AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs DC: पराभवानंतर काय चुकलं रजत पाटीदारने सांगितलं, तर केएल राहुलने अक्षरची बाजू मांडली

आयपीएल 2026 स्पर्धेतील 26व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला 6 विकेट राखून पराभवाची धूळ चारली. या सामन्यात आरसीबीने विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्लीने 19.5 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं.

RCB vs DC: पराभवानंतर काय चुकलं रजत पाटीदारने सांगितलं, तर केएल राहुलने अक्षरची बाजू मांडली
RCB vs DC: पराभवानंतर काय चुकलं रजत पाटीदारने सांगितलं, तर केएल राहुलने अक्षरची बाजू मांडलीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 18, 2026 | 8:09 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमवून 175 धावा केल्या. तसेच विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 19.5 षटकात चार गडी गमवून पूर्ण केलं. यासह दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना जिंकून टॉप 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. तर आरसीबीचं नंबर 1 होण्याचं स्वप्न या पराभवामुळे भंगलं आहे. आरसीबीला 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. या सामन्यातील पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने बाजू मांडली. संघाचं काय चुकलं आणि पराभवाला काय कारण ठरलं हे त्याने सामन्यानंतर सांगितलं. हा सामना अतितटीचा होता, पण फलंदाजीत चुका केल्याचं त्याने सामन्यानंतर सांगितलं.

रजत पाटीदार म्हणाला की, सामना अगदी जवळ आला होता. मला वाटतं की आम्ही 15-20 धावांनी कमी पडलो.आम्ही सुरुवात चांगली केली, विशेषतः विराट कोहली आणि सॉल्टने चांगली सुरुवात करून दिली. पण तिथून पुढे 12-13 षटकांनंतर, आम्ही काही विकेट गमावल्या आणि त्यामुळे आम्ही मागे पडलो. मला वाटतं की पहिल्या डावात खेळपट्टी थोडी लयीत होती, असं मी म्हणेन. पण मला वाटतं की ज्याप्रकारे आम्ही शेवटच्या षटकात धावा वाढवल्या, ते आमच्यासाठी एक सकारात्मक चिन्ह आहे. मी गोलंदाजांशी चर्चा करत होतो की तुम्ही जे काही कराल ते स्पष्ट ठेवा. ही एक मोठी स्पर्धा आहे, पण मला वाटतं की आम्ही मागे जाऊन आत्मपरीक्षण करू की आमच्याकडून कुठे चुका झाल्या आणि आम्ही त्या सुधारू.

अक्षर पटेलला दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडून गेला. त्यामुळे प्रभारी कर्णधार म्हणून केएल राहुलने संघाची बाजू मांडली. केएल राहुल म्हणाला की, स्टब्स आणि मिलर यांच्यावर विश्वास होता. ते दक्षिण आफ्रिका आणि फ्रँचायझी क्रिकेटसाठी रोज हे करतात. त्यामुळे, आम्हाला हेही माहीत होतं की शेवटची दोन षटकं आरसीबीसाठी जुगार असणार आहे. आम्हाला हेही माहीत होतं की कदाचित रोमारियो शेफर्ड किंवा सुयश शर्मा गोलंदाजी करतील. आमच्या फलंदाजांना शेवटच्या दोन षटकांत दोन षटकार मारण्याची चांगली संधी मिळाली. खरंतर सामना 20व्या षटकापर्यंत जावा असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण आम्ही हा विजय स्वीकारतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...