AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6,6,6,6,6,4…! एकाच षटकात 34 धावा, हार्दिक पांड्याने ठोकलं शतक Video

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा फॉर्म दाखवून दिला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई केली. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून शतक पूर्ण केलं.

6,6,6,6,6,4...! एकाच षटकात 34 धावा, हार्दिक पांड्याने ठोकलं शतक Video
6,6,6,6,6,4...! एकाच षटकात 34 धावा, हार्दिक पांड्याने 144 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने ठोकलं शतकImage Credit source: video grab/Twitter
| Updated on: Jan 03, 2026 | 3:39 PM
Share

विजय हजारे ट्रॉफी 2025 स्पर्धेत बदोडा आणि विदर्भ हे संघा आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल विदर्भाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बरोड्याची सुरुवात काही चांगली झाली नाही. 71 धावांवर 5 गडी तंबूत परतले होते. त्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजी हार्दिक पांड्या उतरला. त्याने सहाव्या विकेटसाठी भाऊ कृणाल पांड्यासोबत 65 धावांची भागीदारी केली. तसेच झंझावात सुरुच ठेवला. जो समोर गोलंदाज येईल त्याला अक्षरश:फोडून काढलं. हार्दिक पांड्याने 92 चेंडूत 133 धावांची खेळी केली. यात त्याने 11 षटकार आणि 8 चौकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 144.57 चा होता. या खेळीसह त्याने आपला फॉर्म काय आहे ते दाखवून दिलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्या कमाल करेल असं दिसत आहे. विशेष म्हणजे बडोद्यासाठी खेळताना त्याने 68 चेंडूतच शतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीमुळे बडोद्याला 50 षटकात 9 गडी गमवून 293 धावांपर्यंत मजल मारता आली.

हार्दिक पांड्याने एका षटकात ठोकल्या 34 धावा

विजय हजारे ट्रॉफीतील या सामन्यात हार्दिक पांड्या फलंदाजीला आला तेव्हा बडोदा संघाची स्थिती नाजूक होती. पण हार्दिक पांड्या सहजासहजी हार मानणारा नाही. त्याने विदर्भाच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. विदर्भाचा गोलंदाज पीआर रेखाडेला आजचा दिवस काही चांगला गेला नाही. हार्दिक पांड्याच्या रडारवर रेखाडे आला आणि एकाच षटकात 34 धावा काढल्या. यावेळी त्याने 5 षटकार आणि 1 चौकार मारला. विदर्भासाठी 39वं षटकं खूपच महागडं पडलं. हार्दिक पांड्या हे षटक खेळण्यापूर्वी 62 चेंडूत 66 धावा करून खेळत होता. पण हे षटक संपता संपता त्याने शतक पूर्ण केलं.

हार्दिक पांड्याची करिअरमधील सर्वात मोठी खेळी

हार्दिक पांड्याने लिस्ट ए वनडे करिअरमध्ये पहिल्यांदाच शतक ठोकलं आहे. त्याने 68 चेंडूत शतक पूर्ण केलं. पण त्यानंतरही त्याचा झंझावात काही थांबला नाही. त्याने विदर्भाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. हार्दिकने 92 चेंडूत 133 धावांची खेळी केली. यापूर्वी हार्दिक पांड्याने लिस्ट एमध्ये नाबाद 92 धावांची खेळी केली होती. मात्र आता त्याने 130च्या पार धावा केल्या आहेत.

पुढच्या वर्षी मुंबई खड्डेमुक्त होणार; शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
पुढच्या वर्षी मुंबई खड्डेमुक्त होणार; शिंदेंनी व्यक्त केला विश्वास.
मौका सभी को मिलता है! भाषणातून धनंजय मुंडेंची डायलॉगबाजी
मौका सभी को मिलता है! भाषणातून धनंजय मुंडेंची डायलॉगबाजी.
जिथं टेंडर, तिथं सरेंडर ही ठाकरेंची भूमिका', शिंदेंचा ठाकरेंना टोला
जिथं टेंडर, तिथं सरेंडर ही ठाकरेंची भूमिका', शिंदेंचा ठाकरेंना टोला.
वसई-विरारमध्ये भाजप उमेदवारांकडून ओवाळणी फंडा, प्रचारात पैसे वाटप?
वसई-विरारमध्ये भाजप उमेदवारांकडून ओवाळणी फंडा, प्रचारात पैसे वाटप?.
'नोटा'चं बटण तरी 66 नगरसेवक बिनविरोध का? मनसे कोर्टात जाणार!
'नोटा'चं बटण तरी 66 नगरसेवक बिनविरोध का? मनसे कोर्टात जाणार!.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्याची हत्या - प्रणिती शिदें
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्याची हत्या - प्रणिती शिदें.
खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार? जलील यांचा रोख कुणावर?
खोक्यामध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार? जलील यांचा रोख कुणावर?.
मुंडे यांनी पोरांना विचारलं धुरंधरमधला हिरो कोण? विद्यार्थी म्हणाले...
मुंडे यांनी पोरांना विचारलं धुरंधरमधला हिरो कोण? विद्यार्थी म्हणाले....
दादांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप! चव्हाण म्हणाले, मी फडणवीसांना..
दादांना महायुतीत घेतल्याचा पश्चाताप! चव्हाण म्हणाले, मी फडणवीसांना...
66 बिनविरोध निवडींवरून मनसे आक्रमक अन थेट कोर्टात जाणार - अविनाश जाधव
66 बिनविरोध निवडींवरून मनसे आक्रमक अन थेट कोर्टात जाणार - अविनाश जाधव.