IND vs ENG 1st Test Day 4 Live : दिवसअखेर एका गड्याच्या बदल्यात भारताचं अर्धशतक, विजयासाठी 157 धावांची आवश्यकता

India vs England 1st Test Day 4 Live Score : सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रांचाच खेळ होऊ शकला. इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 278 धावा उभारल्या आहेत.

IND vs ENG 1st Test Day 4 Live : दिवसअखेर एका गड्याच्या बदल्यात भारताचं अर्धशतक, विजयासाठी 157 धावांची आवश्यकता

Ind vs Eng 1st Test, Day 4 : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. आज चौथ्या दिवशी सामना अतिशय मनोरंजक स्थितीत पोहोचला आहे. आज इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांमध्ये गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आलं. कर्णधार जो रुटच्या शतकी (109) खेळीच्या जोरावर इंग्लंडने 303 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात भारताला 95 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भारताला आता 121 षटकांमध्ये 209 धावा करण्याचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 209 धावांच्या आत भारताचे 10 गडी बाद करावे लागतील.

Match Highlights

 • दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचा खेळ

  सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी प्रत्येकी एका सत्राचा खेळ पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी 98 षटकांचा खेळ होणार आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशीच्या खेळाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 • भारताकडे महत्त्वपूर्ण आघाडी

  पहिल्या डावात भारतीय संघाला 95 धावांची आघाडी मिळाली आहे. ही आघाडी जरी फार मोठी नसली तरी या सामन्यात निर्णायक ठरणार आहे. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांची जादू चालली तर भारतीय संघाला दुसऱ्या डावात 100-125 धावांचं लक्ष्य मिळू शकतं, असे क्रिकेट जाणकारांचं मत आहे. त्यामुळे या सामन्यात आता भारताचं पारडं जड आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 07 Aug 2021 23:34 PM (IST)

  दिवसअखेर एका गड्याच्या बदल्यात भारताचं अर्धशतक, विजयासाठी 157 धावांची आवश्यकता

  दिवसअखेर भारताने 1 बाद 52 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 157 धावांची आवश्यकता आहे. सलामीवीर रोहित शर्मा (12) आणि चेतेश्वर पुजारा (12) दोघे उद्याच्या डावाला सुरुवात करतील.

 • 07 Aug 2021 23:14 PM (IST)

  भारताला पहिला झटका, लोकेश राहुल 26 धावांवर बाद

  img

  भारताने पहिली विकेट गमावली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने राहुलला जोस बटलरकरवी झेलबाद केलं. राहुलने 26 धावांचं योगदान दिलं. (भारत 34/1)

 • 07 Aug 2021 22:30 PM (IST)

  भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, 121 षटकात 209 धावांचं लक्ष्य

  भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल मैदानात. 121 षटकात भारताला 209 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. तर हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 209 धावांच्या आत भारताचे 10 गडी बाद करावे लागतील.

 • 07 Aug 2021 22:21 PM (IST)

  इंग्लंडचा दुसरा आटोपला, 10 गड्यांच्या बदल्यात 303 धावांपर्यंत मजल

  इंग्लंडचा दुसरा आटोपला, 10 गड्यांच्या बदल्यात  303 धावांपर्यंत मजल, त्यामुळे भारताला हा सामना जिंकायचा असेल तर आता 208 धावा कराव्या लागतील

 • 07 Aug 2021 22:09 PM (IST)

  इंग्लंडला आणखी एक झटका, स्टुअर्ट ब्रॉड तंबूत परतला, बुमराहची कमाल

  इंग्लंडला नववा झटका, जसप्रीत बुमराहने त्रिफळा स्टुअर्ट ब्रॉडचा त्रिफळा उडवला. स्टुअर्ट ब्रॉड शून्यावर तंबूत परतला

 • 07 Aug 2021 21:42 PM (IST)

  भारताला सातवं यश, जो रुट 109 धावांवर बाद

  img

  कर्णधार जो रुटची शतकी खेळी संपुष्टात आली आहे. जसप्रीत बुमराहने रुटला 109 धावांवर असताना यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 274/7)

 • 07 Aug 2021 21:13 PM (IST)

  जो रुटचं शानदार शतक, 157 धावांच्या आघाडीसह इंग्लंड सुस्थितीत

  img

  एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना संयमी फलंदाजी करणाऱ्या कर्णधार जो रुटने शानदार शतक फटकावलं आहे. रुटने 154 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. (इंग्लंड 252/6)

 • 07 Aug 2021 20:58 PM (IST)

  भारताला सहावं यश, शार्दुल ठाकूरकडून जोस बटलरची शिकार

  img

  भारताला सहावी विकेट मिळाली आहे. शार्दुल ठाकूरने जोस बटलरला 17 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (इंग्लंड 237/6)

 • 07 Aug 2021 20:31 PM (IST)

  चहापानापर्यंत इंग्लंडची 5 बाद 235 पर्यंत मजल, 140 धावांची आघाडी, जो रुट नाबाद 96,

  चहापानापर्यंत इंग्लंडने 5 बाद 235 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे इंग्लंडला 140 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार जो रुट नाबाद 96 धावांवर तर जोस बटलर 15 धावांवर खेळतोय.

