IPL Players Auction 2022: 549 कोटींमध्ये 203 खेळाडूंची खरेदी

| Updated on: Feb 14, 2022 | 3:56 PM

IPL Players Auction 2022: 549 कोटींमध्ये 203 खेळाडूंची खरेदी
Indian Premier league Auction LIVE

बंगळुरु: मागच्या दोन दिवसांपासून बंगळुरुमध्ये सुरु असलेला TATA IPL 2022 Mega Auction चा सोहळा अखेर संपला आहे. एकूण 600 खेळाडूंची मेगा ऑक्शनसाठी निवड झाली होती. पण त्यातल्या 203 खेळाडूंची फ्रेंचायजींनी खरेदी केली. यंदा आयपीएलमध्ये आठ नाही, तर दहा संघ मैदानावर खेळताना दिसणार आहे. यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow super giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat titans) हे दोन नवीन संघ आहेत. या मेगा ऑक्शनआधी जुन्या आठ फ्रेंचायजींनी चार खेळाडूंना रिटेन केलं, तर नव्याने आलेल्या दोन संघांनी प्रत्येकी तीन खेळाडू ड्राफ्ट पद्धतीने निवडले. नियमामनुसार, प्रत्येक फ्रेंचायजीकडे खेळाडू विकत घेण्यासाठी 90 कोटींची रक्कम होती. खेळाडूंना रिटेन आणि ड्राफ्ट केल्यानंतर प्रत्येक फ्रेंचायजीच्या पर्समध्ये जी रक्कम उरली, त्यातून त्यांना मेगा ऑक्शनमध्ये बोली लावायची होती.

पंजाब किंग्सच्या पर्समध्ये सर्वाधिक 72 कोटीची रक्कम होती. त्यामुळे मागचे दोन दिवस ते खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसले. इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. दीपक चहर, श्रेयस अय्यर, आवेश खान, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा या भारतीय खेळाडूंना 10 कोटी व त्यापेक्षा जास्त रक्कम मिळाली. अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण न केलेल्या अनकॅप्ड खेळाडूंवरही मोठी बोली लागली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Feb 2022 09:27 PM (IST)

    500 कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च

    यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये 1O संघांनी एकूण 203 खेळाडूंना विकत घेतलं. यात 66 परदेशी खेळाडू आहेत. या सर्व खेळाडूंवर फ्रेंचायजींनी 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च केली.

  • 13 Feb 2022 09:10 PM (IST)

    लिलावाचा मेगा शो संपला

    TATA IPL 2022 Auction चा मेगा शो संपला आहे. दोन दिवस चाललेल्या या लिलावात 10 फ्रेंचायजींनी संघ बांधणीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. आता फक्त स्पर्धा सुरु होण्याची प्रतिक्षा आहे.

  • 13 Feb 2022 09:04 PM (IST)

    फॅबियन ऐलनला MI ने घेतलं विकत

    वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर फॅबियन ऐलनला 75 लाख रुपयाच्या बेस प्राइसला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं.

  • 13 Feb 2022 09:03 PM (IST)

    आर्यन जुयालला मुंबईने घेतलं विकत

    दिल्लीचा फलंदाज आर्यन जुयालला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयाच्या बेस प्राइसला विकत घेतलं.

  • 13 Feb 2022 08:59 PM (IST)

    पुण्याचा विक्की ओस्तवाल दिल्लीकडे

    विक्की ओस्तवालला दिल्ली कॅपिटल्सने बेस प्राइस 20 लाख रुपयांना विकत घेतलं.

  • 13 Feb 2022 08:58 PM (IST)

    मोहम्मद नबीला KKR ने घेतलं विकत

    मोहम्मद नबीला KKR ने 1 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याची बेस प्राइस एक कोटी रुपये होती.

  • 13 Feb 2022 08:56 PM (IST)

    इशांत शर्मा अनसोल्ड

    इशांत शर्मा अनसोल्ड. कोणीही त्याला खरेदीदार मिळाला नाही.

  • 13 Feb 2022 08:54 PM (IST)

    उमेश यादव केकेआरकडे

    काल अनसोल्ड ठरलेल्या उमेश यादवला केकेआरने बेस प्राइस दोन कोटी रुपयांना विकत घेतलं.

  • 13 Feb 2022 08:34 PM (IST)

    अखेरच्या सत्रात अनसोल्ड ठरलेले खेळाडू

    Rohan Rana, Khizar Dafedar, Duan Jansen, Bharat Sharma, Chinntla Readdi,Shubham Sharma ,Pratyush Singh ,Gerald Coetzee ,Shivank Vashisth,Blessing Muzarabani, Colin Munro, Matheesha Pathirana, Utkarsh Singh, Atit Sheth, Kane Richardson, Scott Kuggeleijn, Akeal Hosein, Moises Henriques, B Sai Sudharsan, Sameer Rizvi, Tanmay Agarwal, Andrew Tye, Reece Topley

  • 13 Feb 2022 08:23 PM (IST)

    अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

    अर्जुन तेंडुलकरच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांसह बोली लावली. त्यानंतर गुजरात सुपरजायंट्सने अर्जुनसाठी 25 लाखांची बोली लावली. अखेर मुंबईने 30 लाखांच्या बोलीवर अर्जुन तेंडुलकरला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 08:21 PM (IST)

    युवा खेळाडंना संधी

    लखनौ सुपरजायंट्सने मयंक यादव, राजस्थान रॉयल्सने कलुदीप यादव, चेन्नई सुपरकिंग्सने के. भगत वर्मा आणि कोलकाता नाईट रायडर्सने रमेश कुमार हे युवा खेळाडू 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केले.

