IND vs SA : टीम इंडिया पुन्हा एकदा या खेळाडूला करणार ड्रॉप? चंदीगडमध्ये चांगला रेकॉर्ड तरी…
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामना न्यू चंदीगडच्या मुल्लापूर स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मैदानात आयपीएलचे सामने पार पडले आहेत. पण मेन्स टीम पहिल्यांदाच टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

भारताने पहिल्या टी20 सामना जिंकून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण दक्षिण अफ्रिकन संघाला 74 धावांवरच गाशा गुंडाळावा लागला. हा सामना भारताने 101 धावांनी जिंकला. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत आणखी एक आघाडी घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरा सामना 11 डिसेंबर रोजी असणार आहे. न्यू चंदीगडच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मागच्या वर्षीत या स्टेडियमचं उद्घाटन झालं होतं. तेव्हापासून भारतीय संघाने या मैदानावर एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे या खेळपट्टीचा भारतीय खेळाडूंना अंदाज नाही. पण दोन आयपीएल पर्वातील काही सामने या मैदानात खेळली गेली. त्यामुळे भारतीय संघात असलेल्या बहुतांश खेळाडूंना या मैदानाचा अंदाज आहे. कारण आयपीएलमध्ये या खेळपट्टीवर खेळले आहेत.
शुबमन गिलसह अर्शदीप सिंह, हार्दिक पांड्या या खेळपट्टीवर खेळले आहेत. तर अभिषेक शर्मा या मैदानावर एकच सामना खेळला आहे. त्यात त्याने 16 धावा केल्या होत्या. शुबमन गिलने दोन डावात 36 धावा केल्यात. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने या मैदानात 73 चेंडूत 111 धावा केल्या आहेत. तिलक वर्मानेही 2 डावात 29 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या आहे. हार्दिक पांड्याने एका डावात 9 चेंडू खेळत 22 धावा केल्यात.
अर्शदीप सिंगने या मैदानात एकूण 10 सामने खेळले आहेत आणि फक्त 11 विकेट घेतल्या आहेत. इतकंच काय तर धावाही भरपूर दिल्या आहेत. पण काही सामन्यात धावा दिल्या असल्या तरी ऐन मोक्याच्या क्षणी विकेट काढल्या आहेत. जसप्रीत बुमराहने दोन सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत. तर हार्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती प्रत्येकी एक सामना या मैदानात खेळले आहेत. हार्षित राणाने 3, वरूण चक्रवर्तीने 2 विकेट घेतल्या आहेत.
आता प्रश्न असा आहे दुसऱ्या टी20 सामन्यात काय बदल होईल? दुसऱ्या सामन्यात बदल होणं तसं पाहीलं तर कठीण दिसत आहे. या मैदानावर एका सामन्यात 3 विकेट घेतलेल्या हार्षित राणाला बेंचवर बसावं लागू शकतं. कारण तो पहिल्या सामन्यात संघाचा भाग नव्हता. त्यामुळे आता प्लेइंग 11 मध्ये त्याला संधी मिळते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
