IND vs WI 5th T20I Live : भारतानं वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव करून मालिका 4-1नं जिंकली

| Updated on: Aug 07, 2022 | 11:45 PM

IND vs WI 5th T20I Live : भारत- वेस्ट इंडिजमधील5वा T20 खेळला जातोय. भारतानं 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 आघाडी घेतलीय. रोहित शर्माऐवजी हार्दिक कर्णधार तर विंडीज संघाचं  नेतृत्व निकोलसकडे आहे.

IND vs WI 5th T20I Live : भारतानं वेस्ट इंडिजचा 88 धावांनी पराभव करून मालिका 4-1नं जिंकली
भारत- वेस्ट इंडिजमधील5वा T20Image Credit source: twitter

IND vs WI 5th T20I Live : फ्लोरिडामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील 5वा आणि शेवटचा T20 सामना झाला. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 188 धावा केल्या. त्यामुळे विंडीज संघाला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य मिळाले. पण, विंडीजचा संघ 15.4 षटकात 100 धावांवर सर्वबाद झाला आणि 88 धावांच्या मोठ्या फरकानं पराभूत झालाय.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 07 Aug 2022 11:06 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : अक्षर पटेलने त्याच्या षटकात २ बळी घेतले

    फिरकीपटू अक्षर पटेलने डावाच्या तिसऱ्या (5व्या) षटकात २ बळी घेतले. त्याने दुसऱ्या चेंडूवर शमार ब्रूक्सला (13) यष्टिचित केले. ब्रूक्सने 13 चेंडूत 2 चौकार मारले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डेव्हॉन थॉमस (10) बाद झाला, त्यामुळे वेस्ट इंडिज संघाची धावसंख्या 3 बाद 33 धावा झाली. थॉमसने 11 चेंडूत 2 चौकार मारले.

  • 07 Aug 2022 10:30 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : तिसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलने होल्डरची विकेट घेतली

    तिसऱ्या चेंडूवर विंडीज संघाला धक्का बसला आणि अक्षर पटेलने जेसन होल्डरला बोल्ड केले. त्याला खातेही उघडता आले नाही. आता डेव्हन थॉमस फलंदाजीला आला.

  • 07 Aug 2022 10:06 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 189 धावांचं लक्ष

    भारताने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 188 धावा केल्या, त्यामुळे विंडीज संघाला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 64 धावा केल्या. त्याने 40 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले. दीपक हुडाने 25 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 38 धावांचे योगदान दिले. काळजीवाहू कर्णधार हार्दिक पंड्याने 28 धावा केल्या. विंडीज संघाकडून ओडियन स्मिथने 3 तर जेसन होल्डर, डॉमिनिक ड्रेक्स आणि हेडन वॉल्श यांनी 1-1 विकेट घेतली.

  • 07 Aug 2022 09:20 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : विजेच्या लखलखाटामुळे खेळ थांबला

    विजेमुळे खेळ काही काळ थांबला आहे.

    भारताने 14.3 षटकात 3 गडी गमावून 135 धावा केल्या.

    खेळ थांबला तेव्हा संजू सॅमसन 9 आणि हार्दिक पांड्या 6 धावा करून क्रीजवर होते.

  • 07 Aug 2022 09:15 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : दीपक हुडा आऊट

    दीपक हुडा 38 धावा करून बाद झाला

    हेडन वॉल्शने दीपक हुडाला शामर ब्रूक्सकरवी झेलबाद केले.

    त्याने 25 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 38 धावा केल्या.

  • 07 Aug 2022 09:09 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : श्रेयस अय्यरचं अर्धशतक

    रोव्हमन पॉवेलच्या डावातील 10व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरनने चौकार मारून वैयक्तिक धावसंख्या 52 धावांपर्यंत पोहोचवली. त्याने 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

  • 07 Aug 2022 09:01 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : श्रेयस अय्यरनं स्मिथच्या षटकात सलग 2 षटकार ठोकले

    श्रेयस अय्यरने ओडियन स्मिथच्या पहिल्या (डावाच्या 8व्या) चेंडूत सलग 2 षटकार ठोकले. भारताने 8 षटकात 1 गडी गमावून 76 धावा केल्या. सध्या श्रेयस अय्यर 44 आणि दीपक हुडा 15 धावा करून खेळत आहेत.

  • 07 Aug 2022 08:42 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : 7 षटकांनंतर भारताची धावसंख्या किती? 61/1

    हेडन वॉल्शकडून पहिल्या (डावाच्या 7व्या) सामन्यात एकूण 8 धावा झाल्या.

    श्रेयस अय्यरने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला.

    भारताने 7 षटकात 1 गडी गमावून 61 धावा केल्या. सध्या श्रेयस अय्यर 31 आणि दीपक हुडा 13 धावा करून खेळत आहेत.

  • 07 Aug 2022 08:18 PM (IST)

    IND vs WI Live Score : इशान किशन जोरात

    ओबेड मॅकॉयच्या चेंडूवर एकूण 10 धावा झाल्या. इशान किशननेही दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. भारतानं 2 षटकात 15 धावा केल्या आहेत. सध्या इशान 7 आणि श्रेयस 5 धावा करून क्रीजवर आहेत.

  • 07 Aug 2022 08:03 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : आयसीसीचं ट्विट

  • 07 Aug 2022 07:59 PM (IST)

    ind vs wi 5th t20i playing 11 : इंडिजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

    वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन):

    शमर ब्रूक्स, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (क), डेव्हॉन थॉमस (विकेटकीपर), जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, कीमो पॉल, डॉमिनिक ड्रेक्स, ओबेद मॅककॉय, हेडन वॉल्श, रोव्हमन पॉवेल

  • 07 Aug 2022 07:57 PM (IST)

    ind vs wi 5th t20i playing 11 : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

    भारत (प्लेइंग इलेव्हन):

    इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (क), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, आवेश खान, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग

  • 07 Aug 2022 07:49 PM (IST)

    IND vs WI 5th T20I Live : भारताने नाणेफेक जिंकली, रोहितऐवजी हार्दिक कर्णधार

    भारताने नाणेफेक जिंकली, रोहितऐवजी हार्दिक कर्णधार

    भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

    आजच्या सामन्यात रोहित शर्मा खेळत नाही, त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.

Published On - Aug 07,2022 7:44 PM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.