AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, MI vs RCB Highlight: मुंबई इंडियन्सने आरसीबीचा वानखेडेवर उडवला धुव्वा, 7 गडी राखून ढकललं पराभवाच्या दरीत

| Updated on: Apr 11, 2024 | 11:29 PM
Share

Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru IPL Highlight in Marathi: आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आले होते. या सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यांची जादू दिसली. दोघांनी आरसीबीच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आणि विजय मिळवून दिला.

IPL 2024, MI vs RCB Highlight:  मुंबई इंडियन्सने आरसीबीचा वानखेडेवर उडवला धुव्वा, 7 गडी राखून ढकललं पराभवाच्या दरीत

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 8 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 दिल्या. या धावा 15.3 षटकातच मुंबई इंडियन्सने पूर्ण केल्या. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या आक्रमक खेळीमुळे हा विजय सहज शक्य झाला.  या विजयासह मुंबई इंडियन्सने सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु नवव्या स्थानावर आहे.  मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आता आतापर्यंत 33 सामने झाले आहेत. त्यात 19 सामन्यात मुंबई इंडियन्सने, तर 14 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बाजी मारली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Apr 2024 11:24 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : मुंबई इंडियन्सचा आरसीबीवर मोठा विजय, गुणतालिकेतही आरसीबीला बसला मोठा फटका

    मुंबई इंडियन्सने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला आहे. तसेच आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 197 धावांचं आव्हान 15.3 षटकात पूर्ण केलं. तसेच 27 चेंडू राखून हा विजय मिळवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सला नेट रनरेटमध्ये जबर फायदा झाला आहे. मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत पंजाब किंग्सला मागे टाकत सातवं स्थान गाठलं आहे.

  • 11 Apr 2024 10:59 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : सूर्यकुमार यादव याने जलद अर्धशतक ठोकलं

    सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.  5 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यानंतर विजयकुमार विशकच्या गोलंदाजीवर बाद झाला.  तिथपर्यंत मुंबई इंडियन्स विजयाच्या वेशीवर पोहोचला होता.

  • 11 Apr 2024 10:53 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : रोहित शर्माच्या रुपाने मुंबईला दुसरा धक्का

    रोहित शर्माने 24 चेंडूत 38 धावांची खेळी केली. यात 3 चौकार आणि 3 षटकार मारले.

  • 11 Apr 2024 10:38 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, इशान किशन 69 धावा करून बाद

    मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. इशान किशन 34 चेंडूत 69 धावा करून तंबूत परतला आहे. त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत.

  • 11 Apr 2024 10:20 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, बिनबाद 72 धावा

    पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. 6 षटकात एकही गडी न गमवता 72 धावा केल्या आहे. इशान किशनने 25 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. तर रोहित शर्मा 15 धावांवर खेळत आहे.

  • 11 Apr 2024 10:16 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : रोहित शर्मा आणि इशान किशनची अर्धशतकी भागीदारी

    रोहित शर्मा आणि इशान किशनने पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. इशान किशनने यावेळी वादळी खेळी केली.

  • 11 Apr 2024 09:33 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : आरसीबीचं मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान

    आरसीबीकडून दिनेश कार्तिकने शेवटी येत जबरदस्त फलंदाजी केली. दिनेश कार्तिकने 22 चेंडूत आक्रमक खेळी करत 50 धावा केल्या. आरसीबीचा डाव 196 धावांवर आटोपला. मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 197 धावांचं आव्हान मिळालं आहे.

  • 11 Apr 2024 09:22 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : जसप्रीत बुमराहचा आरसीबीला पंच

    जसप्रीत बुमराहने आरसीबीला जबरदस्त पंच दिला आहे. पाच गडी बाद करून टीमला बॅकफूटवर ढकललं आहे.

  • 11 Apr 2024 09:09 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : जसप्रीत बुमराहने लागोपाठ दोन गडी केले बाद

    जसप्रीत बुमराहने एकापाठोपाठ एक दोन गडी बाद केले. फाफ डू प्लेसिसनंतर महिपाल लोमरोरला तंबूचा रस्ता दाखवला.