  • 13 Feb 2022 08:18 PM (IST)

    वरुण अॅरॉनसाठी गुजरातची 50 लाखांची बोली

    गुजरात टायटन्सनने 50 लाखांच्या बोलीवर वरुण अॅरॉनला आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 08:12 PM (IST)

    तीन युवा खेळाडू मुंबईच्या संघात

    मुंबई इंडियन्सने रमनदीप सिंह, हृतिक शोकीन आणि राहुल बुद्धी हे तीन युवा खेळाडू 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर आपल्या ताफ्यात सामावून घेतले.

  • 13 Feb 2022 08:11 PM (IST)

    बेनी हॉवेल पंजाबच्या संघात

    40 लाख रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्सचे मालक नेस वाडिया यांनी बेनी हॉवेल हा खेळाडू आपल्या संघात घेतला.

  • 13 Feb 2022 08:09 PM (IST)

    टिम साऊथी किंग खानच्या संघाकडून खेळणार

    कोलकाता नाईट रायडर्सने 1.50 कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज टिम साऊथला आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 08:07 PM (IST)

    दोन युवा खेळाडू राजस्थानच्या ताफ्यात

    कोलकाता नाईट रायडर्सने तेजस बरोका आणि ध्रुव जुरेल हे दोन युवा खेळाडू 20 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर खरेदी केले.

  • 13 Feb 2022 08:06 PM (IST)

    पंजाबकडून सलग तीन खेळाडूंची खरेदी

    पंजाब किंग्सने 75 लाखांच्या बोलीवर Nathan Ellis, 50 लाखांच्या बोलीवर Bhanuka Rajapaksa, आणि 20 लाखांच्या बेस प्राईसवर अथर्व तायडे हे तीन खेळाडू खरेदी केले.

  • 13 Feb 2022 08:03 PM (IST)

    ग्लेप फिलिप्स आणि अझलाक फारुकी हैदराबदमध्ये

    सनरायझर्स हैदराबादने 1.50 कोटींच्या बोलीवर ग्लेप फिलिप्स आणि 50 लाखांच्या बोलीवर अझलाक फारुकी हे दोन खेळाडू खरेदी केले.

  • 13 Feb 2022 08:02 PM (IST)

    करुन नायरसाठी राजस्थानने मोजले 1.40 कोटी

    कसोटी क्रिकेटमधला त्रिशतकवीर करुण नायरसाठी झालेलं बिडींग वॉर राजस्थान रॉयल्सने जिंकलं. 1.40 कोटींच्या बोलीवर हा खेळाडू त्यांनी खरेदी केला.

  • 13 Feb 2022 08:00 PM (IST)

    एव्हिन लुईस लखनौच्या गोटात

    लखनौ सुपरजायंट्सने वेस्ट इंडिजचा आघाडीचा फलंदाज एव्हिन लुईसला 2 कोटींच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 07:57 PM (IST)

    चार आंतरराष्ट्रीय खेळाडू अनसोल्ड

    Mujtaba Yousuf, Charith Asalanka, Rahmanullah Gurbaz, Ben McDermott

  • 13 Feb 2022 07:46 PM (IST)

    अॅलेक्स हेल्स केकेआरकडून खेळणार

    1.5 कोटींच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्सने अॅलेक्स हेल्स या खेळाडूला आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 07:45 PM (IST)

    कर्ण शर्मा बँगलोरकडून खेळणार

    लेगस्पिनर कर्ण शर्मा हा युवा भारतीय खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणार आहे. 20 लाखांच्या बेस प्राईसवर बँगलोरने त्याला खरेदी केलं.

  • 13 Feb 2022 07:42 PM (IST)

    जिमी नीशम, शेल्डन कॉट्रेल अनसोल्ड

    न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम, वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेल्डन कॉट्रेल आणि कैस अहमद अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 07:40 PM (IST)

    ख्रिस जॉर्डन टीम धोनीकडून खेळणार

    चेन्नई सुपरकिंग्सने 3.60 कोटींच्या बोलीवर ख्रिस जॉर्डन या इंग्लिश खेळाडूला आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 07:37 PM (IST)

    विष्णू विनोद ऑरेंज आर्मीकडून खेळणार

    विष्णू विनोद या अनकॅप्ड भारतीय खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सने बोली लावली होती. मात्र हैदराबादने 50 लाखांच्या बोलीवर या खेळाडूला आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 07:35 PM (IST)

    अनलोमप्रीत सिंह मुंबईच्या, सी. हरी निशांत, एन जगदीशन चेन्नईच्या संघात

    मुंबईने अनलोमप्रीत सिंह आणि चेन्नईने , सी. हरी निशांत, एन जगदीशन हे खेळाडू बेस प्राईस 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

  • 13 Feb 2022 07:34 PM (IST)

    उमेश यादव पुन्हा अनसोल्ड

    भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादव आज पुन्हा एकदा अनसोल्ड गेला आहे. या खेळाडूवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही.

  • 13 Feb 2022 07:33 PM (IST)

    मॅथ्यू वेड गुजरातच्या संघात

    दिवसाच्या अखेरच्या सत्रात गुजरातने तिसरा खेळाडू खरेदी केला आहे. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडसाठी गुजरातने 2 कोटी 40 लाख रुपये मोजले. पंजाबने या खेळाडूसाठी 2.20 कोटी रुपयांची बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 07:31 PM (IST)

    ऋद्धीमान साहासाठी गुजरात-चेन्नईत बिडींग वॉर

    ऋद्धीमान साहासाठी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये बिडींग वॉर पाहायला मिळालं. अखेर गुजरातने 1 कोटी 90 लाख रुपयांच्या बोलीवर हा खेळाडू आपल्या ताफ्यात घेतला.

