इंडिया vs इंग्लंड, T20 Semi Final Live Score: इंग्लंडकडून भारताचा पत्ता कट, अत्यंत दारुण पराभव

| Updated on: Nov 10, 2022 | 4:38 PM

IND Vs ENG T20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनल मॅच लाईव्ह स्कोर: आज जी टीम जिंकेल, ती फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना करणार आहे.

इंडिया vs इंग्लंड, T20 Semi Final Live Score: इंग्लंडकडून भारताचा पत्ता कट, अत्यंत दारुण पराभव
ind vs eng

T20 वर्ल्ड कप 2022 मधील आज दुसरी सेमीफायनल मॅच झाली. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये हा सामना झाला. इंग्लंडने या मॅचमध्ये टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने प्रथम बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 6 बाद 168 धावा केल्या होत्या. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 169 धावांच लक्ष्य  16 व्या ओव्हरमध्ये आरामात पार केलं. ग्रुप 2 मध्ये टीम इंडियाने फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला होता. या ग्रुपमध्ये टीम इंडिया 8 पॉइंटसह टॉपवर होती. पण आज नॉकआऊट मॅचमध्ये टीम इंडिया ढेपाळली. मेलबर्नवर आता पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये रविवारी फायनल होईल.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 10 Nov 2022 04:34 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: इंग्लंड T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: इंग्लंडने टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा त्यांनी अत्यंत दारुण पराभव केला. एकही विकेट न गमावता एकतर्फी विजय मिळवला. इंग्लंडकडून एलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा फटकावल्या. कॅप्टन जोस बटलरने 49 चेंडूत नाबाद 80 धावा फटकावल्या. इंग्लंडने चार ओव्हर आणि 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

  • 10 Nov 2022 04:20 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: इंग्लंडची जबरदस्त बॅटिंग

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 13 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडची टीम वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतेय. त्यांच्या बिनबाद 140 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 56 आणि एलेक्स हेल्स 80 धावांवर खेळतोय.

  • 10 Nov 2022 04:14 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: इंग्लंडला रोखणं अशक्य

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 12 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडची टीम वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतेय. त्यांच्या बिनबाद 123 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 42 आणि एलेक्स हेल्स 77 धावांवर खेळतोय.

  • 10 Nov 2022 04:06 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: टीम इंडियाला विकेट कधी मिळणार?

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडची टीम वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतेय. त्यांच्या बिनबाद 98 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 37 आणि एलेक्स हेल्स 57 धावांवर खेळतोय.

  • 10 Nov 2022 03:53 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: एलेक्स हेल्सची हाफसेंच्युरी

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: एलेक्स हेल्सने हाफसेंच्युरी झळकावली आहे. त्याने 28 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. यात 1 चौकार आणि 5 षटकार आहेत. 8 ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या बिनबाद 84 धावा झाल्या आहेत.

  • 10 Nov 2022 03:50 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: 7 ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या बिनबाद 75 धावा

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 7 ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या बिनबाद 75 धावा झाल्या आहेत. टीम इंडियाला इंग्लंडची पहिली विकेट कधी मिळणार?

  • 10 Nov 2022 03:45 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: पावरप्लेमध्ये इंग्लंडच्या ओपनर्सनी भारतीय गोलंदाजांना धुतलं

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: पावरप्लेमध्ये इंग्लंडच्या ओपनर्सनी भारतीय गोलंदाजांना धुतलं. 6 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. इंग्लंडच्या बिनबाद 63 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 28 आणि एलेक्स हेल्स 33 धावांवर खेळतोय.

  • 10 Nov 2022 03:36 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: टीम इंडियाच्या गोलंदाजांचा संघर्ष

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: विकेट मिळवण्यासाठी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा संघर्ष सुरु आहे. 4 ओव्हर अखेरीस इंग्लंडच्या बिनबाद 41 धावा झाल्या आहेत.

  • 10 Nov 2022 03:34 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: इंग्लंडची दमदार फलंदाजी

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 3 ओव्हर्समध्ये इंग्लंडच्या बिनबाद 33 धावा झाल्या आहेत. एलेक्स हेल्सनने भुवनेश्वरला षटकार मारला. तो 13 आणि बटलर 18 धावांवर खेळतोय.

