AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : “आम्हाला सोडून तुम्ही कधीच जाऊ नका”, गौतम गंभीर समोर हात जोडून विनवणी

आयपीएल 2024 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची गाडी सुस्साट सुटली आहे. साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करत कोलकात्याचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तसेच आयपीएल जेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असलेल्या संघांपैकी एक आहे. असं असताना एक व्हिडीओ समोर आला आहे. यात गौतम गंभीरला विनवणी करताना अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे.

Video : आम्हाला सोडून तुम्ही कधीच जाऊ नका, गौतम गंभीर समोर हात जोडून विनवणी
Video : "...जाण्याने किती त्रास झाला हे आम्ही सांगू शकत नाही", गौतम गंभीरसमोर फुटला अश्रूंचा बांधImage Credit source: Twitter
| Updated on: May 11, 2024 | 4:39 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत दर्जेदार क्रिकेटची मेजवानी क्रीडाप्रेमींना दरवर्षी अनुभवायला मिळते. जय परायज थोड्या बहूत फरकांनी क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळतो. काही संघ प्लेऑफमध्ये पोहोचतात, काही संघांचं स्वप्न भंगतं. यावर्षी काही संघांच्या पदरी निराशा पडली आहे. तर काही संघ प्लेऑफच्या शर्यतीत एकदम वरच्या पातळीवर घर करून बसले आहेत. आयपीएल स्पर्धेत एक गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित होते ती म्हणजे फॅन बेस..प्रत्येक संघाचा एक फॅन बेस आहे. तसेच विराट कोहली, धोनी आणि रोहित शर्मा यांना मानणारा एक वर्ग आहे. असं असताना गौतम गंभीरचा एक वेगळा असा चाहता वर्ग आहे. कोलकात्याच्या फॅनसाठी गौतम गंभीर एक देव स्वरूप आहे. कारण गौतम गंभीरच्या नेतृत्वातच कोलकात्याने दोनवेळा जेतेपदावर नाव कोरलं. तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी कोलकात्याचा संघ सज्ज आहे. गौतम गंभीर यंदा संघाचा मेंटॉर असून कोलकात्याने स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली आहे. भूमिका जरी वेगळी असली तर त्याचं मैदानात वावरणं आहे तसंच आहे. गौतम गंभीर संघाच्या प्रत्येक निर्णयात भाग घेताना दिसत आहे.

कोलकात्याचा संघ आयपीएल गुणतालिकेत 16 गुणांसह अव्वल स्थानी आहे. संघाने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. अधिकृतरित्या त्याची घोषणा होणं बाकी आहे. गंभीरच्या येण्याने संघात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. याचा आनंद कोलकात्याच्या चाहत्यांना झाला आहे. या बाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक चाहता गंभीरला कधीच सोडून न जाण्याची विनवणी करत आहे. त्याने बांगलामध्ये गाणं गात गौतम गंभीरचं महत्त्व सांगितलं. तू आमच्या हृदयात स्थान करून आहेस, आम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस; असं मनातलं चाहत्याने सांगितलं.

गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2012 आणि 2014 साली कोलकात्याने गौतम गंभीरच्या नेतृत्वात जेतेपद जिंकलं आहे. त्यानंतर गौतम गंभीरने 2018 मध्ये संघाची साथ सोडली आणि दिल्लीसोबत सूत जुळवलं होतं. त्यानंतर मागच्या दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर राहिला आहे. आता पुन्हा एकदा गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्ससोबत आला असून मेंटॉरच्या भूमिकेत आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.