  • 13 Feb 2022 07:29 PM (IST)

    सॅम बिलिंग्स किंग खानच्या संघात

    कोलकाता नाईट रायडर्सने सॅम बिलिंग्सला त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं.

  • 13 Feb 2022 07:29 PM (IST)

    शाकिब अल हसन पुन्हा एकदा अनसोल्ड

    बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आज पुन्हा एकदा अनसोल्ड गेला आहे. या खेळाडूवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही.

  • 13 Feb 2022 07:27 PM (IST)

    डेव्हिड मिलर गुजरातच्या ताफ्यात

    द. आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरसाठी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन फ्रँचायझींमध्ये बिडींग वॉर पाहायला मिळालं. अखेर गुजरातने 3 कोटी रुपयांच्या बोलीवर या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 06:18 PM (IST)

    अरुणय सिंह पिंक आर्मीमध्ये

    राजस्थान रॉयल्सने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये अरुणय सिंह हा युवा खेळाडू खरेदी केला.

  • 13 Feb 2022 06:16 PM (IST)

    अशोक शर्मा कोलकात्याच्या संघात

    कोलकाता नाईट रायडर्सने 55 लाख रुपयांमध्ये अशोक शर्मा हा युवा खेळाडू खरेदी केला.

  • 13 Feb 2022 06:14 PM (IST)

    अंश पटेल पंजाबच्या ताफ्यात

    पंजाब किंग्सने अंश पटेल हा युवा खेळाडू 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केला.

  • 13 Feb 2022 06:13 PM (IST)

    युवा खेळाडू अनसोल्ड

    हृत्विक शौकी, निनाद रथ्वा, मुकेश कुमारसिंह, ब्लेसिंग मुजार्बानी, डेव्हिड, वाईली, अमित अली आणि ललित यादव हे युवा खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 06:12 PM (IST)

    मोहम्मद अरशद मुंबईच्या ताफ्यात

    मुंबईने मोहम्मद अरशद, लखनौने करण शर्मा, हैदराबादने शशांक सिंह आणि सौरभ दुबे, पंजाब किंग्सने बलतेज ढांढा हे चार खेळाडू 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले.

  • 13 Feb 2022 06:09 PM (IST)

    काईल मेयर्स लखनौच्या संघात

    लखनौ सुपरजायंट्सने 50 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये काईल मेयर्स हा खेळाडू खरेदी केला.

  • 13 Feb 2022 06:06 PM (IST)

    प्रथम सिंह किंग खानच्या संघात

    किंग खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये प्रथम सिंह हा खेळाडू खरेदी केला.

  • 13 Feb 2022 06:05 PM (IST)

    ऋत्विक चॅटर्जी पंजाब किंग्सच्या ताफ्यात

    ऋत्विक चॅटर्जी हा खेळाडू पंजाब किंग्सने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केला.

  • 13 Feb 2022 06:04 PM (IST)

    कौशल तांबे अनसोल्ड

    कौशल तांबे या अनकॅप्ड भारतीय अष्टपैलू खेळाडूवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू अनसोल्ड राहिला.

  • 13 Feb 2022 06:04 PM (IST)

    प्रदीप सांघवान गुजरातच्या संघात

    गुजरात टायटन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये प्रदीप सांघवान हा खेळाडू खरेदी केला.

  • 13 Feb 2022 06:02 PM (IST)

    डेव्हिड वीसा, केन्नार लुईस अनसोल्ड

    डेव्हिड वीसा, केन्नार लुईस, बीआर शरथ, अनकॅप्ड भारतीय गोलंदाज सुशांत मिश्रा, ब्लेसिंग मुजारबानी या खेळाडूंमध्ये कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे खेळाडू अनसोल्ड राहिले

  • 13 Feb 2022 06:02 PM (IST)

    अभिजीत तोमर कोलकात्याच्या ताफ्यात

    आर. समर्थ या अनकॅप्ड भारतीय खेळाडूसाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिडींग वॉर झालं. हे बिडींग वॉर कोलकात्याने 40 लाखांची बोली लावत जिंकलं.

  • 13 Feb 2022 05:59 PM (IST)

    आर. समर्थ हैदराबादच्या ताफ्यात

    आर. समर्थ या खेळाडूला सनरायझर्स हैदराबादने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 05:58 PM (IST)

    चामिका करुणारत्ने कोलकात्याच्या संघात

    श्रीलंकन खेळाडू चामिका करुणारत्नेला कोलकाता नाईट रायडर्सने 50 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं.

  • 13 Feb 2022 05:55 PM (IST)

    बाबा इंद्रजीत कोलकात्याच्या संघात

    अनकॅप्ड विकेटकीपर बाबा इंद्रजीतला कोलकात्याने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 05:53 PM (IST)

    रिचर्डसन, हॉवेल अनसोल्ड

    केन रिचर्डसन, राहुल बुद्धी, बेनी हॉवेल, हेडन कर, लॉरी इव्हन्स, सौरभ कुमार, शम्स मुलानी, ध्रुव पटेल, अतीत शेठ या खेळाडूंमध्ये कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 05:50 PM (IST)

    धवल कुलकर्णी अनसोल्ड

    मुंबईचा जलदगती गोलंदाज धवल कुलकरणीसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. धवल याआधी मुंबई आणि राजस्थानसाठी खेळला आहे. या दोन्ही संघांनी धवलमध्ये रस दाखवला नाही.

  • 13 Feb 2022 05:49 PM (IST)

    रायली मेरीडिथ मुंबईचा 17 वा शिलेदार

    मुबई इंडियन्सने रायली मेरिडिथ हा खेळाडू 1 कोटींच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केला.