  • 11 Apr 2024 09:06 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : सेट बॅट्समन फाफ डू प्लेसिस बाद

    फाफ डू प्लेसिस 41 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर डाव संपुष्टात आला आहे.

  • 11 Apr 2024 08:47 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : फाफ डू प्लेसिसचं अर्धशतक

    आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने 32 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. आयपीएलमधलं 34 वं अर्धशतक फाफने झळकावलं.

  • 11 Apr 2024 08:37 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने चौथा धक्का

    ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने आरसीबीला चौथा धक्का बसला आहे. ग्लेन मॅक्सवेलला आपलं खातंही खोलता आलं नाही. श्रेयस गोपाळने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

  • 11 Apr 2024 08:29 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : रजत पाटिदारचं 25 चेंडूत अर्धशतक

    आरसीबीचा संघ संकटात असताना रजत पाटिदारने डाव सावरला. 25 चेंडूत 50 धावा केल्या. पण पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादात बाद झाला. पण दुसऱ्या चेंडूवर कोएत्झीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

  • 11 Apr 2024 08:17 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : रजत पाटिदार आणि फाफ डू प्लेसिसची 50 धावांची भागीदारी

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून रजत पाटिदार आणि फाफ डू प्लेसिस यांनी 50 धावांची भागीदारी केली आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या बंगळुरुला बाहेर काढण्यात मदत झाली आहे.

  • 11 Apr 2024 08:02 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : पॉवर प्लेमध्ये आरसीबीच्या 2 बाद 44 धावा

    पॉवर प्लेवर पूर्णपणे मुंबई इंडियन्सचं वर्चस्व दिसून आलं. विराट कोहली आणि विल जॅक्स स्वस्तात बाद झाले. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2 बाद 44 धावा केल्या.

  • 11 Apr 2024 07:48 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : विल जॅक्स स्वस्तात बाद, आरसीबीवर दबाव वाढला

    विराट कोहलीनंतर आरसीबीला विल जॅक्सच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. विल जॅक्स 8 धावा करून तंबूत परतला आहे. आकाश मढवालला यश मिळालं. 4 षटकात 28 धावा झाल्या आहेत.

  • 11 Apr 2024 07:41 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : विराट कोहली बुमराहच्या गोलंदाजीवर बाद

    विराट कोहली अवघ्या 3 धावा करून तंबूत परतला आहे. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर इशान किशनने त्याचा झेल घेतला.

  • 11 Apr 2024 07:38 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : विराट कोहली आणि फाफची सावध सुरुवात

    विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने सावध सुरुवात केली आहे. 2 षटकात 14 धावा झाल्या आहेत.

  • 11 Apr 2024 07:13 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : आरसीबीची प्लेइंग इलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

  • 11 Apr 2024 07:13 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मढवाल.

  • 11 Apr 2024 07:02 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : नाणेफेकीचा कौल मुंबईने जिंकला

    हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 11 Apr 2024 05:30 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : वानखेडेची खेळपट्टी अशी असेल?

    वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. नवीन चेंडूवर थोडा स्विंग होऊ शकतो, तरी फलंदाजीसाठी पूरक अशी खेळपट्टी आहे. तसेच मैदानाचं परीघ लहान असल्याने मोठी धावसंख्या उभी राहू शकते.

  • 11 Apr 2024 05:30 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : अशी असू शकते आरसीबीची प्लेइंग इलेव्हन

    फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, विल जॅक्स, कॅमरून ग्रीन, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रीस टॉपले, मयंक डागर, यश दयाल आणि मोहम्मद सिराज.

  • 11 Apr 2024 05:26 PM (IST)

    MI vs RCB IPL Live Score : अशी असू शकते मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा , इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी , रोमॅरियो शेफर्ड, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह.

Published On - Apr 11,2024 5:25 PM

Follow us
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.