व्हॉट अ कॅच..! विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माने दिली अशी रिअॅक्शन Video Viral
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. त्यात आघाडी तीन फलंदाज झटपट बाद झाले. विराट कोहलीचा ग्लेन फिलिप्सने जबरदस्त झेल पकडला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील औपचारिक सामना सुरु आहे. पण या सामन्याच्या निकालावर उपांत्य फेरीच्या लढती ठरणार आहेत. त्यात कर्णधार रोहित शर्मा याची नाणेफेक गमवण्याची मालिका सुरुच आहे. आताही नाणेफेक गमवल्याने प्रथम फलंदाजी करावी लागत आहे. असं असताना भारतीय संघाला सुरुवातीला तीन धक्के बसले. आघाडीचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. विराट कोहलीही या सामन्यात काही खास करू शकला नाही. विराट कोहली 300 व्या वनडे सामन्यात कमनशिबी ठरला असंच म्हणावं लागेल. कारण ग्लेन फिलिप्सने त्याचा जबरदस्त झेल पकडला. शुबमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. त्याने दोन चौकार मारून क्रीडाप्रेमींना दिलासा दिला होता. पण एक क्षणात होत्याचं नव्हतं झालं. विराट कोहलीने जोरात बॅकवर्ड प्वॉइंटच्या दिशेने ग्लेन फिलिप्सच्या बाजूने फटका मारला होता. त्यामुळे हा चेंडू सहज बाजूने निघेल असं वाटत होतं. 0.62 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. पापणी लवते न लवते तोच ग्लेन फिलिप्सने अप्रतिम झेल पकडला.
विराट कोहली अशा पद्धतीने बाद झाल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने डोक्यावर हात मारला. अनुष्का शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिलाही अशा पद्धतीने बाद होईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे तिला आश्चर्यकारक हसू आलं. खरं तर तिला अशा पद्धतीने बाद होऊ शकतो यावर विश्वासच बसत नव्हता. विराट कोहली 300 व्या वनडे सामन्यात 14 चेंडू खेळत 11 धावा करून बाद झाला.
View this post on Instagram
टीम इंडियाच्या 30 धावा असताना 3 विकेट पडल्या. त्यामुळे टीम इंडिया संकटात पडली होती. मात्र त्यानंतर मधल्या फळीत अक्षर पटेल आणि श्रेयस यांनी डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 40 हून अधिक धावांची भागीदारी केली. तसं पाहिलं तर या सामन्याचा उपांत्य फेरीच्या समीकरणावर काहीच परिणाम होणार आहे. पण टीम इंडियाने हा सामना गमावला तर ऑस्ट्रेलियाशी लढत करावी लागणार आहे.