 • 07 Aug 2021 20:06 PM (IST)

  भारताला पाचवं यश, शार्दुल ठाकूरकडून डॅन लॉरेन्सची शिकार

  img

  65 व्या षटकात शार्दुल ठाकूरने भारताला पाचवी विकेट मिळवून दिली. शार्दुलने डॅन लॉरेन्सला 25 धावांवर असताना पायचित केलं. (इंग्लंड 211/5)

 • 07 Aug 2021 20:00 PM (IST)

  इंग्लंडचं द्विशतक

  img

  64 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावत डॅन लॉरेन्सने इंग्लंडचं द्विशतक साजरं केलं. इंग्लंडकडे आता 107 धावांची आघाडी आहे. (इंग्लंड 202/4)

 • 07 Aug 2021 19:30 PM (IST)

  इंग्लंडचा चौथा फलंदाज माघारी, जॉनी बेअरस्टो 30 धावांवर बाद

  img

  इंग्लंडचा चौथा फलंदाज माघारी परतला आहे. मोहम्मद सिराजने जॉनी बेअरस्टोला 30 धावांवर असताना रवींद्र जाडेजाकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 177/4)

 • 07 Aug 2021 18:42 PM (IST)

  इंग्लंडला तिसरा झटका, डॉम सिब्ले 28 धावांवर बाद

  img

  इंग्लंडचा तिसरा फलंदाज बाद झाला आहे. जसप्रीत बुमराहने सलामीवीर डॉम सिब्ले (28) याला यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 135/3)

 • 07 Aug 2021 18:13 PM (IST)

  लंचनंतर दुसरं सत्र सुरु, रुट-सिब्ले जोडी मैदानात, इंग्लंडकडे 24 धावांची आघाडी

  लंच ब्रेकनंतर आजच्या दिवसातील खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. कर्णधार जो रुट (57) आणि डॉम सिब्ले (27) ही जोडी मैदानात उतरली आहे. इंग्लंडने 2 बाद 120 धावांपर्यंत मजल मारल्यामुळे इंग्लंडला 25 धावांची आघाडीदेखील मिळाली आहे.

 • 07 Aug 2021 17:36 PM (IST)

  जो रुटचं अर्धशतक

  img

  जो रुटने अवघ्या 68 चेंडूत अर्धशतक फटकावलं आहे. 38 व्या षटकात मोहम्मद शमीला दोन चौकार फटकावत रुटने अर्धशतक पूर्ण केलं. (इंग्लंड 118/2)

 • 07 Aug 2021 17:16 PM (IST)

  सिब्ले-रुटची अर्धशतकी भागीदारी, इंग्लंडचं शतक

  सलामीवीर डॉम सिब्ले आणि कर्णधार जो रुटने संयमी अर्धशतकी भागीदारी रचली आहे. दोघांनी आतापर्यंत 55 धावांची भागीदारी रचली आहे. सोबतच इंग्लंडने शतक पूर्ण केलं आहे. इंग्लंडकडे आता 7 धावांची आघाडीदेखील आहे. (इंग्लंड 35 षटकात 102/2)

 • 07 Aug 2021 16:40 PM (IST)

  सिब्ले-रुटची संयमी वाटचाल

  पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने आज सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्याने सलामीवीर डॉम सिब्ले आणि कर्णधार जो रुटने संयमी खेळ सुरु केला आहे. दोघांनी आतापर्यंत 31 धावांची भागीदारी रचली आहे. (इंग्लंड 26 षटकात 77/2)

 • 07 Aug 2021 16:20 PM (IST)

  दुसरा राऊंड सुरु

  भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत सुरु झाली  आहे. बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळतोय.कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होतेय.  दोन्ही खेळाडू सावध खेळ करत आहेत

  दोन्ही खेळाडूंचे गुण

  नियाझबेकोव : 00

  बजरंग पुनिया : 02

 • 07 Aug 2021 16:17 PM (IST)

  बजरंग पुनियाला पहिला गुण

  भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत सुरु झाली  आहे. बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळतोय.कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होतेय.  दोन्ही खेळाडू सावध खेळ करत आहेत

  दोन्ही खेळाडूंचे गुण

  नियाझबेकोव : ००

  बजरंग पुनिया : ०१

 • 07 Aug 2021 16:04 PM (IST)

  इंग्लंडला दुसरा झटका, झॅक क्रॉली 6 धावांवर बाद

  img

  भारतीय गोलंदाजांचा इंग्लंडला दुसरा झटका, जसप्रीत बुमराहकडून झॅक क्रॉलीची (6) शिकार, बुमराहने क्रॉलीला 6 धावांवर असताना यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. (46/2)

 • 07 Aug 2021 15:50 PM (IST)

  भारताला पहिलं यश, सलामीवीर बर्न्स 18 धावांवर बाद

  img

  आजच्या दिवसात भारतीय गोलंदाजांना पहिलं यश मिळालं आहे. मोहम्मद सिराजने सलामीवीर बर्न्स याला 18 धावांवर असताना यष्टीरक्षक रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. (इंग्लंड 37/1)

 • 07 Aug 2021 15:48 PM (IST)

  इंग्लंडची सलामीची जोडी मैदानात

  कालच्या बिनबाद 25 धावांवरुन आज इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने खेळाला सुरुवात केली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI