ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली तरी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार! कसं ते समजून घ्या

न्यूझीलंडने कसोटी मालिकेत 3-0 ने मात दिल्यानंतर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित चुकलं आहे. भारताला टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठायची म्हंटलं तर 4-0 ने ऑस्ट्रेलियाला मात द्यावी लागणार आहे. पण मालिका गमावल्यानंतर भारत अंतिम फेरी गाठेल का? तुमच्याही मनात असा प्रश्न असेल तर उत्तर जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली तरी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार! कसं ते समजून घ्या
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 6:34 PM

न्यूझीलंडने भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे. त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं स्वप्न धुसर झालं आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला काहीही करून ही मालिका 4-0 किंवा 5-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा हे गणित सर्व जर तर वर अवलंबून राहणार आहे. न्यूझीलंडकडून दारूण पराभव झाल्यानंतर भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे टॉप दोन मध्ये राहण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. पण ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करणं सध्याचा फॉर्म पाहता कठीण आहे. पण मागच्या दोन मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला होता. त्यामुळे काहीही होऊ शकतं.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली तर..

  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-3 ने गमावली तर न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंकेच्या कामगिरीवर लक्ष असेल. न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध फक्त एकच सामना जिंकायला हवा. दक्षिण अफ्रिकेने 4 कसोटी सामन्यात 2 सामने गमावले पाहीजेत. तसेच श्रीलंकेने 4 पैकी 2 सामने गमावले पाहीजेत.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-2, 1-3 किंवा 1-0 ने गमावली तर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकावी. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने मात द्यावी. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करावं. तसेच दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील मालिका 1-1 ने ड्रॉ व्हावी.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिाक 1-4, 0-2, 0-3 ने गमावली तर इंग्लंडने न्यूझीलंडला 2-0 किंवा 3-0 ने पराभूत करावं. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत करावं, ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करावं आणि श्रीलंका-दक्षिण अफ्रिका यांच्यातील मालिका 1-1 ने ड्रॉ व्हावी.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 4-0 किंवा 5-0 ने गमावली तर सर्व गणित संपुष्टात येईल. म्हणजेच भारताचे अंतिम फेरीचे सर्व रस्ते बंद होतील.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकली तर..

  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका  4-0 किंवा 5-0 ने मालिका जिंकली तर थेट अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल.
  • भारताने ऑस्टेलियाला 3-1, 3-0, 4-1 ने मात दिली तर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील किमान एका सामना ड्रॉ करणं गरजेचं आहे.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर इंग्लंडने कसोटी मालिकेत न्यूझीलंडला किमान एका सामन्यात पराभूत करणं गरजेचं आहे.
  • भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकी 3-2 ने जिंकली तर इंग्लंडने न्यूझीलंडला किमान एका सामन्यात पराभूत करावं. तसेच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एक सामना ड्रॉ करावा.
  • भारताने कसोटी मालिका 2-1 किंवा 1-0 ने जिंकल्यास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत फक्त एकाच सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळावा, अशी प्रार्थना करावी लागेल. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना ड्रॉ करावा.
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली तर न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध फक्त एक विजय मिळवावा. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना ड्रॉ करावा.
  • भारत ऑस्ट्रेलिया मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडला फक्त एका सामन्यात विजय मिळावा. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकावी.
  • भारत ऑस्ट्रेलिया मालिकेत दोन्ही संघांनी एकही सामना जिंकला नाही तर इंग्लंडने न्यूझीलंडला मालिकेत पराभूत करणं आवश्यक आहे. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत करावं. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करावं. तर दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामना 1-1 बरोबरीत सुटावा.
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.