  • 13 Feb 2022 05:47 PM (IST)

    अल्झारी जोसेफ गुजरात टायटन्सच्या ताफ्यात

    अल्झारी जोसेफसाठी आधी मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि नंतर गुजरात टायटन्स या संघांमध्ये बिडिंग वॉर झालं. हे वॉर गुजरातने जिंकलं. गुजरातने 2.40 कोटींच्या बोलीवर हा खेळाडू आपल्या ताफ्यात घेतला.

  • 13 Feb 2022 05:43 PM (IST)

    शॉन अॅबट सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार

    जलदगती गोलंदाज शॉन अॅबटसाठी पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझींमध्ये बिडींग वॉर झालं. यात हैदराबादने बाजी मारली. एसआरएचने 2.40 कोटींच्या बोलीवर या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 05:37 PM (IST)

    गप्टील, राजपक्षे, बेन कटिंग अनसोल्ड

    न्यूझीलंडला आक्रमक फलंदाज मार्टिन गप्टील, श्रीलंकेचा भनुका राजपक्षे, रोस्टन चेस, बेन कटिंग आणि भारतीय खेळाडू पवन नेगीवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 05:21 PM (IST)

    मिधुन सुधेशन अनसोल्ड

    मिधुन सुधेशन या युवा भारतीय खेळाडूसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू अनसोल्ड राहिला.

  • 13 Feb 2022 05:20 PM (IST)

    प्रशांत सोळंकी धोनीच्या संघात

    प्रशांत सोळंकी या युवा भारतीय खेळाडूसाठी बिडींग वॉर पाहायला मिळालं. अखेर चेन्नई सुपरकिंग्सने 1.20 कोटींच्या बोलीवर हा खेळाडू खरेदी केला.

  • 13 Feb 2022 05:19 PM (IST)

    चामा मिलिंद बँगलोरच्या ताफ्यात

    चामा मिलिंद या भारतीय युवा खेळाडूसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 25 लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 05:18 PM (IST)

    मोहसिन खान लखनौच्या संघात

    मोहसिन खान हा युवा भारतीय खेळाडू लखनौ सुपरजायंट्सने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केला.

  • 13 Feb 2022 05:16 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाचा बेन द्वारश्विस, पंकज जैसवाल, मयंक यादव अनसोल्ड

    ऑस्ट्रेलियाचा बेन द्वारश्विस, भारताचे युवा खेळाडू पंकज जैसवाल, मयंक यादव, तेजस बरोका, युवराज चुडासामा अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 05:14 PM (IST)

    रसिक धर किंग खानच्या संघात

    रसिक धर हा युवा भारतीय खेळाडू कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केला.

  • 13 Feb 2022 05:13 PM (IST)

    मुकेश चौधरी चेन्नईच्या ताफ्यात

    मुखेश चौधरी हा युवा भारतीय खेळाडू चेन्नईने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केला.

  • 13 Feb 2022 05:10 PM (IST)

    वैभव अरोरा पंजाबच्या संघात

    वैभव अरोरा या अनकॅप्ड भारतीय खेळाडूसाठी पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये बिडींग वॉर झालं. अखेर हे वॉर पंजाबने जिंकलं. पंजाबने 2 कोटींच्या बोलीवर त्याला आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 05:06 PM (IST)

    अथर्व तायडेसह अनेक युवा खेळाडू अनसोल्ड

    अथर्व तायडे, रमणदीप सिंह, बी. साई. सुदर्शन, प्रशांत चोप्रा, यष्टीरक्षक ध्रुव जुरेल, आर्यन जुयाल हे युवा भारतीय खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 05:00 PM (IST)

    सुयश प्रभुदेसाई बँगलोरच्या गोटात

    सुयश प्रभुदेसाईसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 30 लाख रुपये मोजत त्याला आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 04:58 PM (IST)

    मुंबईने हार्दिक पंड्याच्या जागी घेतला 8.25 कोटींचा परदेशी खेळाडू

    सिंगापूरचा अष्टपैलू खेळाडू टिम डेव्हिडसाठी मुंबई इंडियन्सने तब्बल 8.25 कोटी रुपये मोजले. मुंबईने हार्दिक पंड्याच्या जागेसाठी टीम डेव्हिड या अष्टपैलू खेळाडूची निवड केली आहे. टिम डेव्हिडसाटी कोलकाता नाईट रायडर्सने पर्समध्ये अवघे 10.90 कोटी असूनही तब्बल 8 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 04:48 PM (IST)

    अपूर्व वानखडे, अथर्व अंकोलेकर अनसोल्ड

    अपूर्व वानखडे, अथर्व अंकोलेकर हे दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 04:47 PM (IST)

    शुभ्रांशू सेनापती चेन्नईच्या ताफ्यात

    शुभ्रांशू सेनापती या खेळाडूला चेन्नईने 20 लाखांच्या बेस प्राईसवर संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 04:46 PM (IST)

    Glenn Phillips, Sandeep Warrier अनसोल्ड

    Ben Mcdermott, Glenn Phillips, ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज Nathan Ellis. भारताचा जलदगती गोलंदाज Siddharth Kaul, अफगाणिस्तानचा Fazalhaq Farooqi, ऑस्ट्रेलियाचा Andrew Tye, Reece Topley, भारताचा जलदगती गोलंदाज Sandeep Warrier, अनकॅप्ड भारतीय फलंदाज समीर रिझवी, तन्मय अग्रवाल, इंग्लंडचा Tom Kohler-Cadmore हे खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 04:42 PM (IST)

    अॅडम मिल्न चेन्नईच्या संघात

    चेन्नई सुपरकिंग्सने अॅडम मिल्न हा पहिला परदेशी वेगवान गोलंदाज खरेदी केला आहे. चेन्नईने त्याच्यासाठी 1.90 कोटी रुपये मोजले.

