खराब फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉने आयपीएलसाठी बेस प्राईस केली जाहीर, सरफराज खानही उतरला लिलावात

आयपीएल मेगा लिलावासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. दिग्गज खेळाडू मेगा लिलावात आहेत. एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यात पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांचंही नाव आहे. सध्या पृथ्वी शॉ चांगल्या फॉर्मसाठी धडपड करत आहे. तर सरफराजला मागच्या पर्वात कोणीही विकत घेतलं नव्हतं.

| Updated on: Nov 06, 2024 | 5:33 PM
आयपीएल 2025 स्पर्धेसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव पार पडणार आहे. दहा फ्रेंचायझी 1574 खेळाडूंसाठी बोली लावतील. 204 जागांसाठी ही बोली लागणार आहे. यात बरेचसे खेळाडू अनसोल्ड राहतील यात शंका नाही. काही दिग्गज खेळाडूंनी बेस प्राईस 2 कोटी ठेवली आहे. पण पृथ्वी शॉ आणि सरफराज खान या दोन दिग्गज खेळाडूंनी त्यांची किंमत लाखांच्या घरात ठेवली आहे.

1 / 8
पृथ्वी शॉ आणि सरफराज खान हे दोन्ही कॅप्ड खेळाडू असून त्यांची बेस प्राईस खूपच कमी आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये या खेळाडूंनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. पण या मेगा लिलावात या दोन्ही खेळाडूंनी बेस प्राइस ही 75 लाख रुपये ठेवली आहे.

2 / 8
पृथ्वी शॉ आणि सरफराज खान या दोघांची कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे बेस प्राईस जास्त ठेवली तर कोणी ढुंकूनही पाहणार नाही, अशी भिती आहे. त्यामुळे आधी मिळत असलेल्या पैशात 10 पट कपात केली आहे.

3 / 8
मागच्या दोन पर्वात पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. यासाठी त्याला 7.5 कोटी रुपये मानधन मिळालं होतं. पण यंदाच्या मेगा लिलावात त्याने बेस प्राईस ही फक्त 75 लाख ठेवली आहे. आता लिलावात किती बोली लागते की अनसोल्ड राहतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

4 / 8
पृथ्वी शॉने आयपीएलमधून आतापर्यंत 19.80 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2018 अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार होता. याच वर्षी दिल्लीने त्याला 1.2 कोटी रुपयात खरेदी केलं होतं. 2022 मध्ये त्याच्या मानधनात वाढ झाली आणि 7.5 कोटी रुपये दिले गेले.

5 / 8
दिल्लीने रिटेन्शन यादीतून पृथ्वी शॉला वगळलं आहे. मागच्या पर्वात त्याला 14 पैकी 8 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण काहीच करता आलं नाही. 8 सामन्यात 163 च्या स्ट्राईक रेटने 198 धावा केल्या. त्यामुळे यंदा त्याला संघातून वगळण्यात आलं आहे.

6 / 8
पृथ्वी शॉ सारखीच सरफराज खानची गत आहे. त्यानेही आयपीएल लिलावात आपली बेस प्राइस 75 लाख रुपये ठेवली आहे. मागच्या लिलावात त्याला कोणीच भाव दिला नाही. तेव्हा तर त्याची किंमत फक्त 50 लाख होती. मात्र यावेळी टीम इंडियात पदार्पण केल्याने फ्रेंचायझी विचार करतील.

7 / 8
सरफराजने 2015 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातून पदार्पण केलं होतं. एका पर्वात चांगली कामगिरी केली मात्र त्यानंतर फेल गेला. मागच्या 9 वर्षात सरफराज खान फक्त 37 सामने खेळला आहे.

8 / 8
Follow us
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.