  • 10 Nov 2022 03:29 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: दोन ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: अर्शदीप सिंहने दुसरी ओव्हर टाकली. इंग्लंडच्या बिनबाद 21 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 17 आणि एलेक्स हेल्स 2 ही जोडी मैदानात आहे.

  • 10 Nov 2022 03:22 PM (IST)

    जोस बटलर, अॅलेक्स हेल्स मैदानात

    जोस बटलर, अॅलेक्स हेल्स मैदानात

    पहिल्या ओव्हरमध्ये जोस बटलरटचे दोन चौकार

    एका ओव्हरमध्ये इंग्लंड टीमची धावसंख्या 13

  • 10 Nov 2022 03:18 PM (IST)

    इंग्लंडच्या फलंदाजी सुरुवात...

    भुवनेश्वर कुमार टाकणार पहिली ओव्हर

  • 10 Nov 2022 03:07 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: हार्दिक पंड्या लढला, भारताने इंग्लंडला विजयासाठी दिलं चांगलं लक्ष्य

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: टीम इंडियाकडून आज हार्दिक पंड्याने दमदार खेळ दाखवला. त्याने 33 चेंडूत 63 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 4 चौकार, 5 सिक्स मारले. भारताने 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 168 धावा केल्या आहेत.

  • 10 Nov 2022 03:00 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: सॅम करनला धुतलं, हार्दिक पंड्याची हाफसेंच्युरी

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 19 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने सॅम करनला धुतलं. भारताच्या 19 ओव्हरमध्ये 4 बाद 156 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 52 धावांवर खेळतोय.

  • 10 Nov 2022 02:52 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: हाफसेंच्युरीनंतर विराट कोहली आऊट

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: ख्रिस जॉर्डनने 18 वी ओव्हर टाकली. हार्दिक पंड्याने पहिल्या दोन चेंडूंवर 2 सिक्स मारले. विराट कोहलीने या ओव्हरमध्ये हाफसेंच्युरी पूर्ण केली. विराट कोहली हाफसेंच्युरीनंतर लगेच आऊट झाला. त्याने 40 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने चार चौकार, एक षटकार लगावला. 18 ओव्हर अखेरीस भारताच्या 4 बाद 136 धावा झाल्या आहेत.

  • 10 Nov 2022 02:42 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: 16 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 16 ओव्हर्समध्ये भारताच्या 3 बाद 110 धावा झाल्या आहेत. विराट कोहली 48 आणि हार्दिक पंड्या 13 धावांवर खेळतोय.

  • 10 Nov 2022 02:34 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: भारताला वेगाने धावा फटकावण्याची गरज

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी वेगाने धावा फटकावाव्या लागतील. भारताच्या 3 बाद 100 धावा झाल्या आहेत. विराट कोहली आणि हार्दिक पंड्याची जोडी मैदानात आहे.

  • 10 Nov 2022 02:31 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: भारताला धावगती वाढवण्याची गरज

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 14 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला असून भारताच्या 3 बाद 89 धावा झाल्या आहेत. हार्दिक पंड्या 4 आणि विराट कोहली 38 धावांवर खेळतोय.

  • 10 Nov 2022 02:21 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: भारताला मोठा झटका

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: भारताला मोठा झटका बसला आहे. भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव OUT झाला आहे. त्याने 10 चेंडूत 14 रन्स केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार आहे. राशिदच्या गोलंदाजीवर त्याने सॉल्टकडे सोपा झेल दिला.

  • 10 Nov 2022 02:18 PM (IST)

    Ind vs Eng Live Score: सूर्यकुमारची धुवाधार बॅटिंग सुरु

    भारत vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: बेन स्टोक्सच्या 11 व्य ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवने एक षटकार आणि चौकार लगावला. भारताच्या दोन बाद 74 धावा झाल्या आहेत.

  • 10 Nov 2022 02:12 PM (IST)

    Ind vs Eng: 10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण, भारताला धावगती वाढवावी लागेल

    10 ओव्हरमध्ये भारताच्या 2 बाद 62 धावा झाल्या आहेत. विराट कोहली 26 आणि सूर्यकुमार 3 धावांवर खेळतोय.

