AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा हैदराबादवर भारी, आधी कमी धावांवर रोखलं आणि नंतर 7 विकेट राखून केलं पराभूत

आयपीएल 2025 स्पर्धेतील दहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगला. .या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी घेत 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावा दिल्या. दिल्ली कॅपिटल्सला हे लक्ष्य विकेट गमवून गाठलं.

दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा हैदराबादवर भारी, आधी कमी धावांवर रोखलं आणि नंतर 7 विकेट राखून केलं पराभूत
Image Credit source: delhi capital twitter
| Updated on: Mar 30, 2025 | 6:48 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड सुरु आहे. पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर आता सनरायझर्स हैदराबादला पराभूत केलं आहे. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या उभारून दिल्ली कॅपिटल्सला घेरण्याचा प्रयत्न होता. पण भलतंच घडलं. कारण सनरायझर्स हैदराबाद 18.4 षटकात सर्व गडी गमवून 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं. आयपीएलमधील फलंदाजांची आक्रमकता पाहून 164 या धावा आरामात गाठल्या जातील यात काही शंका नव्हती. दिल्ली कॅपिटल्सने या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. उपकर्णधार फाफ डुप्लेसिस आणि फ्रेझरने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 81 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यासाठी जीशान अन्सारीला बोलवलं. त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या फाफ डुप्लेसिसला गुंतवलं. त्याने 27 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार मारत 50 धावा केल्या. त्यानंतर जेक फ्रेजर मॅकगर्कला फिरकीत अडकवलं आणि कॅच अँड आऊट केलं. तो 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुलही त्याच्या फिरकीत फसला आणि त्रिफळाचीत होत तंबूत परतला.

तीन विकेट पडल्यानंतर अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्सने विजयी धावा पूर्ण केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून जीशान अन्सारी वगळता एकही गोलंदाज चालला नाही. जीशान अन्सारीने 4 षटकात 42 धावा देऊन तीन गडी बाद केले. पण दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो मिचेल स्टार्क.. मिचेल स्टार्कने 3.40 षटकात 35 धावा देत 5 गडी बाद केले.  तर कुलदीप यादवने फिरकीच्या जाळ्यात तीन जणांना अडकवलं. दिल्ली कॅपिटल्सने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली आणि विजश्री खेचून आणला.

दोन्ही संघाचे खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.