वैभव सूर्यवंशीचा मोठा विक्रम काही तासातच धुळीस, पाकिस्तानच्या या खेळाडू निघून गेला पुढे
अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळ दाखवत दीड शतकी खेळी केली होती. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याआधीच पाकिस्तानच्या फलंदाजाने त्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा या वैभव सूर्यवंशीच्या खेळीकडे लागून आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानही भारताशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात मलेशियाचं दारूण पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 3 गडी गमवून 345 धावा केल्या. तसेच मलेशिलाया 48 धावांमध्ये गुंडाळलं. पाकिस्तानने हा सामना 297 धावांनी जिंकला. या सामन्यात समीर मिन्हासने 148 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकार मारत नाबाद 177 धावांची खेळी केली. तसेच या स्पर्धेतील वैभव सूर्यवंशीच्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढला. वैभव सूर्यवंशीने पहिल्या सामन्यात 171 धावांची खेळी केली होती. तर मिन्हासने त्याच्यापेक्षा 6 धावा अधिक केल्या आहे.
वैभव सूर्यवंशीने 95 चेंडूत 171 धावा केल्या होत्या. तर मिन्हासने 148 चेंडूत नाबाद 177 धावा केल्या. त्यामुळे मिन्हासच्या तुलनेत वैभव सूर्यवंशीने कमी चेंडूत अधिक धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानचा खेळाडू भले वैभवच्या पुढे निघून गेला असेल. पण या स्पर्धेत वैभव सूर्यवंशीचा इम्पॅक्ट अधिक दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 डिसेंबर रोजी सामना होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात दोघांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. आता कोणता संघ बाजी मारतो? कोणता फलंदाज वरचढ ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे, आयुष म्हात्रे पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नव्हता. त्यामुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणं भाग आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारत अंडर 19 संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), कनिष्क चौहान, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, हरवंश पनगालिया, नमन पुष्पक, उद्धव मोहन, युवराज गोहिल.
पाकिस्तान अंडर 19 संघ: उस्मान खान, समीर मिन्हास, अली हसन बलोच, अहमद हुसैन, फरहान युसफ (कर्णधार), हमजा जहूर (विकेटकीपर), हुजैफा अहसान, निकाब शफीक, दानियाल अली खान, मोहम्मद सय्यम, अली रझा, अब्दुल सुभान, मोहम्मद हुजैफा, मोमीन कमर, मोहम्मद शायन.
