AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA | जडेजाचा ‘पंच’, कोहलीचं शतक, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय

Indian Cricket Team | भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकाचा खुर्दा उडवलाय. टीम इंडियाने 243 धावांच्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान कायम राखलंय.

IND vs SA | जडेजाचा 'पंच', कोहलीचं शतक, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी विजय
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 05, 2023 | 9:01 PM
Share

कोलकाता | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने सलग आठवा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाचा 243 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाला विजयासाठी 327 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकाने गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकाला 27.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 83 धावाच करता आल्या. रविंद्र जडेजा आणि विराट कोहली हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तसेच इतरांनीही चांगलं योगदान दिलं.

दक्षिण आफ्रिकाची बॅटिंग

टीम इंडियाच्या भेदक, धारदार आणि फिरकी बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकाचे फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले. दक्षिण आफ्रिकाच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर चौघांनी 10 पेक्षा अधिक धावा केल्या. मार्को जान्सेन याने सर्वाधिक 14 रन्स केल्या. रॅसी व्हॅन डर ड्युसेन याने 13 धावा जोडल्या. कॅप्टन टेम्बा बावुमा आणि डेव्हिड मिलर या दोघांनी प्रत्येकी 11 धावांचं योगदान दिलं. लुंगी एन्गिडी झिरोवर आऊट झाला. तर तरबेझ शम्सी 4 धावांवर नाबाद परतला.

जडेजाचा दक्षिण आफ्रिकाला पंच

टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जडेजा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी 5 विकेट्स घेणारा दुसरा स्पिनर ठरला. जड्डूने 9 ओव्हरमध्ये 33 धावांच्या मोबदल्यात या 5 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव या जोडीने 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकाला पद्धतशीर गुंडाळलं.

दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. विराट कोहली याच्या 101 आणि श्रेयस अय्यर याच्या 77 धावांच्या मदतीने टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 326 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट-श्रेयस व्यतिरिक्त कॅप्टन रोहित (40), रविंद्र जडेजा (29*), शुबमन गिल 23, सूर्यकुमार यादव (22) आणि केएल राहुल याने 8 धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकाकडून 5 गोलंदाजांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. टीम इंडियाने या विजयासह आता पॉइंट्स टेबलमधील आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलंय.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन) क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप