AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 WC: बांगलादेशविरुद्धच्या राड्यावर टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारनने मौन सोडलं, सामन्यानंतर स्पष्टच सांगितलं की…

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशचा 84 धावांनी पराभव करत नेट रनरेट जबरदस्त फायदा झाला आहे. भारताच्या डावात कर्णधार उदय सहारनला तीन बांगलादेशी खेळाडू भिडले होते. त्यावर सामन्यानंतर सहारनने मौन सोडलं आहे.

U19 WC:  बांगलादेशविरुद्धच्या राड्यावर टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारनने मौन सोडलं, सामन्यानंतर स्पष्टच सांगितलं की...
U19 WC: तीन बांगलादेशी खेळाडूंना भिडल्यानंतर उदय सहारनने सामन्यानंतर केली बोलती बंद, म्हणाला..
| Updated on: Jan 20, 2024 | 10:22 PM
Share

मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला सामना पार पडला. पहिल्याच सामन्यात भारताने बांगलादेशचा 84 धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेकीचा कौल जिंकत बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 251 धावा केल्या आणि विजयासाठी 252 धावांचं आव्हान ठेवलं. पण बांगलादेशचा संघ या धावांचा पाठलाग करताना कोलमडून गेला. 167 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. भारताने या सामन्यात 84 धावांनी विजय मिळवला. पण असं असलं तरी या सामन्यात भारताच्या डावात मैदानात तू तू मैं मैं पाहायला मिळाली. 25 व्या षटकात कर्णधार उदय सहारन याला तीन बांगलादेशी खेळाडू भिडले होते. पंचांना मध्यस्थी करून हा वाद सोडवावा लागला. दुसरी धाव घेताना अरिफुल इस्लामने सहारनला डिवचलं होतं. त्यानंतर त्याला त्याच भाषेत सहारनने उत्तर दिलं होतं. त्यानंतर अरिफुलच्या मदतीला दोघं आले. पण सहारनने जराही न डगमगता तिघांना उत्तर देत होता. यामुळे पंचांना मध्यस्थी करून वाद सोडवावा लागला. सामन्यानंतर कर्णधार उदय सहारनने वादावर मौन सोडलं आहे.

काय म्हणाला उदय सहारन?

“आम्ही आमच्या प्लानवर काम केले. आम्हाला क्रिकेट व्यतिरिक्त नाटकांवर लक्ष केंद्रित करायचे नव्हते. आम्ही आमच्या योजना अंमलात आणल्या आणि जिंकलो. आमचे दोन गडी झटपट बाद झाले. त्यामुळे प्रेशरमध्ये न येता आम्ही संयमाने खेळलो. आआदर्शने शानदार खेळी केली. धावा होणार हे आम्हाला माहीत होतं. आमचे गोलंदाज प्रभावी ठरले. या पुढचा प्रत्येक खेळ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. लगेच आनंद साजरा करण्याची वेळ नाही स्पर्धा अजून बरीच बाकी आहे.”, असं अंडर 19 टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारन याने सांगितलं. भारताचा नेट रनरेट चांगला झाला असून अ गटात टॉप स्थान गाठलं आहे. भारताचा पुढचा सामना आयर्लंडशी 25 जानेवारीला होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आशिकुर रहमान शिबली (विकेटकीपर), जिशान आलम, चौधरी मोहम्मद रिझवान, अरिफुल इस्लाम, अहरार अमीन, मोहम्मद शिहाब जेम्स, महफुजुर रहमान रब्बी (कर्णधार), शेख पावेझ जिबोन, मो. इक्बाल हुसेन एमोन, मारुफ मृधा, रोहनत डौल्ला बोरसन

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारण (कर्णधार), सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.