रोहित शर्माने नाणेफेक होताच नोंदवला नकोसा विक्रम, उपांत्य फेरीआधी धाकधूक वाढली
कर्णधार रोहित शर्माला संघाची साथ मिळत आहे. पण नशिबाची मिळत नाही असंच दिसत आहे. कारण सलग 13व्या सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण पुन्हा एकदा वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीची भिती सतावू लागली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. स्पर्धेत सलग दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे जेतेपदापासून टीम इंडिया फक्त दोन पावलं दूर आहे. असं असताना टीम इंडियाला एका वेगळ्याच चिंतेने ग्रासलं आहे. ही चिंता कोणत्याही खेळाडूच्या फॉर्मबाबत नाही तर नाणेफेकीबाबत आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल गमावला आहे. पण रोहित शर्माला नाणेफेक जिंकूनही प्रथम फलंदाजी करायची होती. त्यामुळे हा निर्णय पथ्यावर पडला. पण आयसीसीच्या बाद फेरीत नाणेफेक गमावली तर मोठी किंमत मोजावी लागू शकते. कारण असाच नाणेफेकीचा कौल वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये गमावला होता. त्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे ती धास्ती क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे भारतीय संघाने बाद फेरीत नाणेफेकीचा कौल जिंकला तर खऱ्या अर्थाने मनासारखा निर्णय घेता येईल.
वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाने नाणेफेक गमवण्याची सलग 13 वी वेळ आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माने सलग नाणेफेक गमवण्याची 10वी वेळ आहे. यापूर्वी ब्रायन लाराने कर्णधार म्हणून ऑक्टोबर 1998 ते मे 1999 या कालावधीत 12 वेळा नाणेफेक गमावली आहे. दुसऱ्या क्रमांकावर पीटर बोरेन आहे त्याने मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 या कालावधीत 11 वेळा नाणेफेक गमावली आहे. तर कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमवण्याची ही 10 वी वेळ आहे. नोव्हेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधीत त्याला नाणेफेकीने साथ दिली नाही.
रोहित शर्माने नाणेफेक गमवण्याची सुरुवात वनडे वर्ल्डकप 2023 पासून सुरु झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत हे शुक्लकाष्ठ कायम आहे. त्यामुळे बाद फेरीत तरी रोहित शर्माला नशिबाची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण बाद फेरीत नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. यावरून रणनिती आणि इतर गोष्टी ठरवता येतील.
