AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकडे नाही सुधरणार! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच ‘आझाद काश्मीर’चा वाद, माजी कर्णधार सना मीर हिने माती खाल्लीच

ICC World women cup 2025 : पाकड्यांकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. आता बांगलादेशाकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या माजी महिला कर्णधाराने आझाद काश्मीरचा राग आलापला. तिच्यावर टीकेचा भडीमार झाला.

पाकडे नाही सुधरणार! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच 'आझाद काश्मीर'चा वाद, माजी कर्णधार सना मीर हिने माती खाल्लीच
सना मीर
| Updated on: Oct 03, 2025 | 9:06 AM
Share

Pakistan Player Sana Mir : पाकिस्तानच्या महिला संघाची माजी कर्णधार सना मीर हिच्या वक्तव्याने वाद उफाळला आहे. महिला विश्वचषकात काल बांगलादेशाने पाकिस्तानला लोळवले. प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानचा दारूण पराभव होत असल्याने पाकड्यांना जबरदस्त मानसिक झटका बसला आहे. त्याचा परिणाम सना मीरवर कालच दिसला. सना मीर काल सामन्याचे समालोचन (Match commentary) करत होती. त्यावेळी तिने राजकीय टिप्पणी केली. आझाद काश्मीरचे वक्तव्य करत अक्कलेचे तारे तोडले. आशिया कप 2025 मधील पराभव पाकड्यांच्या एकदम जिव्हारी लागल्याचे तिच्या वक्तव्यातून दिसून येते.

ती तर स्वतंत्र काश्मीरची रहिवाशी

काल बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये महिला कपासाठी सामना झाला. त्यात पाक संघ हारला. पाकिस्तानचा संघ खेळत होता. 29 व्या षटकावेळी पाकची नतालिया परवेज ही फलंदाजी करत होती. त्यावेळी नतालिया ही काश्मीरची रहिवाशी आहे असे सनाने सांगितले. पण नंतर लागलीच तिने ती स्वतंत्र काश्मीरची रहिवाशी असल्याचे मुद्दाम सांगितले. पाकिस्तानने कब्जा केलेला भूभाग हा पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखल्या जातो. येथे पाकिस्तान धार्जिणे कठपुतली सरकार आहे. पाक हा भाग आझाद काश्मीर असल्याचा कांगावा करतो. सना मीर हिने सुद्धा हाच राजकीय अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मग एकच वादंग उठले. तिला समाज माध्यमांवर लोकांनी चांगलेच धुतले. ती समाज माध्यमावर चांगलीच ट्रोल झाली. विशेष म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा महिला संघ आमने-सामने येत आहे.

बांगलादेशाकडून पाकचा पराभव

काल पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघात सामना झाला. बांगलादेशाच्या महिला गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला जेरीस आणले. पाकिस्तान 38.3 षटकात 129 धावातच गारद झाला. बांगलादेशाच्या मारुफा अख्तर हिने पहिल्याच षटकात ओमेमा सोहेल आणि सिदरा अमीन यांना तंबूत परत पाठवल्याने पाकला मोठा झटका बसला. त्यानंतर नाहिदा अख्तर आणि शोर्ना अख्तर यांनी पाच बळी घेतले. पाकिस्तान संघाची सुरुवातच डळमळीत झाली. पण हा संघ मग कमबॅक करू शकलाच नाही. संघाला सरस कामगिरी करता आली नाही. या काळात केवळ 14 वेळा चेंडू सीमारेषे पार गेला. तर बांगलादेश संघाने 130 धावांचा पाठलाग करताना रुबिया हिच्या नाबाद 54 धावांसह हा सामना खिशात घातला. रुबियासह सुल्तानाने 23 धावा ठोकत विजय दृष्टीटप्प्यात आणला. बांगलादेश संघाने 31.1 षटकात 2 गडी बाद लक्ष्य पूर्ण केले.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.