AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs BAN: बांगलादेशचा कारनामा, पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेत रेकॉर्ड्सचा पंच

Pakistan vs Bangladesh Test Series : बांगलादेशने पाकिस्तान विरूद्धच्या कसोटी मालिकेत इतिहास रचला. बांगलादेशने पाकिस्तानला व्हाईट वॉश देण्यासह आणखी काय काय विक्रम केले आहेत ते जाणून घ्या.

PAK vs BAN: बांगलादेशचा कारनामा, पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेत रेकॉर्ड्सचा पंच
bangladesh test series won celebrationImage Credit source: bangladesh cricket x account
| Updated on: Sep 03, 2024 | 11:58 PM
Share

बांगलादेशला गेल्या 13 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध एकदाही विजय मिळवता आला नव्हता. मात्र बांगलादेशने यंदाच्या पाकिस्तान दौऱ्यात इतिहास रचला. बांगलादेशने फक्त विजयच मिळवला नाही, तर पाकिस्तानचा दोन्ही सामन्यात सुपडा साफ केला. बांगलादेशने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. तर दुसर्‍या सामन्यात 6 विकेट्सने मात करत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. बांगलादेशचा पाकिस्तानमधील हा पहिलावहिला, ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा हा मालिका विजय ठरला. बांगलादेशसाठी हा मालिका विजय भारत दौऱ्याच्या हिशोबाने फायदेशीर ठरला आहे. बांगलादेशन पाकिस्ताननंतर आता भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र बांगलादेशने पाकिस्तामध्ये नक्की काय काय विक्रम केलेत? हे जाणून घेऊयात.

पाकिस्तानचा मालिका विजय

बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत 10 विकेट्सने लोळवलं. बांगलादेश यासह पाकिस्तानला त्यांच्यात घरात 10 विकेट्सने पराभूत करणारी पहिलीच टीम ठरली. तसेच दुसऱ्या सामन्यात मात करत बांगलादेशचा पाकिस्तानमधील हा पहिला मालिका विजय ठरला.

बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयात फलंदाजांसह गोलंदाजांचंही योगदान राहिलं. बांगलादेशी गोलंदाजांनी या मालिकेत ते करुन दाखवलं, जे याआधी करता आलं नव्हतं. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्यांदाच डावातील 10 च्या 10 विकेट्स घेतल्या.बांगलादेशच्या गोलंदाजांनी ही कामगिरी दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात केली.

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूद याने कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. महमूदने दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात या 5 विकेट्स घेतल्या. महमूदने 10.4 ओव्हरमध्ये 43 धावांच्या मोबदल्यात या 5 विकेट्स घेतल्या.

पाचवा आणि शेवटचा कारनामा म्हणजे बांगलादेशचे आघाडीचे गोलंदाज हे पाकिस्तानच्या बॉलर्सपेक्षा प्रभावी ठरले. बांगलादेशच्या पेसर्सनी दुसऱ्या सामन्यातील 20 पैकी 14 विके्टस घेतल्या. तर पाकिस्तानला फक्त 10 विकेटच घेता आल्या.

बागंलादेशसाठी ऐतिहासिक मालिका विजय

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.

बांगलदेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.