Ind vs Aus 2020 | ऑस्ट्रेलियन टीमची माझ्याविरोधात रणनिती, माझ्यासाठी आनंदाची बाब : श्रेयस अय्यर

ऑस्ट्रेलियन टीम माझ्याविरोधात रणनिती करतीये ही माझ्यासाठी आनंदाची बाब असल्याचं भारताचा प्रमुख युवा फलंदाज श्रेयस अय्यरने म्हटलं आहे.

Ind vs Aus 2020 | ऑस्ट्रेलियन टीमची माझ्याविरोधात रणनिती, माझ्यासाठी आनंदाची बाब : श्रेयस अय्यर
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 10:14 PM

कॅनबेरा : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात 2 डिसेंबर रोजी तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना पार पडणार आहे. ऑस्ट्रेलियाने ही एकदिवसीय मालिका अगोदरच 2-0 ने खिशात घातली आहे. फलंदाजांच्या छोट्या इनिंग हा भारताच्या दृष्टीने चितेंचा विषय ठरला आहे. शॉर्ट बॉलवर खेळताना भारतीय फलंदाज चाचपडताना दिसत आहेत. याचविषयी विचारलं असता भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) माझ्याविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ रणनिती बनवतो याचा मला आनंद आहे, असं तो म्हणाला. (Ind Vs Aus Australians Have plan For me Shreyas iyer)

“ऑस्ट्रेलियन संघ माझ्याविरुद्ध रणनिती बनवतो याला मी एक आव्हान म्हणून घेतो. दबावात खेळत असताना माझं प्रदर्शन नेहमी चांगलं होतं. प्रतिस्पर्धी संघ माझ्याविरुद्ध रणनिती करतो आहे, याचं मला दडपण न येता मी ते आव्हान म्हणून घेतलं असल्याने याचा मला फायदा होईल आणि त्याचं रिफ्लेक्शन नक्कीच शेवटच्या मॅचमध्ये दिसेल”, असा विश्वास श्रेय्यसने म्हटलं.

“शॉर्ट बॉल खेळण्याचा थेट संबंध आपली मानसिकता आणि नेटमधील प्रॅक्टिस यावर आहे, असं मतंही श्रेयसने यावेळी मांडलं. बॅटिंग करत असताना आपला स्टान्स कसा आहे, यावरही खूप काही अवलंबून आहे”, असंही श्रेयस म्हणाला.

“माझ्यासाठी मी असा पॅटर्न ठरवलाय की क्रीजवर आल्यानंतर आपण स्वतला ठराविक वेळ द्यायला हवा. शॉर्ट बोलिंगच्या अनुषंगाने जर प्रतिस्पर्धी संघाने तशी बोलिंग केली तर आक्रमकपणे फटके खेळायचे किंवा काही वेळा डिफेन्सची भूमिका घ्यायची”, असंही गुपित श्रेयसने सांगितलं.

दरम्यान, कॅनबेराच्या मैदानावर अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलिया व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत आहे तर शेवट गोड करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

(Ind Vs Aus Australians Have plan For me Shreyas iyer)

संबंधित बातम्या

युजवेंद्र चहलकडून प्रेयसीसोबत गोड सेल्फी शेअर, धनश्री वर्माचा खास अंदाजात रिप्लाय

‘आपदा को अवसर में बदल डाला’, युजवेंद्र चहलच्या साखरपुड्यावर सेहवागसह चाहत्यांकडून मीम्सचा पाऊस

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.