  • 10 Nov 2022 02:07 PM (IST)

    Ind vs Eng: भारताला दुसरा झटका, रोहित शर्मा OUT

    रोहित शर्माच्या रुपाने भारताला दुसरा झटका बसला आहे. ख्रिस जॉर्डनला फटकावण्याच्या नादात रोहितने सॅम करनकडे झेल दिला. रोहितने 28 चेंडूत 27 धावा केल्या. यात 4 चौकार होते. 9 ओव्हरमध्ये भारताच्या 2 बाद 57 धावा झाल्या आहेत,

  • 10 Nov 2022 02:02 PM (IST)

    Ind vs Eng: रोहित-विराटची जोडी जमली

    भारताच्या 8 ओव्हर्समध्ये एक बाद 51 धावा झाल्या आहेत. रोहित-विराटची जोडी जमली आहे.

  • 10 Nov 2022 01:57 PM (IST)

    Ind vs Eng: पावरप्ले समाप्त

    पावरप्लेमध्ये भारताने सावध सुरुवात केली आहे. भारताच्या एक बाद 38 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 20, विराट कोहली 12 धावांवर खेळतोय. पावरप्लेमध्ये एकूण चार चौकार आणि एक षटकार मारला.

  • 10 Nov 2022 01:52 PM (IST)

    Ind vs Eng: सॅमकरनला दोन चौकार

    पाच ओव्हरमध्ये भारताच्या एक बाद 31 धावा झाल्या आहेत. सॅम करनला या ओव्हरमध्ये रोहितने दोन चौकार मारले.

  • 10 Nov 2022 01:48 PM (IST)

    Ind vs Eng: विराट कोहलीने ख्रिस वोक्सला मारला SIX

    चौथी ओव्हर टाकणाऱ्या ख्रिस वोक्सला या ओव्हरमध्ये विराट कोहलीने कव्हर्समध्ये शानदार सिक्स मारला. 4 ओव्हरमध्ये भारताच्या एक बाद 21 धावा झाल्या आहेत.

  • 10 Nov 2022 01:44 PM (IST)

    Ind vs Eng: तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त एक रन्स

    सॅम करनने तिसरी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये फक्त एक रन्स निघाला. विराट कोहली (4) आणि रोहित शर्माची (2) जोडी मैदानात आहे.

  • 10 Nov 2022 01:41 PM (IST)

    आदित्य ठाकरे उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

    आदित्य ठाकरे उद्या नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

    मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरेंची माहिती

    उद्या दुपारी मी नांदेडमध्ये पोहोचणार आणि राहुल गांधींसोबत चालणार- आदित्य ठाकरे

  • 10 Nov 2022 01:39 PM (IST)

    India vs England: केएल राहुल आऊट

    भारताला केएल राहुलच्या रुपाने पहिला झटका बसला आहे. इंग्लंडकडून दुसरी ओव्हर टाकणाऱ्या ख्रिस वोक्सने राहुलला बाद केलं. भारताच्या 1 बाद 9 धावा झाल्या आहेत. राहुलने 5 चेंडूत 5 रन्स केल्या. यात एक चौकार होता. 2 ओव्हरमध्ये भारताच्या 10 धावा झाल्या आहेत.

  • 10 Nov 2022 01:35 PM (IST)

    India vs England: भारताची फलंदाजी सुरु

    भारत-इंग्लंडच्या सामन्यात पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 6 धावा झाल्या आहेत. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने पहिली ओव्हर टाकली. रोहित शर्मा आणि केएल राहुलची जोडी मैदानात आहे.

  • 10 Nov 2022 01:24 PM (IST)

    India vs England, Live Updates: टीम इंडियात एक बदल

    टीम इंडियाने आज आपल्या टीममध्ये एक महत्त्वाचा बदल केलाय. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतचा टीममध्ये समावेश केलाय.

  • 10 Nov 2022 01:24 PM (IST)

    India vs England, Live Updates: इंग्लंडने जिंकला टॉस

    इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळत नाहीय. डेविड मलानही फिटनेसमध्ये अपयशी ठरला. मार्क वुड, डेविड मलानच्या जागी फिल सॉल्ट आणि ख्रिस जॉर्डनचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

Published On - Nov 10,2022 1:21 PM

Follow us
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.