RCB vs CSK Live Score, IPL 2021 : चेन्नईचा अप्रतिम विजय, सहा गडी राखून आरसीबीला नमवलं

RCB vs CSK Live Score in Marathi: आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील आजची लढत दोन्ही संघासाठी पुढील फेरीत पोहचण्यासाठी महत्त्वाची आहे.

RCB vs CSK Live Score, IPL 2021 : चेन्नईचा अप्रतिम विजय, सहा गडी राखून आरसीबीला नमवलं
चेन्नईचा संघ

IPL 2021: आयपीएलच्या (IPL 2021)  गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणारे संघ चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) संघ यांच्यात शारजाहच्या मैदानावर सामना पार पडला. नाणेफेक जिंकत धोनीने गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या आरसीबी संघाने सुरुवात तर उत्तम केली. सलामीवीर विराट आणि देवदत्तने अर्धशतकं ठोकली. पण नंतरच्या खेळाडूंना खास कामगिरी करता न आल्याने संघ 156 धावाच करु शकला. ज्यामुळे चेन्नईला विजयासाठी 157 धावांचे आव्हान होते. चेन्नईची तगडी फलंदाजी पाहता त्यांनी अगदी सहज हा सामना जिंकत सहा गडी राखून विजय मिळवला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 24 Sep 2021 23:12 PM (IST)

  RCB vs CSK: सीएसके आरसीबीवर भारी, 6 विकेट्सने विजय

  धोनीच्या सीएसकेने आरसीबी संघाला नमवत अप्रतिम विजयाची नोंद केली आहे. सहा गडी राखून मिळवलेल्या या विजयामुळे धोनीच्या सीएसकेला पुढील फेरीच पोहचणे सोपे झाले आहे.

 • 24 Sep 2021 22:59 PM (IST)

  RCB vs CSK: रायडू बाद, चेन्नईला 26 चेंडूत 24 धावांची गरज

  img

  चेन्नईचा फलंदाज अंबती रायडू हर्षलच्या चेंडूवर एबीच्या हाती झेलबाद झाला आहे. आता चेन्नईला 26 चेंडूत 24 धावांची गरज आहे.

 • 24 Sep 2021 22:49 PM (IST)

  RCB vs CSK: मोईन अली माघारी

  img

  दोन्ही सलामीवीर बाद होताच चेन्नईचा खेळ सावरु पाहणारा अष्टपैलू मोईन अलीही बाद झाला आहे. हर्षल पटेलच्या चेंडूवर विराटने त्याचा झेल घेतला आहे.

 • 24 Sep 2021 22:26 PM (IST)

  RCB vs CSK: चेन्नईला दुसरा झटका

  img

  गायकवाड बाद होताच पुढच्याच षटकात मॅक्सवेलच्या चेंडूवर फाफ डुप्लेसी देखील झेलबाद झाला आहे. नवदीप सैनीने त्याचा झेल घेतला आहे.

 • 24 Sep 2021 22:22 PM (IST)

  RCB vs CSK: ऋतुुराज गायकवाड बाद

  img

  चेन्नई संघाने उत्तम सुरुवात केली असतानाच आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने चहलच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडची सुपरकॅच घेत संघाला पहिलं यश मिळवून दिलं.

 • 24 Sep 2021 21:50 PM (IST)

  RCB vs CSK: 157 धावा करण्यासाठी सीएसके मैदानात

  157 धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सजे ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसी मैदानात आले आहेत.

 • 24 Sep 2021 21:25 PM (IST)

  RCB vs CSK: आरसीबीची 156 धावांपर्यंत मजल

  सलामीवीर विराट आणि देवदत्तने अर्धशतकं ठोकली. पण नंतरच्या खेळाडूंना खास कामगिरी करता न आल्याने संघ 156 धावाच करु शकला.

 • 24 Sep 2021 21:14 PM (IST)

  RCB vs CSK: दीपकला पहिलं यश

  img

  चेन्नईचा मुख्य गोलंदाज दीपकला अखेर पहिलं यश मिळालं आहे. टीम डेविडला त्याने झेलबाद केलं आहे.

