IND vs ENG : शुभमन गिलचा हट्टीपणा नडला ? 68 व्या ओव्हरपर्यंत वॉशिंग्टन सुंदरला का खेळवलं नाही ? संघातील व्यक्तीचाचा धक्कादायक खुलासा
IND vs ENG : मँचेस्टर कसोटीमध्ये सध्या भारतीय संघावर पराभवाचे ढग फिरू लागले आहेत. आणि याचदरम्यान कर्णधार शुभमन गिलने केलेली एक चूक चर्चेचा विषय बनली आहे. संघाचील एक महत्वाच्या व्यक्तीनेच याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला मँचेस्टरमध्ये पराभवाचा धोका आहे. यासाठी तो स्वतः जबाबदार आहे. गिलची जिद्द संघाला इतकी महागात पडेल, याची कोणीच कल्पना केली नव्हती. पहिल्या डावात टीम इंडियाच्या 358 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 7 गडी गमावून 544 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता इंग्लडने पाहुण्या (भारतीय) संघावर 186 धावांची आघाडी घेतली असून त्यांच्या हातात अजूनही 3 विकेट्स आहेत. मात्र याच चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी करू न देण्याच्या शुभमन गिलच्या जिद्दीमुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले.
यादरम्यान, यजमान (इंग्लंड) संघाच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदरला 68 व्या षटकांनंतर गोलंदाजीची संधी मिळाली. गिलच्या या निर्णयावर गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची यात कोणतीही भूमिका नसल्याचेही ते म्हणाले.
मॉर्केलने केला धक्कादायक खुलासा
चौथ्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला 68 षटके टाकल्यानंतर गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. याप्रकरणी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी मोठा खुलासा केला. हा पूर्णपणे कर्णधार शुभमन गिलचा निर्णय होता. वेगवान गोलंदाजांनी काही काळ गोलंदाजी करावी अशी त्याची इच्छा होती, असं मॉर्केल म्हणाले.
चेंडू फिरत होता आणइ सीम करत होता , त्यामुळे वेगवान गोलंदाजी हाच योग्य पर्याय होता. पण आमची लेंथ चुकली. चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. यादरम्यान इंग्लंडने 46 षटकांत 2 बाद 225 धावा केल्या होत्या, पण तिसऱ्या दिवशी सुंदरला संधी मिळताच त्याने चमत्कार केला.
वॉशिंग्टन सुंदरने केली शानदार गोलंदाजी
मँचेस्टर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, वॉशिंग्टन सुंदरला इंग्लंडच्या डावाच्या 69 व्या षटकात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि 77 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ऑली पोप (71 धावा) याला बाद केल. तिसऱ्या विकेटसाठी जो रूटसोबतची 144 धावांची भागीदारी त्याने मोडली.
यानंतर, 81 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सुंदरने हॅरी ब्रूकला (3 धावा) बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत 19 षटके टाकली आहेत, ज्यामध्ये त्याने 57 धावा देऊन दोन विकेट घेतल्या. जर कर्णधार शुभमन गिलने या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी करण्याची संधी दिली असती तर सामन्याची परिस्थिती वेगळी दिसली असती, अशी चर्चा आहे.
