KKR vs MI : कोलकाता मुंबई सामन्यादरम्यान विराटचा संघ व्हेंटिलेटरवर! काय झालं तर होणार फायदा? समजून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेतील 60वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. कोलकात्याने आधीच प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. तर मुंबई इंडियन्सचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मग असं असूनही आरसीबीला या सामन्यातून काय मिळणार? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. चला जाणून घेऊयात काय ते..

आयपीएल 2024 स्पर्धेचा अंतिम टप्पा सुरु आहे. साखळी फेरीतील सामने शेवटच्या टप्प्यात असून मुंबई आणि पंजाब संघ अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर पडले आहेत.कोलकाता आणि राजस्थानने प्लेऑफमधील आपलं स्थान पक्कं केलं आहे. तर हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, लखनौ, बंगळुरु आणि गुजरातचं गणित जर तरवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे कोलकाता आणि मुंबईच्या इतर संघांवर तसा काही फायदा होणार नाही. कारण दोन्ही संघांचं प्लेऑफचं चित्र स्पष्ट आहे. मग या सामन्यात कोण जिंकलं तर सर्वाधिक फायदा होईल असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डनवर सामना होत आहे. मुंबई इंडियन्स 12 सामन्यात 8 वेळा पराभूत आणि 4 वेळा जिंकला आहे. 8 गुणांसह मुंबईचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. तर कोलकात्याचा संघ 11 पैकी 8 सामन्यात विजय आणि +1.453 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. आता या सामन्याचा आरसीबीला काय फायदा होईल ते जाणून घेऊयात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिक सातव्या स्थानावर आहे. आरसीबीने 12 पैकी 7 सामन्यात पराभव, तर 5 सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबीचे 10 गुण आणि +0.217 नेट रनरेट आहे. उर्वरित दोन सामने जिंकले तर आरसीबीचे 14 गुण होतील. त्यामुळे कोलकात्याने जिंकणं हे आरसीबीसाठी फायद्याचं ठरू शकतं. कारण कोलकात्याचे 16 गुण आहेत. कोलकाता आणि राजस्थानने उर्वरित सामन्यात जिंकणं हे आरसीबीच्या पथ्यावर पडेल. कोलकात्याचे सामना मुंबई, गुजरात आणि राजस्थान सोबत आहेत. कोलकात्याने या तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर 22 गुण होतील. त्यामुळे कोलकात्याचा दावा आणखी स्पष्ट होईल. दुसरीकडे मुंबई गुण कमवले तर वरच्या बाजूला काहीच परिणाम होणार नाही.
दुसरीकडे राजस्थानचा सामना चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि कोलकात्यासोबत आहे. या सामन्यात राजस्थानने काहीही करून चेन्नईला पराभूत करणं गरजेचं आहे. तर उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर 20 गुण होतील. त्यामुळे प्लेऑफचा दावा असणाऱ्या राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानी राहील. त्यामुळे खरी लढत ही तिसऱ्या आणि चौथ्या संघासाठी होईल. त्यामुळे सातव्या स्थानावर असलेल्या आरसीबीला आणखी एक संधी मिळेल. पण कोलकात्याने हा सामना गमावला तर मात्र प्लेऑफचं चित्र आणखी किचकट होईल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, अंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क, हर्षित राणा.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, थिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, नुवान तुषारा, जसप्रीत बुमराह.
