AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: टीम इंडियाला विजयासाठी आणखी 140 धावांची गरज, ऑस्ट्रेलिया रोखणार?

India A vs Australia A Unofficial Test: इंडिया ए वूमन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए वूमन्स यांच्यातील एकमेव अनधिकृत कसोटी सामना हा रंगतदार स्थितीत पोहचला आहे.

IND vs AUS: टीम इंडियाला विजयासाठी आणखी 140 धावांची गरज, ऑस्ट्रेलिया रोखणार?
BcciImage Credit source: Bcci
| Updated on: Aug 24, 2024 | 4:48 PM
Share

वूमन्स टीम इंडिया ए विरुद्ध वूमन्स ऑस्ट्रेलिया ए यांच्यातील एकमेव आणि 4 दिवसीय अनऑफिशियल कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसापर्यंत 6 विकेट्स गमावून 68 ओव्हरमध्ये 149 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला शेवटच्या दिवशी विजयासाठी आणखी 140 धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलिया विजयापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी कोणाच्या बाजूने निकाल लागतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

सामन्यात आतापर्यंत काय झालं?

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या 212 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाला प्रत्युत्तरात 184 धावांपर्यंतच पोहचता आल्याने ऑस्ट्रेलियाला 28 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसर्‍या डावात 60 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 192 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी 3 विकेट्सच्या मोबदल्यात 96 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अशाप्रकारे दुसऱ्या डावात 260 धावांवर ऑलआऊट झाली. त्यासह टीम इंडियाला 289 धावांचं आव्हान मिळालं.

ऑस्ट्रेलियाकडून मॅडी डार्क हीने नाबाद 105 धावांची शतकी खेळी केली. एम्मा डी ब्रोने 58 धावांचं योगदान दिलं. तर अखेरीस मॅटलान ब्राउन हीने 26 आणि ग्रेस पार्सन्स 35 धावा केल्या. टीम इंडियाकडून मिन्नू मणी हीने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर प्रिया मिश्रा आणि सायली सातघरे या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

टीम इंडियाचा दुसरा डाव

टीम इंडियाकडून 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके दिले. टीम इंडियाच्या पहिल्या 3 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. प्रिया पुनिया हीने 108 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. श्वेता सेहरावतने 21 धावांचं योगदान दिलं. शुभा सतिश 45 धावा करुन माघारी परतली. तेजल हसबनीस 6 रन्सवर आऊट झाली. सजीवन सजनाला भोपळाही फोडता आला नाही.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 68 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 149 धावा केल्या आहेत. राघवी बिष्ट 16 तर उमा चेत्री 10 धावांवर नाबाद आहे. आता चौथ्या दिवशी भारताला विजयाची आशा आहे. आता या प्रयत्नात टीम इंडिया यशस्वी होते की ऑस्ट्रेलियाने इथेही बाजी मारते, हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होईल.

ऑस्ट्रेलिया की इंडिया? कोण जिंकणार?

वूमन्स ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन : चार्ली नॉट (कर्णधार), एम्मा डी ब्रो, जॉर्जिया वॉल, निकोल फाल्टम, टेस फ्लिंटॉफ, मॅडी डार्क (विकेटकीपर), मॅटलान ब्राउन, केट पीटरसन, लिली मिल्स, ग्रेस पार्सन्स आणि निकोला हॅनकॉक.

वूमन्स इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : मिन्नू मणी (कर्णधार), श्वेता सेहरावत, प्रिया पुनिया, शुभा सतीश, तेजल हसबनीस, बिस्त राघवी, सजीवन सजाना, उमा चेत्री (विकेटकीपर), मन्नत कश्यप, प्रिया मिश्रा आणि सायली सातघरे.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.