AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : त्या दोघांनी…, कॅप्टन सूर्या विजयानंतर नाव घेऊन स्पष्टच बोलला, नक्की काय झालं?

Suryakumar Yadav Post Match Presentation : पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर भारताला दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मात्र भारताने त्यानंतर जोरदार मुसंडी मारत सलग 2 सामने जिंकत मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. भारताच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमारने कुणाला श्रेय दिलं? जाणून घ्या.

AUS vs IND : त्या दोघांनी..., कॅप्टन सूर्या विजयानंतर नाव घेऊन स्पष्टच बोलला, नक्की काय झालं?
Suryakumar Yadav Post Match PresentationImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 06, 2025 | 7:56 PM
Share

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने चौथ्या आणि निर्णायक टी 20I सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला. भारताने क्वीसलँडमधील कॅरारा ओव्हलमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी मात केली. भारताचा हा या मालिकेतील सलग आणि दुसरा विजय ठरला. भारताने विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. भारतान या विजयासह मालिका गमावणार नाही हे निश्चित केलं. तसेच भारताला या विजयामुळे आता मालिका विजयाची संधी निर्माण झाली आहे.

भारतीय खेळाडूंची चाबूक कामगिरी

टीम इंडियाने या सामन्यात बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली. भारतासाठी आधी अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. तसेच दोघांनीच सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर फिरकी गोलंदाजांनी कांगारुंना आपल्या जाळ्यात अडकवलं. फिरकी गोलंदाजांना अर्शदीप सिंह, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी चांगली साथ दिली. कॅप्टन सूर्या सलग दुसर्‍या विजयानंतर फार आनंदी होता. सूर्याने या विजयाचं श्रेयस संघाला दिलं. मात्र त्याने 2 खेळाडूंचा विशेष उल्लेख केला. सूर्या काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

कॅप्टन सूर्याकडून शुबमन गिल-अभिषेक शर्माचं कौतुक

कॅप्टन सूर्याने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने चांगली सुरुवात मिळवून दिल्याचं म्हटलं. या सुरुवातीमुळे टीम इंडियाला आव्हानात्मक धावासंख्येपर्यंत पोहचता आल्याचं सूर्याने नमूद केलं.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

“सर्व फलंदाजाना या विजयाचं श्रेय जातं, विशेष करुन अभिषेक आणि शुबमनला. त्या दोघांनी पावरप्लेमध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली ते फार चांगलं होतं. या खेळपट्टीवर 200 पेक्षा अधिक धावा होणार नाहीत, हे त्या दोघांनी आधीच हेरलं”, असं सूर्याने म्हटलं. “प्रत्येक खेळाडूने योगदान दिलं. फलंदाजांनी पूर्ण जोर लावला”, असं सूर्याने स्पष्ट केलं.

सूर्याला भारतीय गोलंदाजाचा सार्थ अभिमान

सूर्याने फलंदाजांनंतर गोलंदाजांचंही कौतुक केलं. गोलंदाजांनी परिस्थिती ओळखली. त्यांनी परिस्थितीशीही एकरुप होत बॉलिंग केली. आमच्याकडे 2-3 ओव्हर टाकू शकतील, असे गोलंदाज आहेत, हे आमचं वैशिष्ट्य आहे. तसेच गरज पडल्यास ते संपूर्ण 4 ओव्हर टाकू शकतात”, असं म्हणत सूर्याने गोलंदाजांच्या कामगिरीचं कौतुक करत त्यांच्यावर विश्वास असल्याचं बोलून दाखवलं.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.