IND vs AUS | विराटची कॉपी करु नकोस; हरभजनचा अजिंक्य रहाणेला सल्ला

टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली असून या दौऱ्यात भारतीय संघ टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

IND vs AUS | विराटची कॉपी करु नकोस; हरभजनचा अजिंक्य रहाणेला सल्ला

मुंबई : भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. या दौऱ्यात (India Tour Australia) टीम इंडिया (Team India) टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हरभजन म्हणाला की, अजिंक्यने विराट कोहलीप्रमाणे संघाचं नेतृत्व करु नये. तसं केल्यास ती त्याची चूक ठरू शकते. (Harbhajan Singh says Ajinkya Rahane do not need to copy Virat Kohli)

हरभजन सिंह स्पोर्ट्स तकशी बातचित करत होता. यावेळी तो म्हणाला की, अजिंक्य खूप शांत आणि समजूतदार आहे. तो विराटपेक्षा खूप वेगळा आहे. रहाणेने त्याच्या व्यक्तीमत्वात बदल करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अजिंक्यला कदाचित असं वाटू शकतं की, आपणही विराटप्रमाणेच संघाचं नेतृत्व करायला हवं. परंतु मला असं वाटतं की त्याची बिलकूल गरज नाही. रहाणे जसा आहे त्याप्रमाणेच त्याने संघाचं नेतृत्व करायला हवं. त्याने त्याच्या पद्धतीने संघाकडून सर्वोत्तम खेळ करुन घ्यावा.

विराटने कांगारुंविरुद्ध अविश्वसनीय असं प्रदर्शन यापूर्वी केलं आहे. त्याच्याप्रमाणे रेकॉर्ड्स बनवायला प्रत्येक फलंदाजाला आवडेल. भारतीय संघातील खेळाडू विराटला मिस करतील. विराटकडे संघाचं नेतृत्व करण्याचा तगडा अनुभव आहे. त्याची आक्रमकता, स्वतः पुढे होऊन संघाचं नेतृत्व करणे या गोष्टी विराटची ताकद आहेत. विराटमुळे भारतीय संघदेखील अधिक आक्रमकपणे खेळतो. त्यामुळे संघ त्याला नक्कीच मिस करेल.

…म्हणून विराटऐवजी अजिंक्य संघाचं नेतृत्व करणार

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटनिर्टी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. त्यामुळे विराट टीम इंडियासाठी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळताना दिसणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील दुसरा, तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे 26 डिसेंबर, 7 आणि 15 जानेवारी 2020 ला खेळण्यात येणार आहे. विराटच्या घरी या कालावधीदरम्यान नवीन पाहुणा येणार असल्याने विराटने शेवटच्या 3 कसोटीतून माघार घेतली आहे. त्यामुळे या तीनही कसोटी सामन्यांमध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे.

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या

IND vs AUS : विराटच्या अनुपस्थितीत रहाणेऐवजी रोहितला कर्णधार करा; इरफान पठाणचा सल्ला

भारतीय संघाच्या ‘या’ सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळणार?

India vs Australia 2020 | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटला सचिनचे हे 2 विक्रम मोडित काढण्याची संधी

(Harbhajan Singh says Ajinkya Rahane do not need to copy Virat Kohli)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI