India vs Australia Live Score, T20 World Cup 2021 : हिटमॅनचं अर्धशतक, भारताचा ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सनी विजय

India vs Australia Live Score in Marathi: भारताच्या विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी भारत सराव सामने खेळत आहे. इंग्लंडला 7 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता भारताने ऑस्ट्रेलियालाही 9 विकेट्सनी पराभूत केलं.

India vs Australia Live Score, T20 World Cup 2021 : हिटमॅनचं अर्धशतक, भारताचा ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सनी विजय
रोहित शर्मा

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असून सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यात भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. पण तत्पूर्वी सराव म्हणून भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत भिडणार आहे. यातील पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 विकेट्सनी दमदार विजय मिळवला. त्यानंतर आता दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध परार पडला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली ऑस्ट्रेलियाने 152 धावा केल्या. ज्या भारताने केवळ एक विकेट गमावत पूर्ण करत 9 विकेटने दांडगा विजय मिळवला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 20 Oct 2021 19:02 PM (IST)

  IND vs AUS: भारत विजयी!

  केएल राहुल बाद झाल्यानंतर रोहितने धुरा सांभाळत नाबाद 60 धावा केल्या तर पण नंतर स्वत:हून विश्रांती घेत तो तंबूत गेला. ज्यानंतर सूर्या आणि हार्दीकने अनुक्रमे 38 आणि 14 धावा करत विजय भारताच्या नावे केला.

 • 20 Oct 2021 18:16 PM (IST)

  IND vs AUS: केएल राहुल बाद

  भारताचा सलामीवीर केएल राहुल 39 धावा करुन बाद झाला आहे. आता रोहितच्या जोडीला सूर्यकुमार फलंदाजीला आला आहे.

 • 20 Oct 2021 18:02 PM (IST)

  IND vs AUS: भारताची दमदार सुरुवात

  भारतीय संघाने दमदार सुरुवात केली असून सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी क्रिजवर येत धमाल करण्यास सुरुवात केली आहे. 8 षटकानंतर भारताची धावसंख्या 62 वर 0 बाद अशी आहे.

 • 20 Oct 2021 16:36 PM (IST)

  IND vs AUS: मॅक्सवेल बाद!

  img

  ऑस्ट्रेलियाचा डाव एकहाती सांभाळणारा ग्लेन मॅक्सवेल राहुल चाहरच्या चेंडूवर बाद झाला आहे.

 • 20 Oct 2021 16:30 PM (IST)

  IND vs AUS: स्मिथ-मॅक्सवेलने सांभाळला डाव

  सध्या ऑस्ट्रेलियाचे अनुभवी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ दोघे क्रिजवर आहेत. तीन विकेट लवकर गेल्यानंतर या दोघांनी ऑसीसचा डाव सांभाळला आहे.

 • 20 Oct 2021 16:05 PM (IST)

  IND vs AUS: अरेच्चा! कर्णधार कोहली गोलंदाजीला

  काय पाहावं ते नवलंच! या सराव सामन्यात आज कर्णधार कोहली गोलंदाजी करत आहे.

 • 20 Oct 2021 15:50 PM (IST)

  IND vs AUS: कर्णधार फिंचही बाद

  img

  ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचही बाद झाला आहे. रवींद्र जाडेजाने त्याला पायचीत केलं आहे.

 • 20 Oct 2021 15:44 PM (IST)

  IND vs AUS: आर. आश्विनची कमाल, ऑस्ट्रलियाला दोन झटके

  img

  भारताचा अनुभवी फिरकीपटू आर आश्विनने कमाल करत एकाच षटकात दोन महत्त्वाचे विकेट मिळवले आहेत. त्याने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या दोघांना बाद केलं आहे.

 • 20 Oct 2021 15:33 PM (IST)

  IND vs AUS: भारताचे दिग्गज विश्रांतीवर

  भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह हे विश्रांती करत आहेत.

 • 20 Oct 2021 15:32 PM (IST)

  IND vs AUS: नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने निवडली फलंदाजी

  सामन्याला सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडल्यामुळे त्यांचे सलामीवीर मैदानात आले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI