RR vs PBKS : नेहल वढेरा आणि शशांक सिंहची अर्धशतकी खेळी, राजस्थानसमोर 220 धावांचं आव्हान, पंजाब जिंकणार?
Rajasthan Royals vs Punjab Kings 1st Innings Highlights : नेहर वढेरा आणि शशांक सिंह या दोघांनी पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे पंजाबला 219 धावांपर्यंत मजल मारता आली.

नेहल वढेरा आणि शशांक सिंह या जोडीने केलेल्या झंझावाती अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने राजस्थान रॉयल्स विरुद्ध सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 200 पार मजल मारली आहे. पंजाबने राजस्थानसमोर 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 219 रन्स केल्या. पंजाबकडून नेहल आणि शशांक या दोघांव्यितिरिक्त कर्णधार श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंह आणि अझमतुल्लाह ओमरझई या तिघांनीही छोटेखानी मात्र निर्णायक खेळी केली. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. त्यानतंर आता पंजाबचे गोलंदाज 219 धावांचा यशस्वी बचाव करत राजस्थान विरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरतात का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पंजाबला झटपट 3 झटके
कॅप्टन श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून बॅटिंगचा निणर्य घेतला. मात्र पंजाबच्या पहिल्या 3 फलंदाजांना योग्य ठरवता आला नाही. प्रियांश आर्या 9 आणि प्रभसिमरन सिंह 21 धावा करुन आऊट झाले. तर मिचेल ओवेन याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे राजस्थानची स्थिती 3 आऊट 34 अशी झाली. मात्र त्यानंतर नेहल आणि श्रेयस या दोघांनी पंजाबचा डाव सावरला. नेहल आणि श्रेयस या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर श्रेयस अय्यरही आऊट झाला. अय्यरने 25 बॉलमध्ये 5 फोरसह 30 रन्स केल्या.
श्रेयस आऊट झाल्यानंतर नेहल आणि शशांक सिंह या जोडीने पंजाबला 150 पार पोहचवलं. या दोघांनी पाचव्या विकेटससाठी 58 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर पंजाबने 159 धावांवर पाचवी विकेट गमावली. नेहलने 37 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरसह 70 रन्स केल्या. त्यानंतर शशांक सिंह आणि अझमतुल्लाह ओमरझई या जोडीने कमाल केली. या दोघांनी शेवटपर्यंत सहाव्या विकेटसाठी नाबाद 60 धावांची भागीदारी केली.
राजस्थानसमोर 220 धावांचं लक्ष्य
Innings break!
A crucial partnership between Nehal Wadhera and Shashank Singh help #PBKS set a total of 219/5 on the board 🤜🤛
Can the home side chase this down or will it be defended? 🤔
Scorecard ▶ https://t.co/HTpvGewE3N #TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/G4VywXLsxn
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
शशांक सिंह याने 30 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 59 धावा केल्या. तर अझमतुल्लाह याने 9 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने नॉट आऊट 21 रन्स केल्या. तर राजस्थानकडून तुषार देशपांडे याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर क्वेना माफाका, रियान पराग आणि आकाश मढवाल या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