  • 13 Feb 2022 04:41 PM (IST)

    जलदगती गोलंदाज टायमल मिल्स मुंबईच्या संघात

    जोफ्रा आर्चर पुढच्या वर्षी उपलब्ध असेल. त्यामुळे मुंबईला चांगले जलदगती गोलंदाज हवे आहेत. त्यामुळेच मुंबईने टायमल मिल्सला 1.50 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 04:40 PM (IST)

    Jason Behrendor बँगलोरच्या ताफ्यात

    Jason Behrendor साठी राजस्थान रॉयल्सने 75 लाख रुपये मोजले.

  • 13 Feb 2022 04:32 PM (IST)

    रोमारियो शेफर्डसाठी हैदराबादने मोजले 7.75 कोटी

    रोमारियो शेफर्ड या कॅरेबियन खेळाडूसाठी सनरायझर्स हैदराबादने तब्बल 7.75 कोटी रुपये मोजले. रोमारियोसाठी मुंबई, राजस्थान, चेन्नई आणि हैदराबादमध्ये मोठं बिडींग वॉर पाहायला मिळालं.

  • 13 Feb 2022 04:23 PM (IST)

    मिच सँटनर चेन्नईच्या संघात

    मिचेल सँटनरसाठी चेन्नई सुपरकिंग्सने 1.90 कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. हैदराबादने त्याच्यासाठी 1.8 कोटींची बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 04:22 PM (IST)

    बुमराहला जोडीदार मिळाला, डॅनियल सॅम्स मुंबईच्या ताफ्यात

    ऑस्ट्रेलियन अष्टपैलून खेळाडू डॅनियल सॅम्ससाठी मुंबई इंडियन्सने 2.60 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. सॅम्स जसप्रीत बुमराहसोबत मुंबईच्या गोलंदाजी आक्रमातला महत्त्वाचा खेळाडू असेल.

  • 13 Feb 2022 04:20 PM (IST)

    शरफेन रदरफोर्ड

    शरफेन रदरफोर्ड हा खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 1 कोटींच्या बेस प्राईसवर खरेदी केला.

  • 13 Feb 2022 04:19 PM (IST)

    रिषी धवन पंजाबच्या संघात

    पंजाब किंग्सने 55 लाख रुपये मोजत रिषी धवनला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 04:15 PM (IST)

    मुंबई इंडियन्सची भविष्यात गुंतवणूक, दुखापतग्रस्त जोफ्रा आर्चरसाठी मोजले 8 कोटी

    इंग्लिश गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त आहे. तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. तरीदेखील मुंबईने त्याच्यासाठी 8 कोटी रुपये मोजले. मुंबई, राजस्थान आणि हैदराबादमध्ये त्याच्यासाठी मोठं बिडींग वॉर पाहायला मिळालं.

  • 13 Feb 2022 04:08 PM (IST)

    रोवमन पॉवेल दिल्लीच्या संघात

    वेस्ट इंडिजचा पॉवर हिटर फलंदाज रोवमन पॉवेलसाठी मोठं बिडींग वॉर झालं. लखनौ, दिल्ली आणि चेन्नईने हे वॉर 2.8 कोटींपर्यंत नेलं. दिल्लीने 2.8 कोटींच्या बोलीवर या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 04:06 PM (IST)

    अॅलेक्स हेल्स, एव्हिन लुईस, करुण नायर अनसोल्ड

    अॅलेक्स हेल्स, एव्हिन लुईस, करुण नायर या तीन खेळाडूंवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. अखेर हा खेळाडू अनसोल्ड राहिला.

  • 13 Feb 2022 04:06 PM (IST)

    डेवॉन कॉन्वे पिवळ्या जर्सीत दिसणार

    डेवॉन कॉन्वे यंदा पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. त्याच्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सने 1 कोटी रुपये मोजले.

  • 13 Feb 2022 04:04 PM (IST)

    फिन एलन बँगलोरच्या ताफ्यात

    फिन एलनसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 80 लाखांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 03:49 PM (IST)

    मुज्तबा युसूफ, कुलदीप सेन, आकाश सिंह अनसोल्ड

    अनकॅप्ड भारतीय जलदगती गोलंदाज मुज्तबा युसूफ, कुलदीप सेन, आकाश सिंह तूर्तास अनसोल्ड राहिले आहेत. या खेळाडूंसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही.

  • 13 Feb 2022 03:46 PM (IST)

    समरजितसिह पिवळ्या जर्सीत दिसणार

    चेन्नई सुपरकिंग्सने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये समरजितसिंहला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 03:44 PM (IST)

    अनकॅप्ड भारतीय जलदगती गोलंदाज यश दयालसाठी बिडींग वॉर, 3.20 कोटी मिळणार

    अनकॅप्ड भारतीय जलदगती गोलंदाज यश दयालसाठी मोठं बिडींग वॉर पाहायला मिळालं. 20 लाखांपासून सुरु झालेलं हे बिडींग वॉर बँगलोर, गुजरात आणि लखनौने 3.20 कोटी रुपयांपर्यंत नेलं. अखेर गुजरातने 3.20 कोटींची सर्वात मोठी बोली लावून हा खेळाडू आपल्या ताफ्यात घेतला.

  • 13 Feb 2022 03:41 PM (IST)

    अनकॅप्ड भारतीय जलदगती गोलंदाज वासू वत्स, यश ठाकूर, अर्झान नागवसवाला अनसोल्ड

    अनकॅप्ड भारतीय जलदगती गोलंदाज वासू वत्स, यश ठाकूर, अर्झान नागवसवाला तूर्तास अनसोल्ड राहिले आहेत. या खेळाडूंसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही.

