AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Ban Highlights Asia cup 2023 | शुबमन गिल याची शतकी झुंज व्यर्थ, टीम इंडियाचा 6 धावांनी पराभव

| Edited By: | Updated on: Sep 15, 2023 | 11:40 PM
Share

Ind vs Ban Marathi Highlights Asia cup 2023 Updates | कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये झालेल्या सुपर 4 मधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने बाजी मारलीय. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा करेक्ट कार्यक्रम केला आणि 6 धावांनी विजय मिळवला.

Ind vs Ban Highlights Asia cup 2023 | शुबमन गिल याची शतकी झुंज व्यर्थ, टीम इंडियाचा 6 धावांनी पराभव

कोलंबो | बांगलादेशने टीम इंडियावर 6 धावांनी विजय मिळवत 266 धाावंचा शानदार बचाव केला आहे. टीम इंडियाची 266 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली. टॉप आणि मिडल ऑर्डरने सपशेल निराशा केली. मात्र त्यानंतर शुबमन गिल याने शतक आणि अक्षर पटेल याच्या झुंजार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने चांगली लढत दिली. मात्र निर्णायक क्षणी गिल आणि अक्षर आऊट झाले. त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी उरलेल्या शेपटीच्या खेळाडूंना गुंडाळलं आणि टीम इंडियावर विजय मिळवला. टीम इंडिया 49.5 ओव्हरमध्ये 259 धावांवर ऑलआऊट झाली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, अनमूल हक, तॉहिद हृदॉय, शमीम होसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांझिम हसन शाकिब आणि मुस्तफिजूर रहीम.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Sep 2023 11:37 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | बांगलादेशचा टीम इंडियावर 6 धावांनी विजय

    कोलंबो | बांगलादेश क्रिकेट टीमने आशिया कप सुपर 4 मधील शेवटच्या सामन्यात टीम इंडियावर 6 धावांनी विजय मिळवत शेवट गोड केला आहे. बांगलादेशने टीम इंडियाला विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाला ऑलआऊट 49.5 ओव्हरमध्ये 259 धावाच करता आला.

  • 15 Sep 2023 10:59 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | टीम इंडियाला नववा धक्का, बांगलादेशला विजयासाठी 1 विकेटची गरज

    कोलंबो | अक्षर पटेल निर्णायक क्षणी मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला आहे. अक्षरने 42 धावा केल्या.

  • 15 Sep 2023 10:56 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | शार्दुल ठाकुर आऊट, सामना रंगतदार स्थितीत

    कोलंबो | 266 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 249 धावांवर आठवा झटका लागला आहे. शार्दुल ठाकुर 11 धावांवर आऊट झाला आहे.

  • 15 Sep 2023 10:28 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | शुबमन गिल माघारी, टीम इंडियाला सातवा धक्का

    कोलंबो | टीम इंडियाला निर्णायक क्षणी मोठा झटका लागला आहे. शुबमन गिल शतक करुन आऊट झाला आहे. शुबमन गिल 121 धावा करुन माघारी परतला.

  • 15 Sep 2023 09:56 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | रवींद्र जडेजा पुन्हा फ्लॉप, टीम इंडियाला सहावा धक्का

    कोलंबो | टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. रवींद्र जडेजा याने पुन्हा निराशा केली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जडेजा 7 धावांवर क्लिन बोल्ड झाला.

  • 15 Sep 2023 09:33 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | शाकिबसमोर ‘सूर्या’स्त, टीम इंडियाला पाचवा धक्का

    कोलंबो | टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. शाकिब अल हसन याने सूर्यकुमार यादव याला 26 धावांवर क्लिन बोल्ड केलं.

  • 15 Sep 2023 09:06 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | टीम इंडियाची चौथी विकेट, ईशान किशन तंबूत

    कोलंबो | ईशान किशन याच्या रुपात टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. मेहदी हसन मिराज याने ईशान किशन याला 5 धावांवर आऊट केलंय.

  • 15 Sep 2023 08:35 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | केएल राहुल आऊट, टीम इंडियाची तिसरी विकेट

    कोलंबो | मेहदी हसन याने टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. हसनने केएल राहुल याला 19 धावांवर आऊट केलं.

  • 15 Sep 2023 07:32 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | तिलक वर्मा आऊट, टीम इंडियाला दुसरा झटका

    कोलंबो | बांगलादेशचा डेब्युटंट तांझिम हसन साकिब याने धमाकेदार सुरुवात केली आहे. तांझिमने कॅप्टन रोहित शर्मा याला झिरोवर कॅच आऊट केलं. तर त्यानंतर डेब्युटंट तिलक वर्मा याला 5 धावांवर क्लिन बोल्ड केलं.

  • 15 Sep 2023 07:20 PM (IST)

    Ind vs Ban Live Score Asia cup 2023 | टीम इंडियाची वाईट सुरुवात, कॅप्टन झिरोवर बाद

    कोलंबो | टीम इंडियाची 266 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा डावातील पहिल्या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर कॅच आऊट झाला. रोहितला भोपळाही फोडता आला नाही.

