AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Orange Cap: दिल्ली गुजरात सामन्यानंतर ऑरेंज कॅपचा मानकरी कोण? जाणून घ्या

IPL 2024 Purple Cap, Highest run scorer : आयपीएल स्पर्धेतील 32 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात काही खास घडलं नाही. त्यामुळे ऑरेंज कॅपचे मानकरी आहे तसेच राहिले आहेत. शुबमन गिलला संधी होती पण त्याचा डाव झटपट आटोपला.

IPL 2024 Orange Cap: दिल्ली गुजरात सामन्यानंतर ऑरेंज कॅपचा मानकरी कोण? जाणून घ्या
| Updated on: Apr 17, 2024 | 10:26 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेतील 32 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यावर पूर्णपणे दिल्ली कॅपिटल्सची पकड दिसली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला काही खास करता आलं नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी गुजरातची दाणादाण उडवली. एकाही फलंदाजाला डोकं वर काढू दिलं नाही. त्यामुळे ऑरेंज कॅपच्या गुणतालिकेला जराही धक्का बसला नाही. ऑरेंज कॅप विराट कोहलीच्या डोक्यावर कायम आहे. त्यामुळे आता ही कॅप कोण खेचून घेतं याची उत्सुकता ताणली गेली आहे. कारण ज्या ज्या खेळाडूंना संधी असते ती त्यांना घेता येत नाही. तोपर्यंत विराट कोहली या शर्यतीत पुढे निघून जातो. त्यामुळे विराट कोहलीला मागे टाकणं खूपच कठीण झालं आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचा डाव 3 धावांवर आटोपला होता. मात्र तरीही त्याला मागे टाकता आलं नाही. जोस बटलरची दोन शतकं, रोहित आणि सुनील नरीनचं प्रत्येकी एक शतकही अव्वल स्थान हिरावून घेऊ शकलं नाही.

विराट कोहलीने आतापर्यंत 7 सामने खेळले असून 1 शतक आणि दोन अर्धशतकांच्या जोरावर 361 धावा केल्या आहेत. नाबाद 113 ही सर्वोत्तम खेळी आहे. रियान पराग या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 7 सामन्यात त्याने 3 अर्धशतकांच्या जोरावर 318 धावा केल्या. राजस्थानविरुद्ध शतकी खेळी करणारा सुनील नरीन 276 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. संजू सॅमसन 276 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. सुनील नरीनच्या तुलनेत संजू सॅमसनचा स्ट्राईक रेट कमी आहे. शुबमन गिल दिल्लीविरुद्ध काही खास करू शकला नाही. 6 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याचा एकूण 263 धावा असून पाचव्या स्थानी आहे. रोहित शर्माने पंजाब किंग्सविरुद्ध 3 धावा करताच त्याचं टॉप 5 मधील स्थान निघून जाईल.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केला. हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. कारण गुजरात टायटन्सला 17.3 षटकात सर्वबाद करत 89 धावांवर रोखलं. विजयासाठी मिळालेलं 90 धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 4 गडी गमवून पूर्ण केलं. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमार प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 3 गडी बाद केले. तर इशांत शर्माने 2, ट्रिस्टन स्टब्सने 1 आणि खलिल अहमदने 1 गडी बाद केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.