  • 13 Feb 2022 03:36 PM (IST)

    U-19 वर्ल्डकमधला स्टार, मराठमोळ्या राजवर्धन हंगरगेकरवर पैशांचा पाऊस

    अंडर-19 वर्ल्डकपमधला स्टार खेळाडू राजवर्धन हंगरगेकरसाठी कोट्यवधींची बोली लागली. या खेळाडूसाठी मुंबई, लखनौ, चेन्नई, आणि पंजाबमध्ये बिडींग वॉर झालं. हे वॉर चेन्नई सुपरकिंग्सने जिंकलं. राजवर्धन आता पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. त्याच्यासाठी चेन्नईने 1.50 कोटींची सर्वात मोठी बोली लावली.

  • 13 Feb 2022 03:32 PM (IST)

    अंडर-19 वर्ल्डकपमधला स्टार राज अंगद बावासाठी कोट्यवधींची बोली

    अंडर-19 वर्ल्डकपमधला स्टार राज अंगद बावासाठी कोट्यवधींची बोली लागली. या खेळाडूसाठी मुंबई, हैदराबाद आणि पंजाबमध्ये बिडींग वॉर झालं. हे वॉर पंजाबने जिंकलं. पंजाबने 2 कोटींच्या बोलीवर या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 03:28 PM (IST)

    संजय यादव मुंबईच्या ताफ्यात

    मुंबईने आपला 12 वा खेळाडू खरेदी केला आहे. पूर्वी कोलकात्याकडून खेळलेल्या संजयसाठी मुंबई आणि पंजाबने बोली लावली. अखेर मुंबईने 50 लाखांच्या बोलीवर हा खेळाडू आपल्याकडे घेतला.

  • 13 Feb 2022 03:27 PM (IST)

    विकी ओस्तवाल अनसोल्ड

    पिंपरी-चिंचवडचा विकी ओस्तवाल हा खेळाडू नुकताच भारताच्या अंडर-19 संघासाठी खेळला आहे. भारताला अंडर-19 वर्ल्डकप जिंकून देण्यात त्याची महत्वाची भूमिका होती. मात्र आजच्या लिलावात त्याच्यात कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नाही. हा खेळाडू तुर्तास अनसोल्ड राहिला आहे.

  • 13 Feb 2022 03:25 PM (IST)

    अनुकूल रॉय कोलकाता संघात, दर्शन नालखंडे गुजरातमध्ये

    अनुकूल रॉय हा खेळाडू कोलकात्याने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये, तर दर्शन नालखंडे हा खेळाडू गुजरातने 20 लाखांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केला.

  • 13 Feb 2022 03:23 PM (IST)

    महिपाल लोमरोर बँगलोरच्या ताफ्यात

    महिपाल लोमरोरसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 95 लाख रुपयांची सर्वात मोठी लावली. हा खेळाडू पूर्वी राजस्थानकडून खेळायचा. राजस्थानने या खेळाडूसाठी 90 लाखांची बोली लावली होती. परंतु बँगलोरने हे बिलींड वॉर जिंकलं.

  • 13 Feb 2022 03:20 PM (IST)

    लंचनंतर मुंबईने 11 वा खेळाडू खरेदी केला, एन. तिलक वर्मा निळ्या जर्सीत दिसणार

    हैदराबादचा खेळाडू एन. तिलक वर्मा निळ्या जर्सीत दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने 1.70 कोटी रुपयांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 03:16 PM (IST)

    अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुल दिल्लीच्या संघात

    भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुलचा दिल्लीने आपल्या संघात समावेश केला आहे. दिल्लीने त्याच्यासाठी सर्वात मोठी 50 लाखांची बोली लावली.

  • 13 Feb 2022 03:12 PM (IST)

    लंचनंतर दिल्लीची फटकेबाजी, सलग तीन खेळाडू खरेदी केले

    लंचनंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. आणि दिल्लीने सलग तीन खेळाडू खरेदी केले आहेत. दिल्लीने अष्टपैलू ललित यादव, रिपल पटेल आणि पाठोपाठ भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुलचा आपल्या संघात समावेश केला आहे.

  • 13 Feb 2022 03:10 PM (IST)

    रिपल पटेल दिल्लीकडे

    रिपल पटेलला दिल्लीने 20 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी केलं.

  • 13 Feb 2022 03:06 PM (IST)

    ललित यादव दिल्लीच्या गोटात

    अष्टपैलू क्रिकेटपटू ललित यादवसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी बोली लावली. दिल्लीने ललितसाठी 65 लाखांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतलं आहे.

  • 13 Feb 2022 02:17 PM (IST)

    मनन वोहरा लखनौ संघात

    लखनौ सुपरजायंट्सने 20 लाखांच्या बेस प्राईसवर मनन वोहरा हा युवा फलंदाज आपल्या संघात घेतला आहे.

  • 13 Feb 2022 02:16 PM (IST)

    रिंकू सिंह कोलकात्याच्या गोटात

    युवा भारतीय फलंदाज रिंकू सिहं कोलकात्याच्या ताफ्यात गेला आहे. लखनौ सुपरजायँट्सने त्याच्यासाठी 50 लाखांपर्यंत बोली लावली होती अखेर कोलकात्याने 55 लाखांच्या बोलीवर हा खेळाडू खरेदी केला.

