AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

USA vs PAK: “30-40..”, यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेलचा पाकिस्तानला इशारा, काय म्हणाला?

Monank Singh On Pakistan: यूएसए विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याआधी यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेल याने पाकिस्तानला इशारा दिला आहे.

USA vs PAK: 30-40.., यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेलचा पाकिस्तानला इशारा, काय म्हणाला?
babar azam and monank patel
| Updated on: Jun 06, 2024 | 6:18 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान आज 6 जून रोजी यजमान यूएसए विरुद्ध सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. तर यूएसएचा हा दुसरा सामना असणार आहे. यूएसएने या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात कॅनडाचा पराभव करत विजय विजयी सुरुवात केली. त्यानंतर आता यूएसए पाकिस्तानचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. यूएसएचा कॅनडा विरुद्ध विजय मिळवल्यानंतर विश्वास वाढला आहे. त्यामुळे यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. या सामन्याच्या काही तासांआधी यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेल याने पाकिस्तान थेट इशारा दिला आहे.

मोनांक पटेल काय म्हणाला?

“एकदा का आम्ही मैदानात 30-40 मिनिटं मैदानात सेट झालो, तर आम्ही हा सामना जिंकू शकतो”, असा विश्वास मोनांक पटेल याने व्यक्त केला. मोनांक सिंह याच्या प्रतिक्रियेमुळे क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली आहे. त्यात यूएसए क्रिकेट टीम यजमान आहे, त्यामुळे त्यांना घरच्या परिस्थितीचा फायदा असेल. त्यात यूएसए टीममध्ये कोरी एंडरसनसारखा अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.

कॅनडा विरुद्ध विजयी सलामी

दरम्यान टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना हा 2 जून रोजी यूएसए विरुद्ध कॅनडा यांच्यात झाला. यूएसएने चेसिंग करताना विक्रमी 195 धावांचं आव्हान पूर्ण केलं. कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. यूएसएने या धावांचा पाठलाग करताना 3 विकेट्स गमावून 14 बॉलआधी विजय मिळवला. यूएसएने 17.4 ओव्हरमध्ये 197 धावा केल्या. यूएसएचा या विजयामुळे विश्वास दुणावलेला आहे. यूएसए या विश्वासासह पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे.

मोनांक पटेलला विश्वास

युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.

पाकिस्तान टीम : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझगम खान, शादाब खान, इमाद वसीम, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान आणि अबरार अहमद.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.