AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 : गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीची पोकळी अशी भरून काढली, आता या खेळाडूवर असेल मदार

आयपीएल 2024 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. तर 24 मार्चला मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने असतील. पण गुजरातचे महत्त्वाचे खेळाडू आता संघात नाही. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलवर दबाव वाढला आहे. असं असताना एक गूड न्यूज मिळाली आहे.

IPL 2024 : गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीची पोकळी अशी भरून काढली, आता या खेळाडूवर असेल मदार
| Updated on: Mar 20, 2024 | 9:52 PM
Share

मुंबई : आयपीएल स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण या दोन संघात बरीच उलथापालथ झाली आहे. हार्दिक पांड्याच्या हाती आता गुजरात नाही तर मुंबईची कमान असणार आहे. तर गुजरातची धुरा शुबमन गिलच्या हाती आहे. पण गुजरात संघावर सर्वाधिक दडपण आहे. कारण महत्त्वाचे खेळाडू संघात नाहीत. आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमी या स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे गोलंदाजीला एका अर्थाने लकवा मारल्यासारखं झालं आहे. मोहम्मद शमीची जागा भरणं वाटतं तितकं सोपं नाही. मोक्याच्या क्षणी गडी बाद करण्याची क्षमता मोहम्मद शमीमध्ये आहे. तसा गोलंदाज सापडणं कठीण आहे. असं सर्व असताना मोहम्मद शमीसारखा नाही पण त्याची जागा भरून काढणारा गोलंदाज सापडला आहे. टीम मॅनेजमेंटने त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे.

जखमी मोहम्मद शमीची जागा संदीप वॉरियर घेणार आहे. संदीप वॉरियर आतापर्यं 5 आयपीएल सामने खेळला आहे. गुजरात टायटन्सने त्याला 50 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी करत संघात घेतलं आहे. 32 वर्षीय संदीप वॉरियरला आयपीएल खेळण्याचा तितका अनुभव नाही. 2019 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून डेब्यू केलं होतं. पण जास्त सामने खेळला नाही. त्याने पाच सामन्यात 7.88 इकोनमी रेटने 2 गडी बाद केले. 2019 मध्ये खेळलेल्या 3 सामन्यात 2 गडी बाद केले होते. तर 2020 आणि 2021 मध्ये एकही गडी बाद करता आला नाही.

गुजरातचा संपूर्ण संघ : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन आणि संदीप वॉरियर.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.