  • 13 Feb 2022 02:13 PM (IST)

    हिंमत सिंह, विराट सिंह, सचिन बेबी, हरनूर सिंह, हिमांशू राणा अनसोल्ड

    भारतीय युवा फलंदाज हिंमत सिंह, विराट सिंह, सचिन बेबी, हिमांशू राणा आणि हरनूर सिंह या खेळाडूंमध्ये कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नाही. पाचही खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 02:12 PM (IST)

    पियूष चावला, इश सोढी, कर्ण शर्मा अनसोल्ड

    भारताचा अनुभवी फिरकीपटू पियूष चावला, न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोढी आणि कर्ण शर्मा या खेळाडूंमध्ये कोणत्याही फ्रँचायझीने रस दाखवला नाही. तिन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 02:08 PM (IST)

    महीष तीक्ष्णा चेन्नईच्या गोटात

    श्रीलंकन फिरकीपटू महीष तीक्ष्णा चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. 70 लाखांच्या बोलीवर चेन्नईने त्याला आपल्या संघात घेतलं.

  • 13 Feb 2022 02:06 PM (IST)

    शाहबाज नदीम लखनौचा नवाब

    शाहबाज नदीमला लखनौ सुपरजायंट्सने 50 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं. तो पूर्वी सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता.

  • 13 Feb 2022 02:03 PM (IST)

    मुंबईच्या ताफ्यात आणखी एक गोलंदाज

    मुंबई इंडियन्सने 65 लाख रुपयांच्या बोलीवर मयंक मार्कंडे या फिरकीपटूला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी 60 लाखांची बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 01:58 PM (IST)

    मुंबईच्या आजच्या दिवसातली पहिली खरेदी, जलदगती गोलंदाज मुंबईच्या ताफ्यात

    मुंबई इंडियन्सने 1.30 कोटी रुपयांच्या बोलीवर जयदेव उनादकट या भारतीय जलदगती गोलंदाजाचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. चेन्नई सुपरकिंग्सने त्याच्यासाठी 1.20 कोटींपर्यंत बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 01:55 PM (IST)

    नवदीप सैनी होणार रॉयल सैनिक

    भारताचा जलदगती गोलंदाज नवदीप सैनी राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात गेला आहे. 2.60 कोटींच्या बोलीवर राजस्थानने त्याला आपल्या संघात घेतलं. मुंबईने त्याच्यासाठी शेवटची 2.40 कोटींची बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 01:52 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे 25 तारखेला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे 25 तारखेला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता

    काल पुणे शहर मनसेची पार पडली बैठक

    बैठकीत सगळ्या जागा लढवण्यासाठी मनसेनं तयारी केली सुरू

    प्रत्येक मतदासंघनिहाय मनसेनं निरीक्षक नेमले

    राज ठाकरे पुन्हा एकदा करणार पुणे दौरा

    मनसेचे अध्यक्ष वसंत मोरे यांची माहिती

  • 13 Feb 2022 01:48 PM (IST)

    चेतन साकरिया दिल्लीच्या ताफ्यात

    दिल्ली कॅपिटल्सने चेतन साकरिया या युवा जलदगती गोलंदाजाला 4.20 कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या ताफ्यात घेतलं. राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी 4 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 01:38 PM (IST)

    दुष्मंथा चमीरा लखनौ सुपरजायंट्समध्ये

    लखनौ सुपरजायंट्सने आपलं गोलंदाजी आक्रमण अधिक मजबूत केलं आहे. लखनौने दुष्मंथा चमीरासाठी 2 कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने त्याच्यासाठी 1.80 कोटींपर्यंत बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 01:36 PM (IST)

    इशांत शर्मा पुन्हा एकदा अनसोल्ड

    काल अनसोल्ड राहिलेला भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा आजही अनसोल्ड राहिला. कोणत्याही फ्रँचायझीने इशांतमध्ये रस दाखवला नाही.

  • 13 Feb 2022 01:35 PM (IST)

    5.25 कोटींच्या बोलीवर खलील अहमद दिल्लीच्या ताफ्यात

    5.25 कोटींच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्सने खलील अहमदला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबईने त्याच्यासाठी 5 कोटींपर्यंत बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 01:14 PM (IST)

    कृष्णप्पा गौतम लखनौच्या ताफ्यात

    गेल्या वर्षी 9.25 कोटींच्या बोलीवर चेन्नईने खरेदी केलेल्या कृष्णप्पा गौतमसाठी यंदाच्या लिलावात लखनौ सुपरजायंट्सने 90 लाखांची सर्वात मोठी बोली लावली. त्याच्यासाठी दिल्ली आणि कोलकात्यानेही सुरुवातील बोली लावली होती.

  • 13 Feb 2022 01:11 PM (IST)

    शिवम दुबेसाठी चेन्नईची 4 कोटींची बोली

    अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेसाठी चेन्नई सुपरकिंग्सने तब्बल 4 कोटींची बोली लावली आणि या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 01:05 PM (IST)

    4.2 कोटींच्या बोलीवर मार्को यान्सिन हैदराबादच्या संघात, बिडींग वॉरमध्ये मुंबईची माघार

    4.2 कोटींच्या बोलीवर सनरायझर्स हैदराबादने द. आफ्रिकेचा गोलंदाज मार्को यान्सिनला आपल्या संघात घेतलं, मुंबईने बराच वेळ त्याच्यासाठी बिडींग केलं. मात्र 4 कोटींनंतर मुंबईने माघार घेतली.

  • 13 Feb 2022 12:59 PM (IST)

    ओडिन स्मिथ पंजाबच्या ताफ्यात

    वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडिन स्मिथसाठी पंजाब किंग्सने तब्बल 6 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 12:49 PM (IST)

    ख्रिस जॉर्डन अनसोल्ड

    ख्रिस जॉर्डन या इंग्लिश खेळाडूसाठी कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हा खेळाडू अनसोल्ड राहिला.

