IND vs SA : प्रवीण आम्रे, सेहवाग ते उनाडकट, 7 भारतीयांचा द. आफ्रिकेत टेस्ट डेब्यू, कुणाच्या पदरी यश, तर कोण अपयशी

सध्याच्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कोणताही भारतीय खेळाडू कसोटी पदार्पण करताना दिसणार नाही. पण याआधीच्या दौऱ्यांमध्ये अनेक खेळाडू दक्षिण आफ्रिकेतून कसोटी कारकिर्दीची सुरुवात करताना दिसले आहेत.

| Updated on: Dec 24, 2021 | 2:00 PM
सध्याच्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कोणताही भारतीय खेळाडू कसोटी पदार्पण करताना दिसणार नाही. पण याआधीच्या दौऱ्यांमध्ये अनेक खेळाडू दक्षिण आफ्रिकेतून कसोटी कारकिर्दीची सुरुवात करताना दिसले आहे. अशा भारतीय खेळाडूंची एकूण संख्या आतापर्यंत 7 आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 7 भारतीय खेळाडूंबद्दल. तसेच यापैकी कितीजण यशस्वी झाले आणि किती जण पुढे मोठी कारकीर्द घडवण्यात अपयशी ठरले.

1 / 7
प्रवीण आम्रे : 1992 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या दौऱ्यावर असताना डर्बन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्याच कसोटीत प्रवीण आम्रेने पदार्पण केले. प्रवीण आम्रेने या संधीचं सोनं केलं आणि पहिल्याच डावात शतक झळकावलं. ही कसोटी अनिर्णित राहिली. तसेच आम्रेला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

2 / 7
अजय जडेजा : 1992 च्या दौऱ्यावर डरबनमध्ये खेळली गेलेली कसोटी, ज्यामध्ये प्रवीण अम्रेचे पदार्पण झाले होते, या कसोटीद्वारे अजय जडेजाचेही पदार्पण झाले. मात्र, जडेजाला अम्रेसारखा पराक्रम गाजवता आला नव्हता. या कसोटीत त्याला फक्त 3 धावा करता आल्या. त्यानंतर पुढच्या सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आणि जडेजा बराच काळ भारतासाठी क्रिकेट खेळत राहिला.

3 / 7
डोडा गणेश: कर्नाटकातून आलेल्या या गोलंदाजाने १९९७ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केले. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात डोडा गणेशला दोन्ही डावात मिळून केवळ 1 बळी घेता आला. या कसोटीत भारताला 282 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

4 / 7
वीरेंद्र सेहवाग : 2001 मध्ये जेव्हा भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला तेव्हा त्यात वीरेंद्र सेहवागचे पदार्पण पाहायला मिळाले. सेहवागने ब्लूमफॉन्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पदार्पण करताना शतक झळकावले. आणि, दक्षिण आफ्रिकेत अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. पहिल्या डावात 105 धावा करणाऱ्या सेहवागने दुसऱ्या डावात 31 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी 9 विकेटने जिंकली.

5 / 7
दीप दासगुप्ता: या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाचे पदार्पण देखील 2001 च्या दौऱ्यात ब्लूमफॉन्टन येथे खेळल्या गेलेल्या त्याच कसोटीद्वारे झाले होते, ज्याद्वारे सेहवागने डेब्यू केला होता. दीप दासगुप्ताने पहिल्या डावात 34 तर दुसऱ्या डावात केवळ 4 धावा केल्या.

6 / 7
जयदेव उनाडकट : एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला तेव्हा सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत जयदेव उनाडकटचे पदार्पण झाले. उनाडकटने भारतासाठी खेळलेली ही शेवटची कसोटी होती. या सामन्यात उनाडकटला कोणतेही यश मिळाले नाही. तर भारत हा सामना एक डाव आणि 25 धावांनी हरला.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.