 • 24 Sep 2021 21:08 PM (IST)

  RCB vs CSK: आरसीबीला लागोपाठ दोन झटके

  img

  शार्दूल ठाकूरच्या षटकात आरसीबीचे दोन फलंदाज बाद झाले आहेत. एबी डिव्हीलीयर्सचा झेल सुरेश रैनाने तर पडीक्कलचा झेल अंबाती रायडूने घेतला आहे.

 • 24 Sep 2021 20:51 PM (IST)

  RCB vs CSK: विराट कोहली बाद

  img

  अर्धशतक पूर्ण होताच विराट कोहली बाद झाला आहे. डीजे ब्राव्होच्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने त्याचा झेल घेतला आहे.

 • 24 Sep 2021 20:43 PM (IST)

  RCB vs CSK: विराटचंही अर्धशतक पूर्ण

  पडीक्कल पाठोपाठ कर्णधार विराट कोहलीने देखील अर्धशतक पूर्ण केलं आहे. आयपीएलच्या कारकिर्दीतील हे त्याचं 41 वं अर्धशतक आहे.

 • 24 Sep 2021 20:38 PM (IST)

  RCB vs CSK: पडीक्कलचं अर्धशतक पूर्ण

  आरसीबीने धमाकेदार फलंदाजी करत उत्तम सुरुवाकत केली आहे. देवदत्त पडीक्कलने अवघ्या 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

 • 24 Sep 2021 20:26 PM (IST)

  RCB vs CSK: आऱसीबीची धडाकेबाज फलंदाजी

  आरसीबीचा कर्णधार विराट कोहली देवदत्त पडीक्कलसोबत मिळून धमाकेदार फलंदाजी करत आहे. षटकार आणि चौैकारांची बरसात सुरुच आहे.

 • 24 Sep 2021 20:01 PM (IST)

  RCB vs CSK: सामन्यातील षटकारांना सुरुवात

  img

  शारजाहचं मैदान षटकारांसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी षटकारांना सुरुवात झाली असून चौैथ्याच षटकात देवदतने हेजलवुडला षटकार ठोकला आहे.

 • 24 Sep 2021 19:48 PM (IST)

  RCB vs CSK: आरसीबीची दणकेबाज सुरुवात

  img

  आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल मैदानात आले असून पहिल्या दोन चेंडूवर कोहलीने दोन चौकार लगावले आहेत.

 • 24 Sep 2021 19:38 PM (IST)

  RCB vs CSK: आरसीबीमध्ये केवळ दोन बदल

  आजच्या सामन्यात सीएसके संघात एकही बदल नसून आरसीबी संघात मात्र दोन बदल करण्यात आले आहेत. सचिन बेबीच्या जागी टीम डेविडला आणि कायल जेमिसनच्या जागी नवदीप सैनीला जागा देण्यात आली आहे.

 • 24 Sep 2021 19:37 PM (IST)

  RCB अंतिम 11

  विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, वनिंजू हसरंगा, टीम डेविड, नवदीप सैनी, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

   

 • 24 Sep 2021 19:36 PM (IST)

  CSK अंतिम 11

  ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार-यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड

 • 24 Sep 2021 19:33 PM (IST)

  RCB vs CSK: चेन्नईने निवडली गोलंदाजी

  विलंबानंतर नाणेफेक झाली असून चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

 • 24 Sep 2021 19:07 PM (IST)

  RCB vs CSK: शारजाहमध्ये वाळूचे वादळ

  शारजाहच्या मैदानात आलेल्या वाळू वादळामुळे नाणेफेकीला थोडा विलंब झाला आहे. काही वेळातच नाणेफेक होणार आहे.

 • 24 Sep 2021 19:06 PM (IST)

  RCB vs CSK : षटकारांचा पाऊस पडणार?

  इतर मैदानांच्या तुलनेत छोटं असणारं शारजाहचं मैदान अगदी पूर्वीपासून धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. या मैदानावर  मागील काही वर्षांपासून आयपीएलमधील धुरंधर खेळाडूं षटकांची आतषबाजी करत आहेत. आजही अशी आतषबाजी पाहायला मिळू शकते.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI