IPL 2021 : चेन्नईची टोळी सरावात व्यस्त, धोनी तीन बॅट्ससह मैदानात, ऋतुराजही नव्या लूकमध्ये, पाहा PHOTO

IPL 2021 मधील उर्वरीत 31 सामन्यांना 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याने सर्व संघ तयारीला लागले आहेत. एम एश धोनीचा संघ चेन्नई सुपर किंग्सही 13 ऑगस्ट रोजी UAE ला पोहोचला आहे.

1/5
कोरोनाच्या संकटामुळे भारतात झालेली IPL 2021 
स्पर्धा मधूनच युएईला (UAE) मध्ये घेण्यात येत आहे. यासाठी सर्व संघ युएईला रवाना होत असून चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) खेळाडू सर्वात आधी युएईला पोहोचले आहेत. विलगीकरणाचा कालावधी संपवून सर्व खेळाडू मैदानात सरावासाठी उतरले असून चेन्नई सुपरकिंग संघाने खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत. एमएस धोनी (MS Dhoni), सुरेश रैनासह (Suresh Raina) सर्व खेळाडू या फोटोमध्ये दिसत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे भारतात झालेली IPL 2021 स्पर्धा मधूनच युएईला (UAE) मध्ये घेण्यात येत आहे. यासाठी सर्व संघ युएईला रवाना होत असून चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) खेळाडू सर्वात आधी युएईला पोहोचले आहेत. विलगीकरणाचा कालावधी संपवून सर्व खेळाडू मैदानात सरावासाठी उतरले असून चेन्नई सुपरकिंग संघाने खेळाडूंचे फोटो पोस्ट केले आहेत. एमएस धोनी (MS Dhoni), सुरेश रैनासह (Suresh Raina) सर्व खेळाडू या फोटोमध्ये दिसत आहेत.
2/5
चेन्नई सुपर किंग्सचा संघ 13 ऑगस्ट रोजी युएईला पोहोचला आहे. आयपीएलच्या उर्वरीत 31 सामन्यांना 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना चेन्नई सुपरकिंग विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात असणार आहे.

3/5
चेन्नई सुपरकिंगने पोस्ट केलेल्या सरावाच्या फोटोंमध्ये कर्णधार एमएस धोनी 3 बॅट्ससोबत दिसून येत आहे. विशेष म्हणजे या तिन्ही बॅट्सचे वजन वेगवेगळे असून दोन्ही सराव करताना कोणत्या बॅटने चांगला फटका मारु शकतो हे पाहतो आणि त्यानंतर तीच बॅट सामन्यात वापरतो.

4/5
सरावाच्या फोटोमध्ये चेन्नईचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड दिसून आला. आयपीएलच्या पहिल्या भागासह श्रीलंका दौऱ्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसलेला ऋतुराज या फोटोंमध्ये काहीसा वेगळा दिसून येत आहे. मिशी आणि दाढीसह असणारा ऋतुराज सध्या एकदम बारीक दाढीत दिसत आहे.

5/5
भारतीय संघातील टी-20 दिग्गज क्रिकेटपटू सुरैश रैनाही सराव करताना दिसून आला आहे. तो अत्यंत हसतमुख दिसत असून यावरुन संघामध्ये खेळीमेळीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय संघातील टी-20 दिग्गज क्रिकेटपटू सुरैश रैनाही सराव करताना दिसून आला आहे. तो अत्यंत हसतमुख दिसत असून यावरुन संघामध्ये खेळीमेळीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI