    चेन्नई-बंगळुरु सामन्याला सुरुवात झाली आहे.  आरसीबीकडून विराट कोहली आणि फिल सॉल्ट सलामी जोडी मैदानात आली आहे. चेन्नईेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे.

  • 28 Mar 2025 07:11 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन

    चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथीराना आणि खलील अहमद

  • 28 Mar 2025 07:10 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.

  • 28 Mar 2025 07:03 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नईने टॉस जिंकला, बंगळुरुविरुद्ध फिल्डिंग

    चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने बंगळुरुविरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई आणि बंगळुरु या दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या मोसमात विजयाने सुरुवात केली आहे.

  • 28 Mar 2025 06:45 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : क्रिकेट चाहत्यांना टॉसची प्रतिक्षा, कोण होणार टॉसचा बॉस

    चेन्नई विरुद्ध बंगळुरु यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. दोघांपैकी कोण टॉस जिंकणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.

  • 28 Mar 2025 06:02 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल साल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिखारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.

  • 28 Mar 2025 06:01 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates Ipl 2025 : चेन्नई सुपर किंग्ज संघ

    चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुरजनप्रीत सिंग, नाथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी आणि आंद्रे सिद्धार्थ.

  • 28 Mar 2025 05:50 PM (IST)

    CSK vs RCB Live Updates : चेन्नई विरुद्ध बंगळुरु सामना

    आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आठव्या सामन्यात चेन्नई विरुद्ध बंगळुरु यांच्यात लढत आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईच्या होम ग्राउंडमध्ये केलं आहे. त्यामुळे बंगळुरुसमोर चेन्नईचा बालेकिल्ला भेदण्याचं आव्हान आहे.

Published On - Mar 28,2025 5:48 PM

Follow us
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.