WTC Final: 20 वर्षांपासून न्यूझीलंड भारताला जिंकू देईना, यावेळी कोहली सेना बाजी मारणार?

भारत को इस आईसीसी चैंपियनशिप के दौरान भी न्यूजीलैंड के खिलाफ उसके घर में टेस्ट सीरीज में 2-0 से करारी हार का सामना करना पड़ा था.

1/7
Wtc final
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला (WTC Final) 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा सामना असून पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये इतकी मोठी टूर्नामेंट खेळवली गेली आहे. या सामन्यात विजयासह भारत WTC ची ट्रॉफीतर मिळवलेच, पण सोबत न्यूझीलंड विरुद्धचा आयसीसीच्या (ICC)मोठ्या स्पर्धांमध्ये पराभूत होण्याचा खराब रेकॉर्डही मोडू शकेल. कारण मागील 20 वर्षांत भारत 7 वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडशी भिडला असूनकेवळ एकदाच विजय मिळवू शकला आहे. (India Never Won in Big ICC Matches Against New Zealand From Last 20 Years Will WOn in WTC Final)
2/7
2000 knock out
सर्वात आधी न्यूझीलंड आणि भारत 2000 साली आयसीसीच्या नॉकआऊट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये (चॅम्पियन्स ट्रॉफी) आमने सामने आले होते. त्यावेळी नैरोबी येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला 4 विकेट्ने पराभूत करत विजय मिळवला होता.
3/7
icc world cup 2003
त्यानंतर आयसीसी वर्ल्ड कप 2003 मध्ये सुपर सिक्स स्टेजमध्ये पुन्हा भारत आणि न्यूझीलंड समोरा-समोर आले. त्यावेळी मात्र झहीर खानच्या भेदक गोलंदाजीने किवीजला हैराण करुन सोडलं. ज्यामुळे भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला.
4/7
2007 t 20 world cup
भारताने जिंकलेल्या 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारत केवळ एकच सामना पराभूत झाला होता. तो म्हणजे सुपर-8 च्या लढतीत न्यूझीलंड विरोधात. न्यूझीलंडच्या 191 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 10 धावांनी पराभूत झाला.
5/7
2016 t20-
पुन्हा 2016 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडला 126 धावांवर रोखलं. पण स्वत:ही केवळ 79 रन्सच केल्याने 47 धावांनी सामना गमावला.
6/7
2019 wolr cup
त्यानंतर मात्र 2019 विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा केलेला पराभव सर्वात दुख देणारा आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारतीय गोलंदाजानी न्यूझीलंडला 239 धावांवर रोखले खरे पण भारतीय संघही प्रत्यूत्तर न देऊ शकल्याने 18 धावांनी पराभूत झाला.
7/7
wtc feb
आता फायनल होऊ घातलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही भारत न्यूझीलंडशी आमने सामने आले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असताना टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने पराभूत झाला. वेलिंग्टनच्या पहिल्या टेस्टमध्ये 10 विकेट्ने आणि क्राइस्टचर्च येथील दूसऱ्या टेस्टमध्ये 7 विकेट्ने पराभूत झाला होता.