  • 13 Feb 2022 12:47 PM (IST)

    विजय शंकर गुजरातच्या संघात

    गुजरातने सलग तिसरा खेळाडू खरेदी केला आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकरसाठी चेन्नई सुपरकिंग्ससोबतच्या बिडींग वॉरनंतर गुजरातने विजयला आपल्या ताफ्यात घेतलं. त्याच्यासाठी गुजरातने 1.40 कोटी रुपये मोजले.

  • 13 Feb 2022 12:42 PM (IST)

    जयंत यादव गुजरातच्या ताफ्यात

    भारताचा फिरकीपटू जयंत यादवसाठी लखनौ आणि गुजरातने बिडींग वॉर केलं. अखेर गुजरात टायटन्सने 1.70 कोटींच्या बोलीवर हा अष्टपैलू खेळाडू खरेदी केला.

  • 13 Feb 2022 12:39 PM (IST)

    डॉमिनिक ड्रेक्ससाठी गुजरातची सर्वात मोठी बोली

    डॉमिनिक ड्रेक्स या अष्टपैलू खेळाडूसाठी गुजरात टायटन्सने 1.10 कोटींची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 12:36 PM (IST)

    दिवसातली सर्वात मोठी बोली इंग्लिश खेळाडूसाठी, पंजाबने मोजले 11.50 कोटी

    लियम लिविंगस्टोन या इंग्लिश खेळाडूसाठी आयपीएल फ्रँचायझींमध्ये मोठं बिडींग वॉर झालं. आधी कोलकाता नाईट रायडर्स आणि नंतर पंजाब किंग्समध्ये हो वॉर सुरु होतं. मात्र कोलकात्याच्या पर्समध्ये पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी 7 कोटींच्या बोलीनंतर माघार घेतली. मात्र नंतर गुजरात टायटन्सने यात उडी घेतली. 10 कोटींच्या बोलीनंतर गुजरातने माघार घेतली, त्यानंतर हैदराबादने यात उडी घेत हे वॉर 11 कोटींच्या पुढे नेलं. अखेर हे बिडींग वॉर पंजाबने जिंकलं. पंजाब किंग्सने 11.50 कोटींच्या बोलीवर लिविंगस्टोनला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 12:27 PM (IST)

    चेतेश्वर पुजारा, सौरभ तिवारी अनसोल्ड

    भारताच्या कसोटी संघातील भरवशाचा फलंदाज अशी ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारा आणि सौरभ तिवारी या दोन खेळाडूंवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 12:24 PM (IST)

    इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अनसोल्ड

    इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंच या दोन्ही खेळाडूंवर आयपीएलमधील कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिले. मॉर्गनने गेल्या वर्षी कोलकात्याला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. तर फिंचच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने नुकताच टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे.

  • 13 Feb 2022 12:22 PM (IST)

    डेव्हिड मलान, मार्नस लॅबूशेन अनसोल्ड

    टी-20 क्रिकेटमध्ये सध्या जगभरात ज्याच्या नावाचा डंका वाजतोय त्या डेव्हिड मलानसाठी आयपीएलमधील कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नाही. हे दोन्ही खेळाडी अनसोल्ड राहिले.

  • 13 Feb 2022 12:20 PM (IST)

    मनदीप सिंग दिल्लीकडून खेळणार

    दिल्ली कॅपिटल्सने 1.10 कोटी रुपयांच्या बोलीवर मनदीप सिंहला आपल्या ताफ्यात घेतलं.

  • 13 Feb 2022 12:19 PM (IST)

    एडन मार्क्राम हैदराबादच्या ताफ्यात

    एडन मार्क्रामसाठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये बिडींग वॉर झालं. परंतु हैदराबादने मोठी बोली लावत मार्क्रामला आपल्या ताफ्यात घेतलं. हैदराबादने त्याच्यासाठी 2.6 कोटींची बोली लावली.

  • 13 Feb 2022 12:15 PM (IST)

    मराठमोळा अजिंक्य रहाणे कोलकात्याकडून खेळणार

    1 कोटींच्या बेस प्राईसवर केकेआरने मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात घेतलं. रहाणेवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.

  • 13 Feb 2022 11:29 AM (IST)

    प्रत्येक संघाला 20-20 खेळाडूंच्या नावांची यादी लागणार

    आज सर्व फ्रँचायझींना सकाळी 9 वाजेपर्यंत आयपीएलसमोर त्यांच्या पसंतीच्या 20-20 खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले होते. सर्व संघांनी ही यादी आयपीएल आयोजकांकडे सुपूर्द केली आहे. त्यानंतर लिलावात या खेळाडूंचा समावेश केला जाईल. आज एक्सिलेरेटेड ऑक्शन पाहायला मिळेल. एक्सिलेरेटेड ऑक्शन म्हणजे खेळाडूंवर त्वरित बोली लावणे, ज्यामध्ये नाव समोर येताच काही सेकंदात निर्णय घ्यावा लागेल. तसेच आजच्या लिलाव प्रक्रियेत काल विकल्या न गेलेल्या खेळाडूंवरदेखील बोली लावली जाईल.

  • 13 Feb 2022 11:25 AM (IST)

    लिलाव कधी सुरू होणार?

    शनिवारप्रमाणेच रविवारीसुद्धा दुपारी 12 वाजता लिलाव सुरू होणार आहे. शनिवारी, मुख्य ऑक्शनर (लिलाव अधिकारी) ह्यू एडमिड्स यांनी लिलाव सुरू केला होता, परंतु लिलाव सुरु असतानाच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आणि अनुभवी क्रिकेट प्रेझेंटर चारू शर्मा यांनी ही जबाबदारी स्वीकारली. ह्यू आता ठीक आहेत आणि रविवारी तेच लिलावाचा कारभार पाहतील अशी अपेक्षा आहे.

Published On - Feb 13,2022 11:21 AM

Follow us
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.