  • 15 Sep 2023 06:43 PM (IST)

    ind vs ban Live Update : टीम इंडियासमोर बांगलादेशने ठेवलं 265 धावांचं आव्हान

    आशिया कप 2023 स्पर्धेत बांगलादेशनं 50 षटकं पूर्ण खेळत 8 गडी गमवून 265 धावा केल्या. टीम इंडियासमोर विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं आहे. पाच बदलांसह टीम इंडिया मैदानात उतरली आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या खेळीकडे लक्ष लागून आहे.

  • 15 Sep 2023 06:29 PM (IST)

    ind vs ban Live Update : प्रसिद्ध कृष्णाला पहिलं यश, नसुम अहमदला पाठवलं तंबूत

    प्रसिद्ध कृष्णा याला पहिलं यश मिळालं आहे. नसुम अहमदचा त्रिफळा उडवत तंबूचा रस्ता दाखवला आहे. बांगलादेश 250 धावांच्या उंबरठ्यावर.

  • 15 Sep 2023 05:59 PM (IST)

    ind vs ban Live Update : मोहम्मद शमी याने घेतली दुसरी विकेट

    तोहिद हृदोय 54 धावा करून बाद झाला आहे. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या बाद झाला आहे. सीमारेषेवर तिलक वर्माने झेल घेतला.

  • 15 Sep 2023 05:55 PM (IST)

    ind vs ban Live Update : तोहिद हृदोय याचं अर्धशतक

    तोहिद हृदोय याने अर्धशतक शतक झळकावलं. आशिया कप स्पर्धेतील तोहिदचं हे दुसरं अर्धशतक आहे. बांगलादेशचा डाव सावरत 193 वर सहा गडी बाद अशी स्थिती.

  • 15 Sep 2023 05:35 PM (IST)

    ind vs ban Live Update : रविंद्र जडेजाच्या 200 विकेट्स

    रविंद्र जडेजाने बांगलादेशची सातवी विकेट घेत 200 विकेट पूर्ण के्ल्या आहेत.  कपिल देव यांच्यानंतर 2000 पेक्षा जास्त धावा आणि 200 विकेट घेणारा जडेजा दुसरा खेळाडू ठरला आहे.

  • 15 Sep 2023 05:23 PM (IST)

    ind vs ban Live Score : शाकिब-तौहीद यांची 100 धावांची भागीदारी

    33 ओव्हरमध्ये बांगलादेशने 160 धावा केल्या असून शाकिब अल हनस आणि तौहीद यांनी 100 धावांची भागीदारी करत बांगलादेशचा डाव सावरला आहे.  शाकिब  नाबाद 80 आणि तौहीद नाबाद 40 धावांवर खेळत आहेत.

  • 15 Sep 2023 04:58 PM (IST)

    ind vs ban live score : शाकिब अल हसनचं अर्धशतक

    बांगलादेश संघाच्या चार विकेट्स गेल्या असून कर्णधार शाकिब अल हसन याने डाव सावरला आहे. संघाच्या 26 ओव्हरमध्ये 124 धावांवर 4 विकेट्स गेल्या आहेत. शाकिबने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 15 Sep 2023 04:17 PM (IST)

    ind vs ban Live Score : बांगलादेशला चौथा झटका

    बांगलादेश संघाला चौथा झटका बसला आहे. मेहदी हसन  मिराज  13 धावांवर आऊट झाला असून त्याची अक्षर पटेलने  विकेट घेतली. रोहित शर्मा याने स्लीपमध्ये कडक कॅच घेतला.

  • 15 Sep 2023 03:17 PM (IST)

    ind vs ban live update : लिटन दास शून्य वर माघारी

    मोहम्मद शमी याने आपल्या दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच चेंडुवर लिटन दास याला बोल्ड केलं. लिटन दास याला शमीने खातंही  उघडू दिलं नाही,

  • 15 Sep 2023 03:03 PM (IST)

    ind vs ban Live Score : दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात

    दोन्ही संघांचं देशाचं राष्ट्रगीत झाल्यानंतर बांगलादेशचे ओपनर मैदानात आले आहेत. तर भारताकडून मोहम्मद शमी पहिली ओव्हर टाकत आहे.

  • 15 Sep 2023 02:42 PM (IST)

    Ind vs Ban Live Score : दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

    बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.

    भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.

  • 15 Sep 2023 02:33 PM (IST)

    Ind vs Ban Live Score : भारताने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, काय म्हणाला रोहित शर्मा?

    रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियात पाच बदल करण्यात आले आहेत. “आम्ही पाच बदल केले आहेत. तिलक वर्मा या सामन्यात खेळणार आहे. शमी, शार्दुल आणि प्रसिध्दचं संघात पुनरागमन झालं आहे. तसेच सूर्यकुमारचाही समावेश करण्यात आला आहे.”, असं रोहित शर्मा म्हणाला.

  • 15 Sep 2023 12:34 PM (IST)

    Ind vs Ban Live Score : भारत-बांगलादेश भिडणार

    भारत आणि बांगलादेशमध्ये आज आशिया कपमधील शेवटचा सामना रंगणार आहे. फायनलआधी भारताचा सुपर 4 फेरीमधील अखेरचा सामना असून बांगलादेश आपला शेवट गोड करणार की भारत आपल विजयरथ सुरू ठेवणार हे पाहावं लागणार आहे.

Published On - Sep 15,2023 12:32 PM

Follow us
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.